Tuesday, 23 June 2026

संवेदनशील एसपी_नवनीत_कावत.. खाकीची आब राखली

संवेदनशील एसपी_नवनीत_कावत.. खाकीची आब राखली


विलास घुले हत्या प्रकरणात बीडचे पोलीस


अधीक्षक नवनीत कावत यांनी अत्यंत संवेदनशील पणे हे प्रकरण हाताळले. विशेष म्हणजे नातेवाईक आणि समाज मृतदेह घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तब्बल सात तास ठिय्या करून बसलेला होता. मागण्यावरती ठाम होता. तीन दिवसापासून मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत होता.यातच गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील आणि राज्यातील समाजाचे नेते, प्रतिनिधी,पोलीस स्टेशनच्या दारात बसलेले होते. कुटुंबाचा आक्रोश काळीज पिळून टाकणार होता. अशा परिस्थितीत आक्रमक झालेल्या जमा कुठलाही टोकाला जाऊ शकत होता. त्यातच रस्ता बंद ॲम्बुलन्स वर दगडफेक अशा किरकोळ घटना घडत होत्या. हे लक्षात घेऊन ही सामंजसपणे पाऊल उचलणं आवश्यक आहे.ती सगळी जबाबदारी पूर्वक पाऊले पोलीस प्रशासनाने उचलली. विशेष म्हणजे तीन दिवसापासून जमावाची मानसिकता, रास्ता रोको आंदोलन, वाहतूक कोंडी, कडकडीत बंद या सगळ्या परिस्थितीला हाताळण्यात #आयपीएस_एम_व्यंकटराम यांची भूमिका ही तेवढीच महत्त्वाचे ठरली..


कडकडीत बंद, मुख्य चौकात रास्ता रोको सुरू असताना राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे आंदोलकांशी फोनवरून संवाद. यावेळी आंदोलकांची आक्रमकता. तीन दिवसापासून प्रेतावर अंत्यविधी न झाल्याने होणारा संताप. धनंजय मुंडे यांनी अधिवेशनात पोट तिडकीने सांगितले घटनेचा गांभीर्य यात पोलिसा संदर्भात उपस्थित केलेले प्रश्न. अशा परिस्थितीमध्ये निर्णय घेताना पोलीस अधीक्षक यांनी दाखवलेली समय सूचकता अत्यंत महत्त्वाची आहे. नऊ आरोपी पैकी आठ आरोपींना दोन दिवसात अटक करण्यात आली. कुटुंबासोबत वारंवार संवाद साधून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला.


शेवटी पोलीस स्टेशन समोर प्रेत घेऊन बसलेला जमाव, आक्रमक समाजाचे नेते, ग्रामीण भागातील अशिक्षित नातेवाईक,राजकीय नेत्यांचा दबाव,अधिवेशनामध्ये यासंदर्भात झालेली चर्चा, मुख्यमंत्र्यांपासून या प्रकरणावर लक्ष,सामाजिक पातळीवर होणाऱ्या चर्चा, वस्तुनिष्ठ पुरावे, एकीकडे आणि दुसरीकडे कायद्याची चौकट या सर्व बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षक नवनीत कावत सरांनी मध्यस्थीची भूमिका बजावली ती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे.


सर्व आंदोलकांना सांगत असताना ज्या गोष्टी प्रकर्षाने सांगितल्या त्यात "प्रत्येक गोष्टीचा तपास करून कोणाचीही चूक असेल पुरावा असेल त्याच्यावर कठोर कारवाई करू. प्रत्येक गोष्टी पुराव्याच्या आणि फॅक्टच्या आधारावर कारवाई होईल *


विशेष म्हणजे एखाद्या गोष्टीचा चुकीचा पायंडा पडू नये याच्यासाठी घेतलेली कठोर भूमिका ही देखील महत्त्वाची ठरली. जमाव आणि नातेवाईक यांचा संताप सहाजिक आहे. मात्र न्यायालयाच्या चौकटीत गेल्यावर उत्तर मात्र तपासी अधिकाऱ्यांना द्यावा लागतो. त्या ठिकाणी खाकीवर्तीची आब राखली जावी. आणि खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून पोलिसिंग होत आहे ही गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे. अगोदरच सामाजिक परिस्थिती बीड जिल्ह्याचे संवेदनशील असताना. समाज माध्यमावर याची उलट सुलट प्रतिक्रिया येत असताना. दूरगामी परिणामांचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित होतं.


