मराठा आरक्षण, "जाणता" राजाची अस्पष्ट भूमिका !
राजकारणातील "चाणक्य" शेंडी (नसलेला) यांच मराठा आरक्षण संदर्भातलें निवेदन (पत्र ) वाचलं ! सरकार च्या भूमीकेवर संशय घेत ! अतिशय सावध पवित्रा घेतलाय ? शांत संयमाचे आवाहन केलें! त्यांत जेवढी मराठा आरक्षणाची काळजी त्या पेक्षा obc आरक्षणाला धक्का लागू देवू नका ? असा इशारा करुन पुन्हा निसटून जात असलेली "वोट" बँक सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला ? वा साहेब छान अभिमानाने आमच्या छातीत "गोळा"उठला साहेब ! इथं मराठ्यांची पोर मरायला लागली ! स्वतःच जीवन संपवत आहेत, तीथे तुम्हाला obc ची काळजी, एस.सी, एस.टी, ओ बी सी ला धक्का लावता कामा नये ? तुम्हीं जाणते आहात नां तर मराठा आरक्षणाच खरं काय ते स्पष्ट सांगा ? राज्य सरकार च्या अखत्यारित आहे.असे उच्य न्यायलय सांगत .जे मुस्लिम आरक्षण टिकलं तसं मराठा आरक्षणाच काय झालं ते तर खरं सांगा ? आरक्षण देता येते का ? नाही? नसेल तर अडचण काय ? द्यायचं तर कसं ? याबाबत आपली भूमिका स्पष्ट महाराष्ट्राला सांगायाचं सोडून , आपलं कळलाव धोरण सुरुच आहे.
तुमच्याच वरदहस्ताने आमच्याच समाजातील मूठभर चिमूट भर "जातभाई" अर्थात समाज बांधव "सम्राट" झाले.कुणी "सहकार सम्राट" कुणी "साखरसम्राट" कुणी "शिक्षणसम्राट " महर्षी ची काही कमी नव्हती. त्यांत तुम्हीं बागायतदार भागाचे पाण्यानं पुष्कळ दान दिलेल्या शिवार चे ! तुम्हीं आपलपोटी धोरणांचा पाऊस पाडत ! फक्त येका भागाचा विकास केला. तो तुमचा डोळ्या समोरचा सुजलाम सुफलाम पश्चिम महाराष्ट्र याबद्दल आपलं कौतुकच शेवटी "अगोदर पोटोबा नंतर विठोबा " हें ही आम्हांला कळतय .पण नंतर आमचा अर्थात जाती चा विचार होईल पण नाही. पक्ष पातीपनांचं ग्रहण लागल्यागत आपणास या बांधवांचे प्रश्न दिसलेच नाहीत. ओसाड माळरानावर करपून जाणारे शेतकरी दिसलेच नाहीत.आपल्याच संस्थेच्या दारात अँडमिशन साठी ताटकळत उभा राहिलेंला बंडीतील शेतकरी बाप दिसला नाही ! का तर सत्तेचे आवरण आपल्या डोळ्यांवर होते. त्यांत स्कॉलर विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही संस्थांनिकाची बिना भांडवली कंपनी असते. यात वोट बँक पण भरते आणी नोट बँक पण दुहेरी फायदा होतो म्हटल्यावर कोनांचं काय ? यात उसाचा पैसा असलें आपल्या भागतील सधन कुटुंब एपतीने पैका भरत होती.त्या स्पर्धेत आम्ही कधीच गळून पडलो होतो. आमचे प्रश्न मांडनाऱ्या "गड्या" आपल्या समोर पाय घड्या घालत होत्या त्यात त्यांचं भलं झाल.' अपना काम बनता--मे गई जनता' या धोरणांने सर्व काही सुरु होतं . मात्र या धोरणां मूळ मराठा समाजाचं कधी न भरून निघणारे नुकसान झाले याला जबाबदार कोन ? साहेब उत्तर द्या
