Sunday, 22 July 2018

समतेचे क्रांतीस्थळ ,भक्तीचे वाळवंट - पंढरीची वारी


आषाढी एकादशी

आता विश्वतमके देवे !या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानांच्या मागणी मधील सर्व समावेशक तत्व हें वारकरी संप्रदायांच्या व्याप्ती आणी मर्यादा या बाबतीत बोलकं आहे .वारकरी विचार धारेने आजवर जी आदर्श घालून दिली.त्यामुळे समाजिक मूल्यांची बीजारोपण 12व्या शतकां पासून आजवर या मातीत तशीच जिवंत आहेत . भेद भाव तोडोणि घेतला प्रेमाचा गरळा। शुद्ध नाम श्री हरिचे लागला निज मुखी टाळा । हरी स्मरणाचेणी बळे अंकित केलें कळीकाळा । एका जनार्धनी अखंड सुख सोहळा ॥ 

या अभंगाच्या द्वारा भेदाच्या भिंतीनां मूठ माती देत अभेदाची अभेद्य विचार धारा तयार केली. त्या सर्व संत मंडळीनी  समाजिक क्रांती चे हबूक याचं पंढरी च्या वाळवंटात ठोकले होते. कर्मकांड आणी धर्ममार्तंडा विरोधात प्रबोधनाची चळवळ या वेळी सक्रिय झाली यांचे सूत्रधार-ज्ञानोबा यांच्या खांद्याला खांदा देवून चोखा मेळा होतेतर संत कबीर मोमीन हें मुसलमान होते.सेना नाव्ही -होते अशा अनेक संत मंडळीनां एकत्रित करून गोरोबा आणी संत नामदेव यांनी कीर्तन सुरु केलें यावेळी मुक्ताई जनाई गोनांई या कीर्तनात सहभागी असतं .ही समाजिक समानतेची गुडी याचं कीर्तनात उभी राहिली.

समर्थाच्या पंक्ती भोजने । तळील्यावळी ल्या एकची पक्वान्ने ॥
या प्रमाणाची प्रचिती येत असे.ज्या वेळी स्पृश्य-अस्पृश्य तेच्या संकल्पना मानवी मूल्य आणी माणुसकीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करतं होती त्या वेळी पंढरपूर मध्ये  सर्वाना एकत्रित करुन वाळवंटात  "काला"  करण्यात आला.यात
 एक मेका घालू मुखे।  सुखे घालू हुंबरी॥
भानुदास गीती गाता । प्रसाद देत पंढरी नाथ।

या विचाराच्या परिपक्वतेणें  रूढ परंपरा वर वार केला.म्हनून वारी ही आज सर्व अंगाने महत्वाची आहे, वारकरी या शब्दाची महती इथून सुरु होते.

खट नट यावे शुद्ध होवूनही जावे । दवंडी पिठी भावे चोखा मेळ ॥

यारे यारे लहान थोर । याती भलती नारी नर ।

आदी करुन वेश्या ही।  ही आरोळी त्या वेळी ठोकणे हें काही कमी कमालीचे धाडस नव्हते .म्हनून तर समाजिक क्रांती चे वाळवंट हेच शक्ती स्थळ होते तर विठोबा हा शक्ती देवता होता.याला भेदाचा विटाळ आहे.म्हनून तर आज संपूर्ण देश भरतील वारकरी या वारीला वेडावला आहे. या वारी च्या माध्यमातून खूप मोठी जाणीवेची उत्क्रांती झाली. संसारात थकलेला जीव या भोळ्याभाबडय़ाचा देव । पांडूरंगाच्या चरणी लीन होतं.संकटांशी दोन हात करण्याच बळ घेवून जावू लागला.

देवा सांगू सुख दुःख । देव निवारिल भूक या !

