Tuesday, 13 February 2018

नाक कापल तरी ------ शिल्लक आहेच ! कारण गलिच्छ राजकारण चिंगारी पेटलीय वणवा पेटेल

नाक कापल तरी ------ शिल्लक आहेच ! कारण गलिच्छ राजकारण

चिंगारी पेटलीय वणवा पेटेल

(वळखण ) मातीतल्या माणसाचा मातीत जाई पर्यंत चा संघर्ष माणुसकी च्या नात्याने समजून घेता येईल का ? अस्मानी सोबत सुलतानी जीवावर उठते तेव्हा वाली कोण हा प्रश्न आजही अधांतरी च आहे. आत्महत्यावर  राजकारण करणारे  सर्वच जण  एका माळेचे मनी आहेत.राजकीय पोळी भाजण्यासाठी सरनाची  होळी  कमी  पडते की काय? याचा विचार  करतात लोकांच्या सेवेची हमी देणारे हमखास धोका देतात याच  उत्तर  70 वर्षाच्या स्वातंत्र्यात मिळाल नाही. जगण्याचा संघर्ष थांबला नाही तिथे आश्वासन देण्यात आणि स्वप्न दाखवण्यात डिजिटल पणा आलाय.खर तर चटणी मीठ  पाण्या सोबत ओली झालेली हक्काची भाकर मिळण्याचे स्वतंत्र जरी देवू शकलात तरी महापुरुषाचे लोकशाही चे स्वप्न पूर्ण होइल.अन्यथा इथली संवेदना विरहात स्वार्थी लबाड मंडळी लोकशाही चे कधी न सरनारे  ग्रहणच म्हणाव लागेल

---- लोकांच्या अन्नात माती कालवणाऱ्या लोकां नि जणांची नाही तर मनाची तरि बाळगा! विकास होईल ही भोळी अशा घेवून जगणारा मतदार तरी कुठे राहिला आहे ,आणि अजेन्डा घेवून वागणारा उमेदवार तरि कुठं राहिला ,कारण !सत्ता आणि पद हे जर लोकशाही चे भ्रष्टाचार पोसनारे कुरन असेल तर ,सामान्य मतदार त्याचा हक्क बजावत नाही तर ,या कुरणाला कुंपण लावत आहेत ,समिकरण ठरलय ,राजकारणात भांडवल गुंतवताना किती पट परत येईल याच गणित मांडलेल असत ,किती उल्लू बनवता राव ,एका रस्त्याला 10 नावं ,गावातल्या पाण्यात पाप ,आणि लोकांच्या अन्नात माती कालवणाऱ्या लोकां नि जणांची नाही तर मनाची तरि बाळगायला पहिजे . ज्याच्या बूढ़ा खाली सायकल नव्हती तो आज जनतेच्य छतडावर  एसी च्य गाड्या घेवून फिरवतो.हे कस शक्य होत ,गोर् गरीब लोकांच्या मुलाच्या खाऊ मध्ये डोकावनारे ,खाऊ राजकारनात आल्याने कुठली लोकशाही सम्रध होणार हा खरा प्रश्न आहे  बहिणी बाळी च्या कुंकवाला दारूचे व्यसन लावून समाज भूषण म्हणून मिरवणाऱ्या षंड आणि स्वःतला गुंड म्हणवून घेणार्या लोकांनी समाजाची इज्जत वेशिला टांगली आहे !

आर ! बस करा या तमास गिराचा कलुशित गैर व्यवहार ,नीति आणि मती गुंग झाल्या नंतर राजनीति च्या नादी लागलेल्या माकडा गत अवस्था आज यांची झालीय , लोकांची ----पुसण्या पर्यंत पुंड पुंड करणार्या आवलादी ची कमी आज  राजकारणात  नाही .

    त्यांच ही एक परती खर लोक घड़ी चा विचार करतेत तिथं पीढ़ी चं त्यांना काय देन घेण !पण आयुष्य बर्बाद करून मताचा घोळ आणखी कळून घेवु शकले नाहित तर भोगा आपल्या कर्मची फळ ! सुविधाच्या नावान असुविधा निर्माण करून समाजाला उध्वस्त करणारी लोक संधी साधु टपुन आहेत !
       लोक प्रतिनिधी म्हणून छक्के पंजे करण्या पेक्षा हे काय करतात . गाव आणि स्वःताची मानस ज्यालोकाना फक्त नावं वापरण्यासाठी लागतात त्या ठीकाणी राक्षसी वर्त्ती बळावलेली असतें ! कधी कधी नाक कापल तरी भोक शिल्लक आहे अस म्हणणारे काहि कमी नाहित ,आन ,भाका घेवून आणि पदरात घ्या म्हणणारे आणि  ,लोकमातेच्या पदराला भोक पाडून मातेचा पदर फाडनारे आज ही औसा पुणवेला उगवत असतात.अरे हलकटा नो कुठंल्या तोंडाने मत मागता !लाज वाटू द्या .स्वतःच्या स्वार्थ ची झोली भरण्यासाठी बंगल्यावर बंगले बंधून ,भूत पैदा करण्यासाठी आणि पोसण्य साठी  हे जर करत असाल तर याद राखा , तर छी थूक आहे तुमच्या जिन्याची ,दाडा आणि झेंडा कोणता यापेक्षा कोणत्या लोकांच्या समस्या सोडवूं शकतो याच चित्र माँडा म्हणावं ,काय लागत ओ सामान्य लोकांना ,कोणत्या?गरजा आहेत त्यांच्या जरा समजून घ्या !नुसते जाहिर नामे आणि प्रचार सभा घेवून लाखो रुपयाच्या उधळण करून मिळवलेला विजय आणि त्यानंतर निर्माण झालले प्रश्न हे वर्षानूः वर्ष तसेच आहेत !उन्माद आणि माजोरी पणा आता सोडून द्या ,तुम्हि मेंबर नंतर आहत आधी गावात माणूस आहत याच भान विसरून कस चालेल!बर् लोकशाही मध्ये पद आणि अधिकार काय कुणाच्या बापाची जहागिरी थोडीच आहे ! जे जमत नाही तें पुन्हा करण्याचा प्रयत्न का करता ! आत्ता तू नाही तर तुझा बाप दुसरा अस म्हणून धडा शिकवणे गरजेचं आहे!

