स्वार्थासाठी समाज पेटवून त्यावर पोळी भाजून ताव मारणारे तमाशा पहात आहेंत ?
आय पी एस भाग्यश्री नवटक्केची तडकाफडकी बदलींची चर्चा,न्याय कीं अन्याय ?
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न हा कधी कधि गुन्हा ठरतो का ? कायदा हा निकोप समाज व्यवस्थेसाठी असतो, 4 महिन्यापूर्वीची घटना आज उकरून काढण्या पाठीमागचा हेतू काय ! तेव्हा पासून आत्ता पर्यंत माजलगाव शांत होतं.पण वयक्तीक स्वार्थासाठी दोन्ही समाज पेटवून स्वार्थीपोळी भाजण्याचा त्या पोळीवर पोट भरण्याचा केविलवाणा प्रयत्न जर कथित पुढाऱ्यांकढुन होतं असेल तर हें समाज विघातक आहे,
माजलगाव विभागात कुठल्या गुन्ह्यांत अन्याय झाला ? किंवा ही क्लिप येण्या आगोदर कधी हा विषय चर्चिला गेला ? तर नाही मग दोन्ही समाज बांधवांनी डोकं ठिकान्यावर ठेवून संवेदशील प्रकरण वाढवू नये ! या प्रकरणात ज्यांचा हेतू आहे तें पेटवून देवून मोकळे झाले, आत्ता दुरुन तमाशा पहात आहेत.घरा शेजारी आणि दाराशेजारी राहणारे, ताटात खाणाऱ्यानाचे भांडणं लावून काय मिळणार यांना पण विघ्नसंतोषी लोकांचा हा धंदाच म्हणा ! पण यात एकाद्या अधिकाऱ्याला बदनाम करण्याची जर सुपारी घेतल्यासारखं कोणी करत असेल तर कितपत योग्य!
पोलीस प्रशासनातील कठोर कारवाई मुळे अवैद्य धंद्यावर पाणी फिरायला लागले, धंद्याचे वांदे झाले. यात वाळू माफिया, खोटय़ा केस सम्राट, लाल बत्ती, ब्लँकमेलर्स, मद्धसम्राट, हॉस्पिटल माफिया, या सर्वांच्या कारनाम्यांवर अंकुश ठेवल्यानं माजलगाव शांत झालं तें शांत राहून कसं चालेल म्हणून कदाचित अशी क्लिप वायरल करणाराचा हेतू असेल.संविधान आणि कायदा या पेक्षा कोणी अधिकारी मोठा नाही. त्या अधिकाऱ्यांचा हेतू जर कलुषित असेल तर शासन व्हायला पाहिजेच, पण जाणीवपूर्वक पूर्व इतिहास न तपासता एकाद्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यावर असा आरोप करणं चुकीचं ठरेल. चांडाळ चौकडी च्या दुर्बुद्धीतून त्यांच्यात पातळयंत्री पणामुळे समाज वेठीस धरला जात असेल तर साध्य काय होनार आहे.धंदेवाईक नजरेतून जर अशा प्रकाराला जाणीवपूर्वक उकरून काढले जात असेल तर गंभीर आहे.
ठोक मोर्चा सारख्या आक्रमक आंदोलना मध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं हें त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांचे काम असते, तें त्यावेळी केले नसते तर कित्येक दुर्दैवी घटनां घडल्या असत्या पेटलेल्या समाजाला शांत करण्यासाठी कधी कधी आउट ऑफ वे जावून काम करावं लागत. पण त्यामधे सामाजिक शांतता अबाधित ठेवणं हा मुख्य उद्देश असतो, कोणी एक अधिकारी रुजू झाल्यापासून 9/10महिन्याच्या कालवधीत जर कोणाला त्रास झाला असता तर तेव्हा एकादी तक्रार वरिष्ट कार्यालयात द्यायला कोणाची हरकत होती का ? तसे पाहिलं तर बाबासाहेबांच्या कायद्याचा वापर करणं आणि दादा मागायला समाज तरी कधी मागे असतो,पण असं झालं नाही.उलट या कालवधीत गुन्हेगारीचे प्रमाण आणि आगोदर चे प्रमाण तपासले तर प्रामाणिक अप्रामाणिक काम काय असते लगेच लक्षात येईल.थेट वाळू माफियावर केलेल्या कारवाई मधून कोटय़ावधीचे दंड महसूल च्या महिला तहसिलदार आणि पोलीस अधिकारी म्हणून यांनी केले. माजलगावमधे शांतता नांदूलागली होती.पण नाही.चांगल झाल कीं पोटात कलवायला लागलं. इथे विषय जाती धर्मा चा मुळीच नाही.पण अशी सवय जर लागत असेल तर धक्कादायक आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारणारे यशस्वी होतील.भविष्यात अशा घटनां वाढतील आणि कुठल्याच जातीच्या, धर्माच्या अधिकाऱ्याला कायद्यावर बोटं ठेवून काम करता येनार नाही,