वा ! मानलं बुवा साहेब ! आपली भूमिका अजब आणी आपले निर्णय गजबज , महाराष्ट्राचे 3 वेळा मुख्यमंत्री होते आपण ? 2 वेळा केंद्रीय मंत्री सुध्दा होते ? दिल्लीतील वजनदार नेते , विरोधकांना आपली करंगळी सुध्दा सापडत नाही ? आपल्याच देखत मंडल आयोग लागू झाला ? नामांतर आंदोलन तर आपणच खेळलात ? पुतळे वाद तर किती भूतलावर केलें ? किती किती लोक रस्त्यावर उतरली. यात आरक्षणा बाबतीत कित्येक समित्या आणी आयोग आले त्यांत आपलं म्हणणं कधी स्पष्ट मांडलं त्यांच्या साठी काय केलं ? आज विचारायचं नव्हतं पण प्रश्न उपस्थिती होतो.आपल्या माणसांनी आपल्याच लोकांना कसं नागवलं! गरजे पुरतं वागवलं ! वाऱ्यावर सोडून भिकेला लावलं ! याचं उत्तर शोधायचं होतं , साहेब आपण ठरवलं तर पंतप्रधान बदलू शकता , राज्याची सत्ता तर आपल्या बाये हात का" खेल" पण अजून मला समजलं नाय मराठा आरक्षण म्हटलं की आपण त्यांची "टिंगल"तरी करता किंवा "बगल" तरी देता अशी भूमिका ?
कै.अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी आयुष्यभर लावून धरली शेवटी अपयश यांमुळे खचून गेले.तेव्हा पासून अर्थातच 1990 पासून या मागणी संदर्भात मराठा समाज आग्रही आहे.त्यांचं कारण समाजिक आणी आर्थिक पीछे हाट ! पण आपल्या राजकारणाचा तो धडाडीचा काळ होता.आपल्याला तेव्हा पासून 2014 पर्यंत या प्रश्नाकडे लक्ष्य द्यावं असं कधी मनातून वाटलच नाही. पुन्हा निवडनुक तोंडावर आली की त्या अगोदर आपल्या चेल्यांकडून बऱ्याच आरक्षण यात्रा चे महानाटय़ प्रयोग पण केलें. शेवटी चौदाला धोका लक्षात आला की ? तुम्हीं अस्सल राजकारणी ! 2014 मध्ये 16% आरक्षणाचा फुसका बार सोडला ? येवढच नाही तर घटनां बाह्य आरक्षनाचे आमिष दावखवले.ज्याचं घोंगड न्यायालयात अडकले आहे? का हो साहेब आमच्या गोर गरिबाचे लेकरू शिकून द्यायचं नव्हतं का ? नोकरी तर दूर फक्त चाकरी करावी ?
1999 च्या दरम्यान आपलं अस्तित्व टिकवण्याची वेळ आली त्यावेळी आपल्या नव्या पक्षाला याचं लोकांनी आपला पक्ष "जानता राजा " ची निर्णय म्हनून पूजू लागले भजू लागले ? स्वतंत्र चूल मांडल्या नंतर पुन्हा एकदा समाजाच्या अशा पल्लवीत झाल्या काहीं तरी निर्णय होईल. आपण सत्तेवर आलात थेट पंधरा वर्ष आपण भागीदारी ने सत्तास्थान "रगडुन" काडलें ! कर्जमाफि आदी निर्णय प्रति "बळीराजा"ची उपमा देण्यासाठी आणी कार्यकर्त्यानां घोषणा देण्यासाठी फायद्याचे ठरले कारण कर्ज माफित पण पक्षपाती पणा झाला." पश्चिम "बाजू सरस ठरली.असो शेवटि आपण राजकरण "पट्टु ", लाभाशिवाय वेळ आणी अर्थ ,व्यर्थ खर्ची करु नये. या नुसार आपण आज तागायत काम केलेंली संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे.