शेवटी माझ पोरगं कुटं शिकल ,पहिजे पोरगीने काय केल पाहिजे घर कस असल पहिजे !दार कुटं  हे जस ठरवता ना .मग! विवेक जागा असेल तर माझा समाज कसा आहे ,कदाचित तो मझ्या आयुष्याशी तितकासा महत्वाचे नसेलही पण परिणाम करणारा तर नक्की आहे ! या कडे मी डोळस पणे लक्ष दिल पहिजे !पाच वर्षा साठी आपल प्रतिनिधीत्व आपन मत देवून बहाल करणार आहोत !फक्त नंतर लाज वाटू देवू नका आत्ता वेळ आहे , पुन्हा ------:----- म्हणण्याची वेळ येवू नये !

 इतिहास बदलायला मशाल गरजेची असते आज बेरोजगार आणि बेकार  युवक एकत्र  होवून  संघर्ष  करत आहेत.इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेत ला प्रश्न  विचारत  आहेत  याला दुर्लक्ष करून चालणार नाही शेवटी. चिंनगारी  छोटी असली तरी  वणवा पेटवायला कारणीभूत  असेते !


सुरेश जाधव

Sunday, 14 January 2018

"ती"चा कुंकवा शिवायचा संघर्ष ---! व्यथा


"कुंकवा विरहीत आयुष्य म्हंजे समाजाने पेट्वलेल्या सरणावर धूपत धूपत जळणे" धड पेट ही  घेईना आणि विजुन ही जाईनां!

कुंकू तस सौंदर्य अलंकारांतील एक भाग मात्र कधी ते भाग्य- अभाग्य आणि सौभाग्य या समाजांच्याखुळ्या कल्पणा आणि  समजूतीचे वर स्वर होवुन ते जीवन मरणाचे प्रतीक तर नाही ना? याचा विचार कारवांच लागेल --स्वतंत्र पूर्व काळात सती प्रथा बंद करण्या साठी चा संघर्ष आज विधवा प्रथा बंद करण्या साठी आवश्यक आहे --त्या वेळी एकदाच्या मरणाने दुःख संपत होते--मात्र आज कुंकवा विरहीत आयुष्य म्हंजे  समाजाने पेट्वलेल्या सरणावर धूपत धूपत जळणे 
धड पेट ही  घेईना आणि वीजुन ही जाईनां अशीच काही स्थिती असते --यात दोष काय असतो "त्यांच्या" मरनाने मरून गेलेला जोडीदार मात्र "हिच्या" आयुष्यत समाजाच्या विखारी आणि विषारी बिजाची पेरणी करून जातो 

हळदी कुंकवाचा सण म्हणजेच मकरसंक्रांती  प्रेमाचे स्नेह मिलन आणि दुःख वेदनेवर  फुंकर घालून आनंद गीत गात महिलांनी धरलेला फेर हाच या सणाचा मुख्य उद्देश -- मात्र या उत्सवात तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश ही दिला जातो पण खरंच आपण अस वागतो का ? आपल्याच घरांतील जिचा पती वारला "ती" -- मुलगी.आई .बहिण चुलती मामी आत्या मावशी  या  महिलांना आजच्या दिवशी सन्मान देतो का ?  संक्रांतीची साडी घेतो का ? हळदी कुंकू जावूद्या पण तीळ गुळासाठी सन्मानाने बोलावणार आहोत का ! तर  या शुभेच्छाला  महत्व आहे - नाही तर संस्क्रुतीच्या  नांवाने गळे काढून कित्येकांच्या भावविश्वाचे बळी घेणार आहोत! पती पत्नी च्या पवित्र नात्यांत दुर्दैवाने अकाली जोडीदार गमावलेल्या ती च्या बाबतीत थोड़ा विचार केला तर बर  होईल.कारण "ती" सुद्धा समाजातील माणूस म्हणून जीवनाचा संघर्ष करणारी आहे --एका कार्यक्रमात गेलो आणि जे पाहिले त्याने चीड आली कुटल्या आधुनिक युगात जगतो की अश्मयुगात या प्रश्नाच उत्तर मिळालं नाही!

वाजंत्री वाजवत होती .तरुणाई नाचत होती--निमित्त होत लग्नाच्या हळदी समारंभाच  सर्वजण आनंदात होते.नवरा मुलगा पाटावर येवूं बसतो --हळदी च ताट पुढं येत तसी नवऱ्या मुलांची बहीण ते ताट हातात घेवून हळद लावण्यासाठी समोर येते हळद सुरू असते.पण त्याचं वेळी मुलींची मोठी बहीण हळद लावण्या साठी ताट हातात घेते तेव्हा "ति"च्या हातुन ताट हिसकावून घेण्यासाठी स्पर्धा लागल्यागत धडपड सुरू होते .हळद लावतांना हातातील ताट विस्कवून घेण्यात आल् याच कारण तिचा पती काही दिवसा पूर्वी मयत झालेला होता.बहिणीच्या अंगाला हळद पण लावता येत नसल्याने स्वताच्या नशीबाला दोष देत डोळ्यातलं पाणी आवरन्यासाठी कोपऱ्यात जाऊं अश्रू ला वाट वेगळी करून देणारी दुर्दैवी बहीण  पहिली आणि धस्स झाला --- डोकं सुन्न झाल 


बऱ्याच शुभप्रसंगी (चांगल्या कामी)जस की लग्न मुंज आदी करून आनंदच्या प्रसंगी आपण (जिचा पती वारला) "ती" या बाबतीत काय विचार करतो --जरा लक्षात आणा!  भावाचं लग्न होत असतांना हळद लावण्याचा मांन कलवरी म्हंणुन बहिणी चा आहे .मात्र कुंकू नसेल तर कित्येक बहिणीला रोखलं जात --काय वाटत असेल यांनी यात तिचा काय दोष --या पुढे ओवाळणी करणं ओटी भरणं आदी.महिलांच्या कार्यक्रमात या माऊली कडे तोऱ्यात मिरवणाऱ्या कुंकू वाली कडून वारंवार हिणवले जात एव्हडंच काय तर --कां काय होत जर का तीन भावाला हळद लावली ओन्टि भरली तर काय होणार आहे पण नाही आणखी बुरसटलेले विचार डोक्यातून गेलेच नाहीत. दुर्दैव आपण फक्त कुडा च्या घरातुन सिमेंट च्या बंगल्यात आलोत "भिंताड" सुधारली पण "छाताड"नाही याच वाईट वाटत 