लोक शिवजयंती असली कीं पोलीस कोन हें आगोदर पाहतील, डॉ बाबासाहेब आंबेकरकरांची जयंती असेल, भविष्यात उरूस, ईद आणि इस्तेमाह या सर्वच बाबतीत अपरिहार्य घटनां घडली तर त्यांच संशयाच्या नजरेतून पाहिले जाईल म्हणून या बाबतीत दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायलाच हव! कायद्यावरचा विश्वास उडत असेल त्यांत जाणीवपूर्वक एकाद्याला टार्गेट केलं जात असेल तर योग्य नाहीच. पण प्रश्न हा निर्मान होतोय कीं या क्लिप पूर्वी माजलगाव मधील वातावरण सामजिक सलोखा चांगला होता.कुठलीच तक्रार शहानिशा झाल्याशिवाय घेतली गेली नाही,असं जर असेल जयंती उत्सव , मोर्चे आणि सभा संम्मेलन शांततेंत पार पडले असतील, कन्हैया कुमार यांची सभा माजलगावमध्ये शांततेत संपन्न झाली असेल, शेतकरी आंदोलनात अग्रेसर असलेल्या माजलगावमध्ये कुठला चुकीचा गुन्हा दाखल झाला नाही, कॉलेज पासून तें घरापर्यंत जाईपर्यंत मुलगी सुरक्षित मनाने जावू शकत असेल तर , या सगळय़ा कायद्याच्या यशाला जर तपासून पाहिले तर 100%मार्क मिळतात.येवढेच नाही तर माजलगावमध्ये कुठल्याही गल्लीत जावून सामान्य लोकांना विचारा उत्तरे आपोआप मिळेल फक्त धर्म आणि जातीचा द्वेषवादी चष्मा दुरु करुन नवटक्के मैड्म सारख्या नवख्या ऑफिसर च्या कामाचे मूल्यमापन केलं तर लक्षात येईल,
बीड जिल्ह्यातील , दसरा मेळावा, असो कीं मुख्यमंत्री दौरा, कोणताही प्रोटोकॉलचा कार्यक्रम असेल, सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न असेल तर पोलीस प्रशासनामधे चोख बंदोबस्त म्हटलं कीं नवटक्के मैड्म वर जबाबदारी असायची यात कधीच अपवादात्मक पण घटनां घडल्या नाहीत.हें सगळं एकीकडे आज क्लिप घेवून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, क्लिप मधे छेडछाड केली.वायरल करणाराचा हेतू काय। ठोक मोर्चा मधे आक्रमक झालेल्या समाजाला शांत करण्याच्या हेतू ने जर कौन्सलिंग केली.त्यामुळे अनुचित प्रकार घडले नाहीत. वातावरण शांत राहिले, तेव्हा पासून आज पर्यंतही शांत आहे, पण आत्ता दोन गट पडले, कारवाईची मागणी करणारे आणि कारवाई झाली तर आक्रमक पणे उत्तर देवू असं बोलणारे, चौकशी अंती जे व्हायच तें होईल पण सद्या तरी जातीच्या ठेकेदार मंडळीनी शांत डोक्यानं या प्रकरणावर विचार करायला हवा, अन्यथा या घटनेमुळे होणारे समाजिक परिणाम खुप भयावह असतील,
आय पी एस अधिकाऱ्यांना ब्लँकमेल करण्याचा तर हा प्रकार नाही ना?या सर्व गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे.शेवटी सगळं काही सोशल मीडियाची वाहूटळ आहे. इथे सत्य असत्य बर वाईट आणि दूरगामी परिणाम पाहिले जात नाहीत. जो तो त्यांच्या फेसबुक ऑल वर न्यायालयाचे निर्णय दिल्यागत पोस्ट करत राहतो, न्यायाधीशाच्या भूमिकेत गेलेला, अतिउत्साही, विवेकशून्य आणि संवेदनशील समाज विनाकारण संकटांना आमंत्रण देत असतो.यांची किंमत माथी भडकवणाऱ्या भाड खावुना नाही तर समाजातील गोर गरिबी लोकांना सहन करावी लागते, यांमुळे होणारे समाजाचे नुसकान आणि बिघडलेंलें सामाजिक स्वास्थ यांची भरपाई होणारी नसते. शेवटी ज्यांना कायद्याचं भय होतं त्यांच्या मनासारखे झालं नवटक्के मैड्म ची तडकाफडकीं बदलीची चर्चा आहे,खरं ठरले तर आत्ता फटाके वाजवून आनंद व्यक्त करायला मागे पुढे पाहणार नाही.
*लक्ष्मणसूत*