खंत येवढीच आहे पहाडासारखे तुमचे व्यक्तीत्वं आणी कर्तुत्व पण मराठा समाजासाठी वांझोटी का ठरले वो ?, शिवस्मारक , मराठा आरक्षण , गड किल्ले संवर्धन , अभ्यास क्रमातील छत्रपतीचा खरा इतिहास, "छत्रपती शाहू स्कॉलरशिप " अण्णासाहेब पाटील महामंडळ भरीव आर्थिक मदत, मराठा समजातील मुलांचे उच्य शिक्षणातील प्रमाण वाढवणे.मराठा समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत ,
मराठा वसतिगृह संदर्भात ठोस पाऊल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत का ? साहेब आपल्या पक्षाकडे? कागदोपत्री उत्तराचा भूतकाळ सांगुन भविष्यात बदल्याचे आमिष दाखवू नका ? आज दिशाहीन झालेल्या तरुणांना आरक्षणाचे म्रूगजळ आज गोड वाटू लागले.कारण "पाटील" असलेला समाज भिकाला लागलाय? तशी तुमच्या चिमूटभर बगल बच्चाचीचलती आहे.कारण ते आज "सम्राट" वरून "माफिया" झाले आहेत हें वेगळं सांगायला नको ? पण मराठा समाजाचं वास्तव विचित्र आहे.गावातील मुलं किती टक्के शिक्षित आहेत , त्यांत ऊच्च शिक्षणानं पुढारलेली किती आहेत ? क्लास 1किती ? एम बी बी एस ? एम डि ? या बाबतीत "पश्चिम"भाग वगळता आकडे वारी काडा बरं जरा एकदा मग लक्षात येईल.याही पेक्षा आपण शेतकरी आत्महत्ये बाबतीत खुप सजग आहात म्हणे ? मग तोही आकडा घ्या एकटय़ा मराठवाडा आणी विदर्भात 42 आत्महत्या मराठा समाजच्या आहेत.मग तरी तुम्हांला जातीचं देन घेणं नाही .तुम्हाला काळजी obc, sc, st, च्या मताची कारण भाजप सरकार चा डोळा त्यांच्यावर गोळा झालाय. शेवटी मराठे कुटं जातील ते तर आपलें आहेत."सत ना गत " पण लोकांच्या लक्षात येतय.58 मोर्चा मध्ये कुणाचं किती पाठबळ आणी संख्या बळ होतं.पण या मोर्चा नी येक झाक झालं, श्रेय वादच संपुष्टात आणला, बेगडी पुळका दाखवणारी माणसं बाजूला केली, तर "पुडी" सोडणाराची काडी लावायला मागे पुढे पाहत नाहीत.आत्ता जन मतांचा उद्रेक झाला आहे, "नवरा मेला तरी चालेल पण सवत राडव झाली पाहिजे "ही शेंडी ची राजनिती तुमची असली तरी लोक आत्ता जाणून आहेत.
तुम्हाला अट्रोसिटीची काळजी ती असायलाच पाहिजे, कारण तुम्हीं "पुरोगामी " अट्रोसिटीचा कायदा बदलू देणार नाही, obc आरक्षनाला धक्का लागू देणार नाय ? एस सी एस टी वरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत ? अशी तुमची भूमिका ? नाय तुम्हीं काळजी करायलाच पाहिजे? पण यात महाराष्ट्रातील मराठा समाज कुठंय ! कुणबी बांधव ते पण मराठा आहेत , त्या obc मधील जागेची वाटणी करा ना साहेब तुमची जात कुठंय ? हो आत्ता आठवलं तुम्हीं पुरोगामी नव्हं का ? काय बुरखा पांगरलाय राव झक्कास ! "घरचे नागवले येशी पाशी , दाशीचे डोहाळे पुसी"अशी गत झाली ?