-दुःखी माणसाला आधार द्या त्याचे अश्रू पुसा हे सर्व ग्रंथ शास्त्र सांगत आणि आपण काय करतो त्यांच्या जखमेवर मीठ सिंपडतो. ईथेच थांबतो का तर नाही उलट तिच्या कमजोर पोकळी ची जाणीव सतत व्हावी या साठी वारंवार टाळलं जात.बोलूं तर कधी क्रतीने हेटाळल जात हे विचित्रच आहे एकीकडे समतेचे झेंडे मिरवून स्त्रीपुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरिकडे सुशिक्षीत लोकांनीच "सुवासिनी"सौभाग्यवती"या मोठं विषेशनांच्या नांवाने पुन्हा दुसरी दरी निर्माण करायची .यात पुरुषा पेक्षा महिला जास्त जबाबदार आहेत.कुटल खुळ डोक्यांत घेतील समजत नाही.मात्रा "ती" अव्हेर न्याची कोणतीच संधी सोडत नाहीत.

प्रवास असो की सामाजिक प्रसंग यात कुंकू नसलं की टपून बसलेला डोम कावळे  आणि त्यांच्या विषारी भेदक नजरा चुकवण्यासाठी करावी लागणारी धडपड ही  "ती" ला रोजचीच असते येव्हडेच काय तर त्रास देणारे आणि चोच मारणारे कावळे यांच्या पासून संरक्षण व्हावं म्हणून  छोटी टिकली लावते अस एका माऊली ने सांगितलं --

जन्म आणि  मर्त्यू कोणाला  चुकलाय का ? मग  जिवंत माणसाकडे आपण एव्हड्या हिंन भावनेने का पाहतो ! की त्यांच्या माणूस पणावरच आपलां संशय आहे --सुखाने जगण्यासाठी माणसाने समाज निर्माण केला यात समाजातील कुटुंब संस्था ही प्रमुख समजली जाते  --पुरुष आणि स्त्री ही  संसार रुपी रथाची दोन चाके असतात --मात्र कधी कधी या  सुंदर रथाला नियतीची द्रष्ट लागते आणि  एक चाक निखळून पडते --मात्र जबाबदारी चा रथ एका चाकांवर सुरू असतो यात पुरुष असेल तर "नवं"चाक म्हंजेच दुसरं लग्न करायला लगेच तयार होतो मात्र स्त्री ला याची संमती दिली जाते का ? तर याचं उत्तरं नाही असंच येतं काही ठिकाणी मिळतंही  असेल परवानगी पण क्वचित -बरं मग या संसाररथाच्या जबाबदाऱ्या पेलताना काय वाढून ठेवलं जात याची कल्पना केली तरी अंगावर काटे उभे राहतात -- लग्नात शुभेच्छा आणि भेट वस्तू घेवून आलेले नातेवाईक अशा दुःखद प्रसंगी श्राध्द झालं की मोकळे होतात आणि सुरू होतो तो  नसंपणाऱ्या आयुष्याच्या प्रवासाचा टप्पा ज्यात "ती" एकलीच असते 


 हाडा मांसाची आणि रक्तानात्याची माणसे ज्यांच्या  आशीर्वाद आणि शुभेच्छाने  "ती" चा सुरू झालेला सुवासिनीचा सुमधुर प्रवास मात्र पती च्या अकाली जाण्याने खडतर होवुं जातो --पती निधनाने "ती"च  आयुष्यंच हिसकावून घेण्याचा समाज प्रयत्न करतो अस करणारे  काही दूर चे नसतात मात्र खुळचट रुढी आणि परम्परा यांचे पालन करण्यांत आसुरी आनंद मिळतो का यांना--दुःख सागरात बुडालेल्या त्या असाह्य माऊली ला आधार देण्यायाऐवजी कुंकू पुसण्याची  आणि मंगळसूत्र तोडण्याची घाई का असते --तसही चालतं बोलत आधार देणार माणूस निघून गेल्यावर निर्जीव रंगात आणि धातू मधें काय असतं --त्यांची आसक्ती थोडी असते? जीव लावलेलं माणूस निघून गेल्यावर कशात जीव अडेकेलं का पण किती --निष्ठूरपणे सर्वा समक्ष कुंकू पुसणारी आणि मंगळसूत्र तोडून दुःख सागरात डकलुन देणार्यानी  तिच्या वेदांनाचा विचार केला कां? जखमेवर मीठ चोळनारी  ही  कुटंली घाणेरडी मानसिकता थांबलं पाहीजे कुटं तरी हे कुंकवाशिवाय चा संघर्ष काय असतो तो नाही कळणार --?

ऐन तारुण्यात वादळी आयुष्याची सुरुवात करून स्वप्नांच्या पाऊलवाटा शोधणाऱ्याला मनाला असा अचानक धक्का बसतो आणि आयुष्याची सुंदर रांगोळी विस्कटू जीवनाची घडी बिघडून जाते -- यात समाजाने कूट तरी "ती"ला सावरलं पाहिजे.आधार देवून सन्मानाने वागवलं पाहिजे .जगण्यासाठी चा संघर्ष तर  प्रतेक जण करतो मात्र अशा प्रसंगी धीर आणि आधार महत्वाचा असतो.

एकीकडे शहिदांच्या बाबतीत विचार करतो पण  वीर पत्नीला सन्मानाने जगू देतो का ? यांच आत्म परीक्षण व्हाव -- या संक्रांति दिवशी विधवाना सन्मानाने वागणूक देवून त्यांच्या बाबतीत विचार करायला लागलो तर खरी संक्रांत गोड होईल-- 


काल काकड हिरा  गावात अशीच वेगळी संक्रांत पहिली आनंद वाटला -- मनीषा जायभाये आणि प्रतिभा हावळे या दोन शिक्षिका विधवा प्रथेविरोधात चळवळ उभी करत आहेत.काल रात्री ही संक्रांत  85 विधवा महिलाना तिळगूळ आणि साडी वाटप करून संपन्न झाली---अशादायक चित्र समोर उभा राहील चळवळ व्हावी.