शेवटी विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपीवर कठोर शासन शिक्षा झाली पाहिजे. एक कुटुंब उघड्यावर आलं एका पत्नीने स्वतःचा पती गमावला वडिलांनी मुलगा गमावला आईचं काळीज हिरावल गेल या सगळ्या बाबीचा विचार करून आरोपीला कायद्याने दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा झालंच पाहिजे. पण हे सगळं होत असताना निरपराध देखील भरडला जाऊ नये यासाठी पोलिसांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असते. आणि ती बीड पोलिसांनी बजावली याबद्दल अभिनंदन. मात्र अशा संवेदनशील प्रकरणाची दखल थोडी अगोदर आपण घेतली असती तर तीन दिवस अंत्यविधीसाठी वेळ लागला नसता ही देखील खंत आहे.


#लक्ष्मणसूत(सुरेश जाधव)


#BEED #पोलिसअधीक्षक #BeedPolice #विलासघुलेहत्या #बजरंग_सोनवणे #लक्ष्मणहाके #DM #धनंजयमुंडे #सुरेशधस

Thursday, 12 February 2026

पोलीस_प्रशासनाची_लोकशाहीत_हुकूमशाही ?


 #पोलीस_प्रशासनाची_लोकशाहीत_हुकूमशाही ?

"आज पत्रकार अशोक उद्या त्या जागी तुम्ही असाल..!

व्यवस्थेला प्रश्न विचारणारे नको..





अडीच महिन्यापूर्वी एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी फूस लावून पळून नेली. यासंदर्भात नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये पीडित कुटुंबातील आई-वडिलांनी तक्रार दाखल केली. आरोपीचे नाव सांगितले. मात्र या प्रकरणात अद्याप पर्यंत अल्पवयीन मुलीचा शोधही लागला नाही. वारंवार पोलिसाकडे चकरा मारून पीडित कुटुंब थकले. दहा तारखेला रात्री हे पीडित कुटुंब पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये चौकशी करण्यासाठी आले असता. पोलिसांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी केला. नातेवाईकांनी फोन केला म्हणून पत्रकार अशोक काळकुटे पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यावेळी फक्त काय झालं असं विचारपूस करताना संबंधित पीडित कुटुंबातील नातेवाईकांनी आम्हाला मारहाण झाल्याचे सांगितलं. असे विचारपूस करत असतानाच नेकनूर मधील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी अशोक काळकुटे यांना पूर्वग्रह दूषितपणा पोलीस स्टेशनच्या इमारती बाहेर काढले. नेमकं काय झाले. हे पत्रकारांनी विचारले ही चूक झाली का? पीडित कुटुंबाची बाजू ऐकून घेतली हे चूक? यावेळी कुठलीच बाजू ऐकून घ्यायला पोलीस तयार नव्हते. यासंदर्भातील बातमी अशोक काळकुटे यांनी त्यांच्या वाहिनीवर चालवली.. पोलिसांची बाजू आणि बाईट द्या अशी मागणी सुद्धा अशोक काळकुटे यांनी ठाणे प्रमुख यांच्याकडे केली होती. पण यापूर्वी केलेल्या बातमीचा राग मनात धरून अशोक काळकुटे यांच्या विरोधात एन सी (गुन्हा दाखल)केला आहे. 


