श्रमांच्या घामावर स्वतःची राजकीय पोळी भाजायची थांबवा !
आग ओखनार्या सूर्याला मस्तकावर घेवून दिवस रात्र मेहनत करणाऱ्या हातांनाकधी आम्ही विश्रांती देणारा का ? आज हाय टेक च्या आणि डिजिटल च्या नावाखाली तुमची मंत्रालय हाय फाय आणि वायफाय झाली. लिफ्ट आणि शिफ्ट वर तुमची नोकरशाही ची बडदास्त सुरू आहे.एसी मध्ये बसून लिहायला कोमल हाताला कष्ट होत होते म्हणून कॉम्पुटराईझ करून टाकलं.तरी सही चे कष्ट त्यात किती रेषा ओढ्याच्या म्हणून त्या ए सी तल्या आणि "तिशीतल्याची" लईच काळजी.डिजिटल सिग्नेचर केली झंज्टच नकोयाची सोय केली .पण आमच्या साठीतल्या बापाच्या हातातील कुदळ फावडं टिकाव आणि माईच्या हातातली पाटी यांना दिसत नाय.म्हणे श्रम दान करा! महाश्रमदानातून जल चळवळ ! तूमच्या डोक्यातली वळवळ अगोदर थांबवा. उन्हा तान्हात बाया पोरांना घेवून चर खोदण्यासाठी जीवाची हाल अपेष्टा ! करून घेणाऱ्या सोबत सेल्फी पुरत आणि फोटोसेशन चा महाइव्हेंट कशासाठी ? राबणाऱ्याच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आसुरी आनंद घेवू नका.
लाही लाही होणाऱ्याच्या हातातले टिकाव नक्की घ्या पण कमीत कमी 4 तास तर महाश्रमात घाम गाळा.मग घामाचे थेंब झटकता ना चे फोटो नक्की खेचा पण तेव्हा कपाळावर चा घाम नाही तर पाठी पोटावर पाट वहायला लागतील.यांची जान ठेवा तसं होन दूर फक्त चार टिकाव हाणून पावन झाल्यानं शिवार पणेदार होतो का ? मग आम्हाला लोक सहभागाचे गीन्यान शिकवा. धुरळा उडवत गाडी नी यायच अन गोवर्धन उचलल्या गत फुकटचा रुबाब दाखवत निघून जायचं काय पोरं खेळ लावला का ? पुन्हा नाव लावयला मोकळे श्रेय घेण्याचातर भस्म्या जडला आहे.
लईचश्रम परिहार करायचं ज्ञान पाजळायची हौस आहे ना तर मग सगळ्या क्लास 1अधिकाऱ्यानी हातात कुदळ फावडं घेवून चैत्रातच्या भर उन्हात एक दिवसच काम करावं .ताका पुरतं रामायण आणी फोटो पुरत श्रमदान कुठं तरी थांबवा.तुम्हाला पाटी उचलण्यासाठी आणि टिकाव धरण्याचासाठी संवैधानिक पदावर नाय पाठवलं.माय बाप शेतकऱ्यांच्या हातातले कायमच टिकाव कसं जाईल याचा निर्णय घेण्या साठी पाठवलं आहे. लई पुढारलेल्या गप्पा मारतानार्या
पुढाऱ्यांना लांजा सोडल्यासारखं कशाचं भांडवल करावं आणि मार्केटिंग करावं याला जणांच्या नाही तर मनांच्या मर्यादा तरी ठेवा म्हणावं. गेल्या 70 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळात डोक्यावरचा हंडा आणि कमरेवरची घागर या बाबतीत विचार केला असता तर ही वेळ आली नसती.तीन वर्षात जलसंधारणाच्या बाबतीत काय केलं याच गणित कागदोपत्री नकोय? किती शेतातला उन्हाळा संपलय पीक आणि पाणी आहे.किती गावाची खरी तहान भागली हे प्रत्यक्ष फेर फटका मारून पहा मग अमक्या शिवार आणि तमक्या योजना चे खरे वास्तव कळेल.बसण्या पासून उठण्यापर्यंत सर्व कामे करणारे मशीन तयार आहेत. यंत्र युगात जगतोय हे सगळं असतांना "महाइव्हेंट" कशा साठी परत या गोरगरीबांच्या रक्त गोठून तयार झालेल्या घामावर स्वतःची राजकीय पोळी भाजायची का ? घरात वातानुकूलित; गाडीत ए सी; बाथरूम मध्ये एसी; आहे.