सुरेश जाधव 
9404204008

Tuesday, 2 January 2018

फक्त दगड त्यांचे होते! फेकणारे हात आणि फुटणारी डोकी आमचीच होती


फक्त दगड त्यांचे होते!  फेकणारे हात आणि फुटणारी डोकी आमचीच होती

सड्कि डोकी जरा शांत ठेवा! किती दिवस इतिहासावर दगड मारणार!

विचाराचा इतिहास शिकवणाऱ्या महापुरुषानी जाती वादांची बंधने  झुगारून  निकोप  समाज निर्मिती  साठी  दिलेलं  बलिदान आज आम्ही  विसरलो अहोत  काय?

बुरसटलेल्या मेंदू वाल्याच्या सडक्या डोक्यांन  पुण्याच्या शांतंतेत  मीठ टाकलं विध्वंसक मानसिक तेणें  पुन्हा  बहुजनांच्या पोरांना तोफेचा गोळा  करुन ठिणगी पेटवली खऱ्या इतिहासावर दगड मारून तो  काय पुसला जाणार  होता का मात्रं किळस वाना त्यांचा प्रयत्न होता यानं आमचं खुप मोठं नुकसान  झालं ओ जाती च्या मोर्चा ने निर्माण  झालेली  दरी  आणि दुरावले मन विसरून  माणूस कसा बसा एक येत होता त्या ऐकतेला खिंडार पाडन्याचे शड्डयंत्र रचल गेलं  आणि  त्यात आमची  पोरं भरडली  गेली हातात  दगड दिली बसले तमाशा पाहात! फक्तं दगड  त्यांचे  होते!  फेकणारे हात  आणि  फुटणारी  डोकी आमच्याच बांधावाची होती! कायदा  हातांत घेतो तेव्हा कायद्यांच्या  कचाट्यात अडकनारे पण आमच्याचं समाजातील  कोणाचे नातेवाईक नक्कीच  असणार  त्यांचं  भविष्य काय ? कुटुंबाचं काय? का  फक्तं --बदला आणि सूड ज्याला बुड टेकवायची  अक्कल नाही त्यांला सूडाच्या मागचं गूढ राजकारण काय कळणार! इंग्रज  गेले पण  200 वर्षा नंतर भेद  नीती तशीच आहे तोडाफोंडा आणि राज्य करा. काय?  डोकी गहाण ठेवल्यागत वर्तन  सुरू आहे.इशाऱ्यावर नाचणारी आणि शिकवलेलं बोलणारी पीड़ित पिढी निर्माण होते हेच दुर्दैव. यातच  जातीवाद आणि समाज कारणाचे  अर्ध हळकुंड उगाळून पीलेली काही भगवी  झालित तर  काही निळी पिवळी पडली आहेत.हीच ब्याद तर मुळांवर आलीय.वैचारिक लढा उभारुन प्रश्न सोडवन्यपेक्षा खऱ्या खोट्या भूतकाळावर आज युद्ध सुरू आहे. हे  अतिशय चूक आहे. या  विघ्नसंतोशी व्रतीच्या मुसक्या आज  ना उद्या आवळ्या जाणारच आहेत.

 
गुण्या गोविंदा ने हातात हात घालुन ताटाला ताट नाही  तर ताठ माने ने ताटात जेवण करणारी आमच्या पिढी ची घडी बिघडवू पाहणाऱ्यां शन्ड लोकांची तोंड पाहायची इच्छा नाहीए!  शिकणाऱ्या लोकांची डोकी जास्त भडकतात का? चूक  बरोबर  खरं  खोटं  याची  चिकित्सा  सोडा  पण  शहानिशा पण  करायचं  सोडून  बेताल सोशल मीडिया वर  स्वार व्हायला तयार  होतातच कसे ? वाईट वाटत ज्यांच्यात आपण  वावरतोय  त्यांच्यावर  दगड  कसाचं  उचलला  जातो  घटनां भीमा कोरेगाव ची निंदनीय आहे निषेध आणि  फक्तं निषेध हेच प्रत्येकाचे उत्तर आहे  पण आज  महाराष्ट्रातील गावा गावांत विश्वासा च्या भिंतीचे अंतर आता भीती वर पोचले विश्वासाला तडा जायची वेळ नाही तर परिस्थीती निर्माण झाली!शहरात भागत ओ  कर्फ्यू लावून. आठवड्याचं नियोजन असतं आणि  पर्याय  ही असत्यात. गावांत काय करणार पोट भरण्यासाठी आज ही रोजंदारीवर जावं लागत तेव्हा चूल पेटती त्यात तुमच्या असल्या दगड  फेकीने आमची संस्कृती उध्वस्त होती. या च्या  परिणामांचा कधी  विचार  होणार  आहे  का ? पुन्हा मुहल्ले नगर आणि वाड्यात विभाजन करायचं ! रोज  एक मेका ची तोंड पाहणं चुकणार आहे का ! नाही  ना  मग  गरम  डोकं  जरा  शांत  ठेवा ! बाबासाहेबाची लोकशाही आणि संविधान  तुमच्या सोबत  आहे  ना ! जगाला  शांतता काय असते  हे  शिकवणारे  आमचे आदर्श युगपुरुष बुध्द आमच्य बुद्धीत आहेत का ? फक्तं  फोटो पुरतेचं यांचाही विचार होणं गरजेचं आहे!