हा विश्वास या विठाबाई च्या बाबतीत आहे. म्हनून तर लाखो लोक ऊन वारा पाऊस व्यवस्था अव्यवस्था या बाबतीत विचार न करताना पंढरीची वाट धरतात. या वाटेवर जो भेटलं तो त्यांच्या साठी माऊली असतो ! म्हणजेच प्रत्येक जन हा माऊली रूपात भेटतो. उंच नीच गरीब श्रीमंत हा भेद मुळातच नसतो.यात वैचारिक देवानं घेवाण या बरोबर भावनिक आधार देणारी माणसे अर्थातच" माऊली" यांच्या सोबत गप्पा मरताना मनावरील दुखाचे ओझे  हलके होते.कित्तेक सासुरवाशीण आणी कित्येक सून पीडित, पती पीडित येव्ह्डेच नाही तर पत्नी पीडित या दुःखाला  अश्रू वाटे मोकळे करुन देता. माऊली जाऊ द्या!  हें आधाराचे वाक्य शक्ती आणी बळ देणारं असते.या बरोबर संसाराचे  मिथ्यत्वं सांगणारे संताचे अभंग स्व त्वची जाणीव करुन देतात.यामुळे वारीतील काकडआरती अभंग नाटाचे अभंग आदी अभंग सहज कानांवर पडतात. त्यातून दुःख निवृतीचे  अमृत शिंपडलें जाते.ते असे


 संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ । विश्रांती नाही कोठेरात्र दिवस तळमळ ।
काम क्रोध शूनी पाठीलागले ओढाळ । कवनामी शरण जावू द्रुष्टि देई निर्मळ !

या सर्व अभंगाच्या माध्यमातून संसारी रंजल्या गंजलेल्या जिवांना  जागे करण्याचे काम केलें जाते म्हनून वारकरी तत्व ज्ञान हें उद्धार करणारे आहे.

आषाढी कार्तिकी एकादशी च्या निमिताने एकत्रित येणारा वारकरी चंद्र भागेच्या वाळवंटात पाऊली खेळतो । एक मेकाच्या हातात हात घेवून विठ्ठल विठ्ठल गजरात न्हाऊन निघतो .तो त्यांचा भक्ती भाव आणी श्रद्धा विश्वास महत्वाचा असतो.नित्य नियमाने  आयुष्याच्या जगण्याच्या बळ घेवून जाण्यासाठी वारकरी विठ्ठल चरनी लीन होतात. वर्षभर ती ऊर्जा जिवंत राहते. म्हनून तर सामान्य लोकांच्या प्रेमाचा आणी विश्वासाचाठेवा अर्थात विसावा हा विठोबा आहे.

याचं वारीतील प्रत्येक बदल हा टिपण्याजोगा आहे. प्रबोधनांची पंढरी विधायक वारी ही संदेश देताना.सर्व अंगांचा विचार यात दडलेला आहे.याचं कारण ही तसंच आहे. यावर्षी स्वच्छ वारी निर्मळ वारी हरित वारी व्यसन मुक्त वारी , प्रदूषण मुक्त वारी .जाती निर्मूलनांची वारी, अशा अनेक अंगणाने आज भरून पावत आहे. यातच आधुनिक वारकऱ्यांची संख्या वाढली सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जगातील प्रत्येक देशात वारकरी तयार जाहले आहेत  विश्वस्वधर्म सूर्य पावो ।  या ज्ञानोबा च्या संकल्पनेची अनुभूती येत आहे. राजकीय, समाजिक, आर्थिक , माणुसकीच्या मळ्याला नवं संजीवनी देणारी वारी अनुभवातून कळते.

ज्ञान विज्ञानाची कास धरायला लावणारा "विठ्ठल "हा अध्यात्माचा विसावा आहे. तर विठ्ठल भक्ती ची पताका अखंड फडकवत ठेवणारे  वारकरी या भक्तीमार्गातील नंदादीप , प्रकाश दीपस्तंभ , आहेत.म्हनून तर

पंढरीशी जारे आल्यानो संसारा।  दिनाचा सोयरा पांडुरंग ॥ 
वाट पाहे उभा भेटीची आवडी । क्रूपाळू तातडी उतावीळ ॥ 
मागील परिहार पुढे नाही शीन।झालीया दर्शन एक वेळा॥ 
तुका म्हणे नेदी आणीकांच्या हाती । बैसला तो चित्ती निवडेनां ॥ 

या अभंगाची अनुभूती घेण्यासाठी या माऊली -- हा सोहळा आनंद । तुका म्हणे नाही भेद ॥ 

आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा !


प्रा.सुरेश महाराज जाधव (संत साहित्य अभ्यासक )
श्री बंकटस्वामी महाराज मठ नेकनूर
मो -9404204008

No comments:

Post a Comment