Sunday 18 June 2017

"लक्ष्मणसूत" म्हणजे "मी"

सुरेश जाधव ,महाराष्ट्र 1 प्रतिनिधी



लक्ष्मणसूत" म्हणजे "मी"माझ्या बापाच नाव लक्ष्मणराव जाधव , गावात प्रत्येक व्यक्ति मला हा जाधवाच्या लक्ष्मण चा पोरगा म्हणूनच ओळख ,तसा लहान पणी मी खूप हट्टी ,आणि हेकेखोर् असायचो ,एखादी गोष्ट नाय मिळाली कि भांडण करायचो, मग लगेच प्रेमाने जवळ घेवुन "भाऊ "(भावंडया) ही प्रेमळ हाक आली कि समजावं आपला हट्ट हक्काने पूर्ण होणार, आमच्या कडे आठवडी बाजार नेकनूर चा त्या दिवशी मात्र डोळे बाजार च्या पिशवी वर असायची ,मग दिवसभर उनड्कि करून दिवस मावळताना बाप बाजार घेवुन येणार याची आठवण व्हायची मग गावच्या सूतारनेटावर , वाट पहात बसायचे ,प्रत्येक टमटम ( रिक्षा ) आला कि पळत जायच ,पण नाय दिसला कि परत फिरायचे , "बापू "आले बापू आले अस ओरडत घराकडे पळायचौ.मग पहीला ताबा पिशवीवर मिळवण्यासाठी आमच्या भावंडात झंगड पकड़ व्हायची ,-----!
प्रत्येकच्या आवडी निवडीसाठी रात्र दिवस काम करणारा बापू माझा आदर्श आहे ,आजही मला चांगल आठवते ,मळकट शर्ट आणि पँट वर ढोरा सारख राबन,काबाड़ कष्ट आणि घामाचे पाट हे फक्त आमच्या साठीच होत,आजही ते सुरूच आहे ,शिक्षणा बाबतीत खूप आग्रही ,कारण त्या काळात 7 वी फस् क्लास पास झालेला,बापू फक्त महया "आज्या"च्या शब्दा खातर नौकरी सोडून शेती पत्करली होती,कारण माझ्या आई वडील यांना इथे कोण सोबती नाय म्हणून नौकरी वर पाणी सोडल हुत,बापू नं ----या निर्णयाबाबतीत आम्ही बऱ्याच वेळी तक्रार केली पण या गोष्टी चा पच्छाताप त्याना नाय,उलट स्वाभीमान आहे ,सुख आल तर हुरळून जावु नये आणि दुःख आल तर खचूनही जावु नये ,हे खुप मोठ "बापकडू"मला मिळाले ,तर माझी आई "आकां" बापु सोबत,खाँद्याला खादा लावून आज तागायत सोबत आहे ,सर्व काम तीला येत नांगरने ,पेरने ,येव्हडे च काय तर बैल गाडी ,असो पुरूषी काम पण कसबाने करते ,पण तीचं नेहमी सांगन ,"रिनकाडून संन नको " अर्धी भाकरी सुखची
आज मी याच छायेत घडत आहे,कित्तेक वेळी पाण्या अभावी  पीक जळत असता खिन्न मनाने बसलेला बाप मी पहीलाय ,अर्ध्या रात्री अर्धे तुकडे भिजवुण होईल म्हणून लाईट ची वाट पहात डोळ्यावर् रात काढनारा बापू ,बाजारात घेवुन गेलेल्य मालाच पैसे आले कि स्वप्न पूर्ण करणार अस आश्वासन पूर्ण करण्या साठी ची धडपड़ पहिली ,त्याच्या ऋणात आणि त्याच प्रेमात न्हाऊ निघन मला आवडत ,आज माझा" बापु" 60 वर्षाचा आहे .माझ्या पाठीवर् प्रेमाचा आणि आधाराचा हात आणि मायेची सावली मला कसलेच ऊन लागू देत नाय ,

बापू च्या डोळ्यातले  ते आनंद अश्रू मी कस विसरेल ,त्यांची इच्छा मी गावात कीर्तन कराव ,तेही वजनात ,ती इच्छा पाँच वर्षा पूर्वीच पूर्ण झाली,सप्ताहात पत्रिकेत नाव टाकल होत, कीर्तनात फेटा बाधुन उभा राहिलो तेव्हा बापू ची बेचैन अवस्था ,कस होत आणि कस नाही हे माझ्या पेक्षा त्याना टेन्शन होत,कीर्तन एकदाच झाल सगळे खुष झाले ,बऱ्याच जणांनी बक्षीसही दिले पण त्याच वेळी बापू ला कोण्ही तरी म्हटलं एकच नंबर् कीर्तन झाल ,तेव्हा खळकण पाणी आल ते सार्थक झाल्याच आणि क्रतर्थ झाल्याची पावतीच मिळाली ,

शेवटी बाप तेव बाप,शब्दात कस सांगू

आज फादर्स डे ! माझ्या "बापू"सह सर्वाच्या बापाला हार्दिक शुभेच्छा !

No comments:

Post a Comment