कालची घोषणा ऐकली आणि वाईट  वाटलं नमो तस् भगवतो अर्हतो-- या  प्रार्थनेचा वेगळाचं  वापर केला यातचं बुद्ध नको  युद्ध हवं हा  सूर तरुणाई आळवत  होती! ही  धोक्याची  पूर्व घंटा आहे कां याचा  विचार  हिं  व्हायलाच हवा.समाज जीवनाचे खरे तत्व माणुसकी आम्ही  विसरत अहोत.जातीवाद पुन्हा प्यारा वाटू लागलाय इथे माफ करा बाबा मात्र आम्ही  चुकतोय हे कळत असूनही वळत नाही! उचलेला  दगड जशी जात विचारत नाही तो  त्याच  काम करतो तसं फूटनारी काच कितेक तुकड्यांत विभागतें तिच्या नुकसानीचं मोल लावता येत! कदाचीत त्याची  किंमत  कमी जास्त  असेल ही  मात्र  समाज मनाच्या -हदयाला पडलेली  चिर तीच काय? यांचा  विचार करा.हात जोडून विनंती.

मूठभर लोक सुशिक्षित झालेत त्यांचं सोडा खंडीभर  तसेच आहेत.भाकरी चा प्रश्न  तसाच आहे.आकाशाचं पांघरूण करुन  कुडकुडत पडलेली कुटुंब यांचे प्रश्न? कुपोषण?  झोपडपट्टीची व्यथा? शेतकरी आत्महत्या! दहशदवाद? नक्षलवाद? याचा  कधी  विचार  केला  का? दोस्ता हो!


आमची बुध्द शिव शाहू फुले आंबेडकराची लेकर जाती वादांची भाषा बोलायला लागले आपलं तूपलं  याही पेक्षा मप्लंची ची संकुचित शिकवन नडत आहे.असेच किती दिवस विष प्रयोग करणार यानं कुणाचं  बरं झालं आणि  पदरात काय पडलं  याचं ही उत्तर  शोधा. गरीबांची लेकरं दमडी कमवायचे सोडून आयुष्यं गमवायची भाषा करतात अन् पिसाळलेल्या गत बुद्धी भ्रष्ट होवुन कुणाच्याही मागे धावतात हातात पदरात  काहीचं  मिळतही  नाही  आणि  काय  करतो ते  कळत देखील  नाही अशा वेळी  कोण  जिंकतो ? कोण हरतो? या  पेक्षा समाजा ची पार वाट लागते पिढी बर्बाद होते. या क्षणांची  वाट पाहातोय का ? डोकं ठिकान्यवर ठेवा! न्याय व्यवस्था ; कायदा आणि  राज्यघटना या वर विश्वास ठेवून बाबासाहेबांच्या  संकल्पानेतूंन  साकारलेल्या खऱ्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रयत्न करा.

नसता बिघडल्यागत  असेच किती दिवस इतिहासावर दगड मारणार ! सड्कि डोकी जरा शांत ठेवा!



सुरेश जाधव
9404204008

Thursday, 21 September 2017

ठसाची" चेष्टा,कर्ज माफ़ी चे गाजर

ठशाची" चेष्टा,कर्ज माफ़ी चे गाजर किती हाडभाड़ घेणार,
----
बाळा माझे ठसे उमटत नाहीत रे ,सात दिसा पासून चकरा मारते "माय"---ते आधार कार्ड मागत हाईत,मह्य नवर्याच्या नावावर 40 हजार कर्ज हाय,-- "त्याचे" ठसे उमटले "माय" पण भांडी घासुन अन् पाण्यात काम करून माझे हात उंगळलें की काय?म्हहे उमटू नाय राहिले, तू तरी सांग बावीस तारखी पत्तूर उमटतिल का?




साठीपार करून सत्तरीच्या उमबरठ्यर असेलेल वयोवृद्ध म्हाताऱ्य आज्जी चा हा प्रश्न येकुण धस्स झाल, काठीचा "आधार" घेवुन निराधार जीवन व्यतीत करणाऱ्याला "आधार" च्या रांगेत उभाकरून  छळ चालू केलाय,अख्ही हयात कष्ट उपसुण-- हातचे कातडे निर्जीव चामडे झाले ,कित्तेक वेदने चे फोड़ संवेदना हरवल्या गत याच तळहातावर जिरुन गेले, चटणी मिटाचा मलम लावून,भाग्यरेषा न शोधता आयुष्य रेषा ओलांडणाऱ्या या लोकांना आज रांगेत उभा पाहिले आणि वाईट वाटल,

प्रत्येक बँके समोर च वास्तव खूप भयंकर आहे,यात" सेतु सुविधा केंद्र आणि आपल सरकार" यासर्व ठिकाणी कर्ज माफ़ी साठी रांगेत उभी नाहीतर आडवी झालेली मानस फक्त आशेने उभीआहेत ,यात नेट प्रॉब्लेम, लाईट अडचण,त्यात सर्वर जाम,आणि नंतर आधार मधील बोट यासगळ्याअडचणीचा सामना करत गावापासून बीड पर्यतचे 15 कीमी अंतर कापून आठ दिवस चक्रा मारणार्या याआज्जी आजोबाचे काय चुकलं वो-- बीड तहसीलच्या समोर आधार दूरूति केंद्राच्या रांगेत झाडाखाली बसलेले कुटुंब--- तोंडावर सुर्कुत्य पड्लेल्या आणि थोडा काळजी वजा खिन्न चेहरा,हातात कागद हिरव लुगडे आणि डोक्यावर पदर घेवुन नंबर येण्याच्या प्रतिक्षेत बसलेल्या आजी आणि ताटकळत उभा राहून वैतागून आडवा झालेला त्या म्हातारी चा म्हातारा , मळकट फडक्यत बांधून आणलेली भाकरी,अन् येण्या जाण्याचा होशोब करणारी आणखी काही अनपढ़ मानस, येकर दोन एकर चे मालक पण पूर्ति पंचायत करून टाकली ,आठदिवस चक्रा मारून आधार ने अडवले, शेवटी ठश्याच्या दुरुस्ती न झाल्याने हे कुटुंब पुरते वैतागून गेलय --