भाजप वाल्यांना तर obc सह इतर मागसवर्गीय यांच्या वर डल्ला मारायची नामी संधी आलीती ते सोडणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहेच महाराष्टातील 60% मराठा समाज हा कॉँग्रेस राष्ट्रवादी मध्ये 20% शिवसेना 20%भाजप आणीउरला सुरला 10%इकडे तिकडे , मग ओबीसी ची "वोट बँक" 52%आरक्षण लाभान्वित घटक म्हणजेच मी लाभार्थी यांना नाराज करुन कसे चालेल .भले मराठा झाला तरी चाललेलं म्हनून नोकरभरी थांबवायची नको? असा घाट सुरु आहे. यात मराठा आणी इतरवाद लावून पोळी भाजण्याचे षडयंत्र सुरु आहे.सरकार आणी विरोधक यांच्यात त्राता, वाली, तारक असं प्रामाणिक कोणीच नाही हा गैर विश्वास या तरुणांत बळावत चालला आहे.तो लोकशाहीस घातक आहे, अशी परिस्थिती ओढवून घेण्यात इथली राजकीय इच्छा शक्ती कारणीभूत आहे. संवेदनशील मुद्याच्या गरमी वर स्वार्थी राजकारणाची पोळी कशी भाजली जाईल यांचा विचार करणाऱ्या औलादी सत्तेवर आल्या त्यामुळं वाटोळं झालं .
आता कोणाचं किती योगदान बिगदान आहें ते घाला चुलीत आदी आरक्षण द्या या हट्टाला पेटलेल्या तरुणांनाची समजूत कशी काढणार ? का पुन्हा यांच्यात लढाई लावायची दंगली घडवायच्या रक्तपात करायला लावून, दंगली वर रक्त रंजीत सत्ता मिळवायची हें ठरवा, यात आत्ता जातीच्या नावावर स्वार्थी पोळी भाजनाऱ्याच्या बुडा पर्यंत ऊब जाणार हें निश्चित आहें? जाती वादला खत पाणी द्यायच थांबवा ! मराठा तरुणां मधील तीव्र असंतोष आत्ताचा नाही याला बरीच दशक जबाबदार आहेत, यात कोणते पक्ष होते आणी कोणते पिल्लू यांचा वाट किती ? हें सर्वांना ठावूक आहे,
यात भिती येवढीच आहे ज्यांच्या साठी चे आरक्षण समर सुरु तोच यात खचून आत्महत्या करतोय.दुर्दैव याबाबतीत गेंडय़ाच्या कातडी च्या गाजरानां काहीच देन घेणं नाही उलट तोंडातून विखारी विष ओखूण आगीत पेट्रोल टाकीत आहेत, पण लक्षात ठेवा हा आता पर्यंत मूक असलेला मोर्चा आत्ता ठोक मोर्चा झाला यात पांढरपेशी विरुध्द ची खदखद संतापातून बाहेर येते, यांचा रोख ठोक महाप्रसाद घेण्याचं अहो पुण्य एकास लाभले , त्यांची "खैर" झाली तर दुसरे "भांबारुन" गेले म्हंजे कानाऊन गेलं !
शेवटी आरक्षण हें काही कपाटात ठेवलेली फाईल किंवा धनाची पेटी नाही , ते घटनेमध्ये आणी न्यायालयाच्या चौकटी बसवले पाहिजे हें ही आम्हांला कळत , जसं आहे तसं कायद्याच्या कसोटीत बसवायचं काम सरकारच आहे.यात वेळेच गाजर नको ? ठोस निर्णय हवा आहें, म्हनून ठोक मोर्चा सुरु आहे यांची तीव्र जाणीव सरकारनं घ्यावी अन्यथा , पेटले ल्या प्रत्येक सरणावर क्रांतीची मशाल पेटायची वाट पाहता ? मायबाप सरकार काय ते या तरुणांना समजवून सांगा फक्त गाजर नको" शेवटि
सरणावरती जळतात आज अमुची प्रेते, उठतिल त्या ज्वाळा मधुनी भावी क्रांतीचे नेते,
लोह दंड हें पाया मधले खळाखळातुटणार , आई! खळाखळातुटणार गर्जा जय जय कार क्रांती चा गर्जा जय जयकार !
सुरेश जाधव
मो -9404204008,
खुप छान!!अभिनंदन!👍👌
ReplyDeleteखूपच छान ,,,,,👍
ReplyDeleteछान लिहले
ReplyDeleteभारीच
ReplyDeleteखुप छान
ReplyDelete