हद्द म्हणजे जे पीडित कुटुंब सतरा वर्षाची लेक शोधून द्या या मागणीसाठी आले होते. त्या कुटुंबावर पण पोलीस स्टेशनच्या आवारात गोंधळ घातला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक काळकुटे यांनी पीडित कुटुंबाची विचारपूस केली म्हणून शासकीय कामात अडथळा आणला, आरोपाची बातमी केली म्हणून बदनामी केली असा तक्रारीत उल्लेख आहे. 


पीडित कुटुंबाचा आवाज, त्यांच्या न्यायाची बाजू घेणं आणि व्यवस्थेला प्रश्न विचारानं हा जर गुन्हे असेल तर तो अशोक काळकुटे यांनी केला. याची शिक्षा भोगायला तयार आहोत. मात्र शेतकरी अडाणी कुटुंबात लेक बेपत्ता झाली याच छातीवर दुःख घेऊन पोलिसांकडे न्यायाची अपेक्षा घेऊन पोलिस स्टेशनची पायरी चढने ही त्या आई वडिलांची चूक होती? आमच्या मुलीला शोधून द्या..अस म्हणणं चूक होती. पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. ही चूक म्हणून शिक्षा देण्यासाठी पोलिस स्टेशन मध्ये गोंधळ घातला म्हणून नेकनुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.. अशी कित्येक उदाहरण आहेत. पोलिस स्टेशन मध्ये येऊन पोलिसांना धमक्या देणारे, तोड फोड करणारे यांना कशाला नादी लागायचं म्हणून सोडून दिले जाते. मात्र पोटचा गोळा अडीच महिन्यापासून बेपत्ता आहे. ती जिवंत आहे.की कोणत्या परिस्थित यांच्या काळजीपोटी विचारलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. ही कुठली पद्धत आहे.


संवेदना मेलेल्या नोकरशाहिची हुकूमशाही कडे वाटचाल असले तर हे अत्यंत धक्कादायक आहे. सामान्य माणसाला गुन्हा, कोर्टाची पायरी म्हटलं की अंगावर काटा येतो. याचाच गैर फायदा घेऊन कायद्याची भीती दाखवून अनेकांच्या खिशावर डल्ला मारणारे अशी प्रतिमा असलेल्या पोलीस दलात सर्वच जण तसे असतात अस नाही पण अनेकांना आलेला अनुभव देखील असाच आहे. 


आज पत्रकारितेमध्ये अनेक नवोदित पत्रकार येत आहेत. पत्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदललेला आहे. पाकीट पत्रकारिता असा आरोप होतो. असे काही धंदेवाईक नाहीत अस मी मुळीच म्हणणार नाही. पण खरी काय खोटी काय या दोन्ही बाजू बातमीत असाव्यात एवढी मूल्य जपून तटस्थ पद्धतीने माध्यम म्हणून बातमीदारी केली जाते. अशी खरी पत्रकारिता केली बातम्या केल्या की अनेक हित शत्रू होतात. मग धमकी बदनामी गुन्हा गुन्हे दाखल करणे. हे मार्ग अवलंबणे या पैकीच अशोक वर झालेला गुन्हा एक भाग असू शकतो.


आता तर "डर का काला धंदा " हे भिंग फुटु नये म्हणून चक्क लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर, पत्रकारावर पुन्हा दाखल करून मुस्कटदाबी होत असेल तर या विरोधात सर्व पत्रकार एकत्रित येऊन लढा नक्की उभारावा लागेल. आज अशोक आहे उद्या त्या जागेवर दुसरा असू शकतो. सोईची भूमिका घेण्यासाठी असा दबाव टाकला जाऊ शकतो. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे चालत नाहीत.वेळीच विचार करून या मानसिकतेला विरोध होणे आवश्यक आहे. अशोक काळकुटे यांच्या न्यायिक लढ्यात आम्ही सर्वजण सोबत आहोत.


#BEED #beedcrime #पोलीस_अधीक्षक #निषेध #पत्रकारिता ,#बातमीदारी #अशोककाळाकुटे