गावातिल प्रत्येकजण सुशिक्षित आहे या अवीर्भावाने कर्ज माफ़ी चा फॉम दीड मिनिटात भरन्याचा दावा  मुख्यमंत्री साहेब करत आहेत,एसी च्या खोलीत, बदामचा शिरा तुंप टाकून गँसवर करून खावू घालनाऱ्या तुमच्या मँडमच्या बोटाचे ठसे बघून तुघलकी निर्णय घेतायराव,बाँधावरच कष्ट करून हातावर कूट रेषा राहतात का? जरा ईचार करा दमडी भर कर्जा साठीचामड़ी ची अट कशाला लावता,तिकडे गोर्या कातड्याच्या लोकांसनी विनाअट न मांगता कोट्यावधी देताराव,हा कातड्याचा दोष की सड़क्या मेंदूचा सांगा तरी, साहेब वाटत होत आमच जगण भी आपल्याला मान्य हाय पण ते सपशेल खोट ठरले! शेवटी तुम्ही तुमच्या बेभरवंशाच्या जातीवर आले,
आणि शेतकरी बोगस आहे , त्याच कष्ट नाटक आहे म्हणू लागले,बाप म्हातारा झाला म्हणून त्याच्या कामाच माप काढुण आईच्या कष्टाचा लिलाव करण थांबवा ! जरा लाई लावून वाईन पीनारे कधी पाहिलेत का? डोक जागावर ठेवुन सर्वा समक्ष कर्ज माफ़ी चा विठ्ठलाला दिलेला शब्द पाळा!

काय पोरखेळ लावलाय,अशा किती रांगा लावून आमची वाट लावताय हा भाबडा प्रश्न शेतकरी विचारतोय, त्यात तुमचे मंत्री10 लाख बोगस शेतकरी असल्याचा जावई शोध लावून जखमेवर मीठ चोळण्यचा प्रयत्न करत आहेत,मग साधा प्रश् पडतो सर्व हिशोब ठोकताळे आणि याद्या तुमच्या हातात आहेत, आधार बँक आणि पॅनकार्ड सगळा डेटा तुमाच्या घशातआहे मग रिकाम आमच्या लोकाची धावपळ का करताय लाज वाटू द्या जरा? शेतकर्या च्या घामाची कदर ,कष्टाचा आदर नसेल तर ही गाजर कर्ज माफ़ी देवून पाने कशाला पुसता त्या लोकांना तुम्ही रांगेत उभा करत,सनासुदिचे दिवस यातच आजारी,किती हाडभाड़ घेणार

हे वास्तव आहे कर्ज माफ़ी च्या गाजराच, आधार लिंक केल्यावर परत पुन्हा बोटाचे  ठसे उमटत नाहीत तर आधार च्या डेटा सुरक्षित ठेवण्यची जबाबदारी कुणाची , एक दोन बाबतीत ठीक आहे पण गावातील 100- कुठे 200 लोकांची बोट उमटत नसतीलतर विचार करावा लागेल. तुमच्या अपयशाचे खापर सामान्य गौरगरीब  शेतकरी अडाणी,वयोवृद्ध, लोकांवर नका लादू--- ज्याला बोट नाहीत त्याला ही संविधानाने जगण्याचा आधिकार दिलाय तो हिरावून घेतय का? तसा बोटाचा इतिहास आणि अंगटयाचा पराक्रम "हाताने" पहिलाय. तस बोट धरून चालायला शिकवणारे आणखी आहेत, लोकांना बोट धरून वाट लावायला वेळ लागणार!

शेतकरीपुत्र- सुरेश जाधव महाराष्ट्र1 प्रतिनिधी बीड
मो-9404204008

Sunday, 18 June 2017

"लक्ष्मणसूत" म्हणजे "मी"

सुरेश जाधव ,महाराष्ट्र 1 प्रतिनिधी



लक्ष्मणसूत" म्हणजे "मी"माझ्या बापाच नाव लक्ष्मणराव जाधव , गावात प्रत्येक व्यक्ति मला हा जाधवाच्या लक्ष्मण चा पोरगा म्हणूनच ओळख ,तसा लहान पणी मी खूप हट्टी ,आणि हेकेखोर् असायचो ,एखादी गोष्ट नाय मिळाली कि भांडण करायचो, मग लगेच प्रेमाने जवळ घेवुन "भाऊ "(भावंडया) ही प्रेमळ हाक आली कि समजावं आपला हट्ट हक्काने पूर्ण होणार, आमच्या कडे आठवडी बाजार नेकनूर चा त्या दिवशी मात्र डोळे बाजार च्या पिशवी वर असायची ,मग दिवसभर उनड्कि करून दिवस मावळताना बाप बाजार घेवुन येणार याची आठवण व्हायची मग गावच्या सूतारनेटावर , वाट पहात बसायचे ,प्रत्येक टमटम ( रिक्षा ) आला कि पळत जायच ,पण नाय दिसला कि परत फिरायचे , "बापू "आले बापू आले अस ओरडत घराकडे पळायचौ.मग पहीला ताबा पिशवीवर मिळवण्यासाठी आमच्या भावंडात झंगड पकड़ व्हायची ,-----!
प्रत्येकच्या आवडी निवडीसाठी रात्र दिवस काम करणारा बापू माझा आदर्श आहे ,आजही मला चांगल आठवते ,मळकट शर्ट आणि पँट वर ढोरा सारख राबन,काबाड़ कष्ट आणि घामाचे पाट हे फक्त आमच्या साठीच होत,आजही ते सुरूच आहे ,शिक्षणा बाबतीत खूप आग्रही ,कारण त्या काळात 7 वी फस् क्लास पास झालेला,बापू फक्त महया "आज्या"च्या शब्दा खातर नौकरी सोडून शेती पत्करली होती,कारण माझ्या आई वडील यांना इथे कोण सोबती नाय म्हणून नौकरी वर पाणी सोडल हुत,बापू नं ----या निर्णयाबाबतीत आम्ही बऱ्याच वेळी तक्रार केली पण या गोष्टी चा पच्छाताप त्याना नाय,उलट स्वाभीमान आहे ,सुख आल तर हुरळून जावु नये आणि दुःख आल तर खचूनही जावु नये ,हे खुप मोठ "बापकडू"मला मिळाले ,तर माझी आई "आकां" बापु सोबत,खाँद्याला खादा लावून आज तागायत सोबत आहे ,सर्व काम तीला येत नांगरने ,पेरने ,येव्हडे च काय तर बैल गाडी ,असो पुरूषी काम पण कसबाने करते ,पण तीचं नेहमी सांगन ,"रिनकाडून संन नको " अर्धी भाकरी सुखची
आज मी याच छायेत घडत आहे,कित्तेक वेळी पाण्या अभावी  पीक जळत असता खिन्न मनाने बसलेला बाप मी पहीलाय ,अर्ध्या रात्री अर्धे तुकडे भिजवुण होईल म्हणून लाईट ची वाट पहात डोळ्यावर् रात काढनारा बापू ,बाजारात घेवुन गेलेल्य मालाच पैसे आले कि स्वप्न पूर्ण करणार अस आश्वासन पूर्ण करण्या साठी ची धडपड़ पहिली ,त्याच्या ऋणात आणि त्याच प्रेमात न्हाऊ निघन मला आवडत ,आज माझा" बापु" 60 वर्षाचा आहे .माझ्या पाठीवर् प्रेमाचा आणि आधाराचा हात आणि मायेची सावली मला कसलेच ऊन लागू देत नाय ,