म्हणून तुमच्या बुडाला गरम लागत नाही.पन बारा महिने आणि चोवीस तास राबणाऱ्या हातांना परत या महाइव्हेंट च्या नावाखाली राबायला लावून गाजर दाखवू नका.बीड जिल्ह्यासाठी सरकार म्हणून काय जबाबदरी पार पाडली हे अगोदर सांगा किती प्रकल्प पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे पूर्ण केलं .अधूर्या आणि अपुऱ्या प्रकल्पाचं वीस वीस वर्षाचे घोंगडे आडल कुटं? सिंचन विहिरी आणि शेततळी या बाबतीत आग्रह सोडून अंमलबजावणी कधी ? सिंचन घोटाळ्याच्या नावान तेल लावून बोंबलत होता त्याच काय झालं ? या प्रश्नाची उत्तर द्यायचं सोडून फोटो सेशन चा "महाइव्हेंट" ची चांगली मार्केटिंग चालू आहे.तुमचं अपयश झाकून ठेवण्यासाठी चा केविलवाणा प्रयत्न करू नका. सुंदर अप्सरा लग्नाला सजवायची अन स्वयंवर सांगून गाढवाच्या लग्नाची गोष्ट करायची.ही गत तुकडा टाकून पोट भरत नसत.तसे बक्षिसाचे अमिष दाखवून कायम राबणाऱ्या लोकांचं रक्त आटवू नका? वर्षातून एक दिवस ठरवा सगळे अधिकारी आणि पांढरपेशी बगळे शेतात आणून फक्त येक दिवससक्तीने काम करायला लावा.मग महाइव्हेंट मध्ये पाच मिनीटं केलेली फोटोग्राफि' दिवस भर करा. म्हणावं ! पन घामाचे सवंग लचके तोडायचे थांबवा. कोटीच्या घोषणेचे मुरलेलं पाणी आणि पाणी योजनेच लीकेज काढलं तरी.बिना घामाचा शिवार पा पाणेदार होईल.
सामजिक जबाबदारी ची जान ठेवत पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून लोकजनचळवळ उभी राहिली.हे कौतुक आहे मात्र आपलीच पाट आपण किती दिवस थोपटून घ्यायची. कर्तव्य करण्यात आणि जबाबदरी पार पाडण्यात सरकार कमी पडतंय का ? बीड जिल्ह्यातील अनेक मूलभूत प्रश्न सोडवणे बाकी आहे? त्यात पाणी या गंभीर प्रश्नावर फक्त तोंडाला पाने पुसून भागणार नाही. घामानं माखलेली बनेल अन खडीच्या साली पोटाची भूकेसाठी चे हाताला पडलेले घट्टे आणखी भूजले नाहित ! प्रत्येक हात राबत होता.तेव्हा पासून आज पर्यंत केलं.बदल काय झाला तर झोपडीतले प्रश्न सोडवण्यासाठी बांधण्यात आलेली विटा माती ची ऑफिस आज आर सी सी झाली.ऑफिसमधे बसणारी जनसेवक जनतेकडून सेवा करून घेण्यात मग्न झाली. कधी गरिबांच्या रोटी चा विचार झालाच नाही.त्या राबणाऱ्या हातांच्या जागी मशीन आलेच नाही.म्हणूनच की काय पून्हा दोन पायांची माणसे मशीन प्रमाणे राबवून घ्यायचा माणस ठेवून तर हे होत नाही ना ?
वाटलं होत अधिकाऱ्याच्या आणि नेत्यांच्या हातातील कुदळ आत्ता शांत बसणार नाय ! फावडयाच (खोर)अन पाटी (घमेंल )चे ही शीन फिटणार शेवटी हात लागला नव्हं का ? महाश्रम दाण च्या पटावर सगळंच कसं "झाक" असतं. डपड वाजत असतं रुबाब झाडणारांची संख्या कमी नसते. असो पन खरं काम करणारी माणसं बाजूला राहतात.त्यांचं कष्ट आणि श्रम हे लक्षात घेतले जातच नाही हे दुर्दैव .शासन म्हणून जबाबदरी पार पूर्ण केली तर ही वेळ येणार नाही .शेवटी गोर गरीबाच्या महाश्रमाचा फक्त सेल्फी पुरता "महाइव्हेंट" होवु नये.तसेच महाश्रमाचे महा शोषण थांबवावे ही अपेक्षा .
सुरेश जाधव "लक्ष्मनसूत !
एकदम बरोबर आहे साहेब,आपण जे लिहिलं ते सत्यच आहे
ReplyDelete