बापू च्या डोळ्यातले  ते आनंद अश्रू मी कस विसरेल ,त्यांची इच्छा मी गावात कीर्तन कराव ,तेही वजनात ,ती इच्छा पाँच वर्षा पूर्वीच पूर्ण झाली,सप्ताहात पत्रिकेत नाव टाकल होत, कीर्तनात फेटा बाधुन उभा राहिलो तेव्हा बापू ची बेचैन अवस्था ,कस होत आणि कस नाही हे माझ्या पेक्षा त्याना टेन्शन होत,कीर्तन एकदाच झाल सगळे खुष झाले ,बऱ्याच जणांनी बक्षीसही दिले पण त्याच वेळी बापू ला कोण्ही तरी म्हटलं एकच नंबर् कीर्तन झाल ,तेव्हा खळकण पाणी आल ते सार्थक झाल्याच आणि क्रतर्थ झाल्याची पावतीच मिळाली ,

शेवटी बाप तेव बाप,शब्दात कस सांगू

आज फादर्स डे ! माझ्या "बापू"सह सर्वाच्या बापाला हार्दिक शुभेच्छा !

Monday, 22 August 2016

गावच्या रस्त्याने मोडली दिडशे लग्न :- कारखेल ची व्यथा !



गावच्या रस्त्याने मोडली दिडशे लग्न :-
कारखेल ची व्यथा ! लग्नाच्या वयातल्या पोरांच्या बापाला घोर

तुमच्या गावाला रस्ता नाही ,नको बाबा पोरगी द्यायाची! सात किलो मीटर डोंगर तुडवित यायचे कि काय?असा सवाल मुलींचे बाप करत आहेत .म्हणूनच कि काय कारखेलगावातील  जवळ पास  दीडशे वयात आलेल्या पोरांची शुभ मंगल राहिलीत. गावाला रस्ता नाही म्हणून या  गांवात कोणी मुलगी द्यायला तयार नाही मूलभूत सुविधा पासून कोसो दूर असलेल्या कारखेल गाव ची व्यथा खरंचभयानक  आहे.बातमी बनवण्यासाठी मी कारखेल ला जायला निघालो तर तो अविस्मरणीय रटाळ वाना प्रवास मलाही करावा लागला म्हणुनच  त्यां गावकरर्याचे आणि पोरी न देणार्या बापाचा निर्णय मलाही पटायला लागला स्वातंत्रच्या 70 रीचा  सोहळा साजरा करतांना यांच्या दुखची जाणीव सरकार ला असावी आजही खेड्यात जाताना मैलौ मैल पाई चालत जाव लगत,तेही डोंगरांतून , याचे परिणाम ही वेगळे होत आहेत तर कित्तेकाला प्राण गमवावा लगत आहे

  महाराष्ट्रच्या  ग्रामविकास मंञी महोदयांच्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कारखेल गाव, नगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरील ,व विकासा चा वनवास सहन करणारे लोक  गावची लोक संख्या 2200 गावात इंडो जर्मन या योजने मुळे गावातील पाणी प्रश्ण कायमचा मिटला आणि  बागायती शेती झाली  पण बागायत दाराचीमूल आज लग्नाची बाकी आहेत,गावचा रस्ता पहिला आणि 7 किमी चालत गेल कि पाहूण्यचा इरादाच बदलतो सुविधाच नाहीत तर पोरगी द्यायची कशाल
     गांवात पांरावर बसलेलीं  तरूण मुले गावाला रस्ता नाही म्हणुन संकटात सापडलीं आहेत,चक्क या गांवात 150 तरुण पोराचे सोयरीक जुळवताना रस्ता आडवा येतोय हुन्ड्या साठी कित्तेक लग्न मोड्लेलि एकलीं असतील पण या गांवात रस्ता नाही म्हणून कोणी पोरगी द्यायाला तयार नाही
या गावातील तरुणाशी संवाद साधला पोर संगत होती राव शेती पण भरपूर आहे ,कस बस शिक्षण पण घेतलाय पण वय निघून चालले चार पाच सोयरीक पण आलीं होती,पोरगी पसंत होती पण गावाकडे पहायला आल्यावर सगळ फिसकटल आणि नाहम्हणून सांगितले अस 1नाही दोन नाही तर तब्बल 7ते 8जणांनी सांगितले,म्हणून विश्वास बसला

गांवात याला रस्त्यांची सोय नसल्याने पोरगी च देत नाहीत असे गावातील वयोवृद्ध गावकर्यानी सांगितले ,पोराचा बाप अंधारात मुलीच्या बापाला पैसे देतो तवा कूट एखाद मुलगी द्यायाला तयार होतो अस झुँबरबाई काळे या आज्जी ने सांगितलं तर बाळंतपणातर खुप त्रास सहन कराव लागतो जवळ पास 10 की मी मध्ये कुठेच दवाखाना नाही खुप हाल होतात पोर सोर गाडीवर सायकल वर जातात पण म्हातारी माणसाचे मरण असते अस गुलफाबाई पवार या आज्जी ने सांगितले .तर रस्ता नसल्याने शालेय विद्याथ्याचे हाल होत आहेत विद्याथ्याॅना  शाळेत जाण्यासाठी गुढघाभर पाण्यांतुन जावे लागते तर पावसाळ्यात जास्त पाणी आल्यानंतर आम्हाला  शाळेला दांडीच मारावी लागते.

याच गावच्या रस्ता बाबतीत सरपंच व गावकर्या नी सर्व नेते व प्रशासन याचे दरवाजे ठोठावले पण काहीच उपयोग झाला नाही , आम्ही आमदार महोदयांना विचार तर जिल्हा परिषद ने आत्ता पर्यंन्त दुर्लक्ष  केल आणि अगोदर च्या आमदार वर खापर फोडले आणि जबाबदारी झट्कत उत्तर ही या आमदारांनी दिल गावचा रस्ता खरब आहे खुप त्रास होतोय पण आम्ही रस्ता लवकरच काम हाती घेवुन अस आश्वासन  देवून आमदारांनी सुटका करून घेतली खरी पण रस्ता होईल तेव्हा खरं
          ग्रामविकास  मंञी व  पालकमंत्री  ना.पंकजाताई मुंडे या गावच्या रस्त्या बाबतीत लक्ष देतील कां  योजनांचा गाँजावजा व बडेजाव  मिरवण्या पेक्षा  जिल्ह्यातील 350 वस्ती तंडया पर्यंत रस्ता पोहचला नाही याकडे लक्ष दिले तर या पोरांच्या डोक्यावर अक्षदा पडतील


सुरेश जाधव -9404204008
email-sureahaj99@gmail.com

Monday, 15 August 2016

मजुरी शिवाय पेटंत नाही शहीद जवानाच्या पत्नीची चुल

मजुरी शिवाय पेटंत नाही शहीद जवानाच्या पत्नीची चुल--!

घर नाही की स्मारक देखील नाही

सुरेश जाधव

ये मेरे वतन के .लोगो जरा आँखों मे भरीलो पाणी जो शहिद हुये है उनकी जरा याद करो कुर्बानी 
देशाच्या सीमेवर आपल्या प्राणाची आहुति देणार्या विश्वम्बर जाधव यांच्या पत्नी च दुःख वाटून घेण्या पेक्षा त्रास देणारे व लुबड्नरेच मिळाले अशीक्षित असल्याचा फायदा घेत एकही लाभ मिळू न देणारे नातेवईक आणि सरकार ने पण दुर्लक्ष केले आहे साधे घर देखील नाही बाकी सेवा तर दूरच.सासरच्यानी तर हाकलून दिले माहेर आधार झाल मूल बाळ नसल्याने अख्ख आयुष्य कस जगावं हा प्रश् होतच पण् भाऊ अनिल ने सहकार्य केल यामुळेच अधार मिळाला

बीड जिल्हयातिल नेकनूर येथील शहिद विश्वभर जाधव इंडो पाक वार मध्ये 1971साली कामी आले.तेव्हा पासून संपूर्ण आयुष्य एकटी ने जगत आलेल्या यमुनाबाई जाधव या  शहिदाच्या  पत्नी च्या संघर्षशाचा प्रवास खुपच करूण आहे ,लग्न होवून फ़क्त 2 महीनेच झाले होते तोच पतीच्या शहिद होण्याची बातमी कानावर पडली आणि संसाराची स्वप्न मातीत मिसळून गेली.वयाच्या येन तारुण्यात खडतर  जीवनाला सुरुवात झाली ती 55 व्या वर्षी अध्याप सुरूच आहे.आई वडीला कडे राहणार्या यमुनाबाई ची चुल रोजनदारी वर पेट्ते


हातात फ़क्त कागद पत्रे घेवुन  बसलेल्या यमुनाबाई अशिक्षित आहेत यामुळे काहीच माहिती नाही की प्रशासन हि पोहचले नाही
1971च्या बेसिक च्या आधारावर मिळणारी पेन्शन नेहमी आजारी असल्याने पुरत नाही  म्हणून आज वयाच्या 55 व्या वर्षी हि शेतात रोजंदारि चे काम करून च जगावं लगतआहे
150 रुपये रोज मिळतो आणि काम करून खाते
पण आजही पतीची आठवण आल्यावर फोटो मांडीवर घेवुन बसलेल्या यमुना बाई भूतकाळातील दुःख आठवून एकट्या च रडतात त्यांचे अश्रू पुसनारी 85 वर्षाची वयोवृद्ध आई गेल्या कित्येक दिवसात मुलीची समजूत कांडत आहे,फ़क्त हळदीचा डाग लागला आणि हा वनवास वाटायला आल्ला म्हणताना आई च्या खोल डोळ्यातून अश्रू  आवरता आवरले नाहीत
सगळ्या शासकीय कार्यालयात जावून पाट पुरावाकेल पण् काहीच मदत नाही कलेक्टर  घर देतो म्हणले पण् तेही नाही ,जमीन नाही ,आणि बेसिक कमी म्हणुन पेन्शन पण् कमी आहे स्मारक साठी प्रयत्न केले पण् ग्रामपंचायत जागा देत नाही शेवटी वैतागून सर्व सोडून दिले माझ्या बहिणीला न्याय मिळवा
जय जवान जय किसान हि घोषणा फक्त कागदावरच आहे की काय हा प्रश्ण पडतो साधे स्मारक आणि घर हि देवू न शकल्यामुळे आजही काम होत नसताना मजुरी करून जगण्याचा संघर्ष आजहि सुरूच आहे अशिक्षित  असलेल्या यमुनाबाईनी सुरुवातीला बोलायला नकार दिला आत्ता जाऊदे उभ आयु श्य काडलय सगळ्यानी त्रास दिलाय आत्ता काय होणार आहे पण या माउली चे कहानी खुप काही सांगणारी आहे आजही रक्त सांडलेल्या कुटुंबात सरकार खरी मदत नही पोहचू शकल हे अपयश आहे.या शहीद वीराचे स्मारक व्हावे अशी तिची मनोमन इच्छा आहे ती तरी सरकारने पूर्ण करेल कि नाही आणि समाज फ़क्त बघायची भूमिका घेणार काय?हे प्रश्न तेच राहतात