Sunday, 22 July 2018

समतेचे क्रांतीस्थळ ,भक्तीचे वाळवंट - पंढरीची वारी


आषाढी एकादशी

आता विश्वतमके देवे !या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानांच्या मागणी मधील सर्व समावेशक तत्व हें वारकरी संप्रदायांच्या व्याप्ती आणी मर्यादा या बाबतीत बोलकं आहे .वारकरी विचार धारेने आजवर जी आदर्श घालून दिली.त्यामुळे समाजिक मूल्यांची बीजारोपण 12व्या शतकां पासून आजवर या मातीत तशीच जिवंत आहेत . भेद भाव तोडोणि घेतला प्रेमाचा गरळा। शुद्ध नाम श्री हरिचे लागला निज मुखी टाळा । हरी स्मरणाचेणी बळे अंकित केलें कळीकाळा । एका जनार्धनी अखंड सुख सोहळा ॥ 

या अभंगाच्या द्वारा भेदाच्या भिंतीनां मूठ माती देत अभेदाची अभेद्य विचार धारा तयार केली. त्या सर्व संत मंडळीनी  समाजिक क्रांती चे हबूक याचं पंढरी च्या वाळवंटात ठोकले होते. कर्मकांड आणी धर्ममार्तंडा विरोधात प्रबोधनाची चळवळ या वेळी सक्रिय झाली यांचे सूत्रधार-ज्ञानोबा यांच्या खांद्याला खांदा देवून चोखा मेळा होतेतर संत कबीर मोमीन हें मुसलमान होते.सेना नाव्ही -होते अशा अनेक संत मंडळीनां एकत्रित करून गोरोबा आणी संत नामदेव यांनी कीर्तन सुरु केलें यावेळी मुक्ताई जनाई गोनांई या कीर्तनात सहभागी असतं .ही समाजिक समानतेची गुडी याचं कीर्तनात उभी राहिली.

समर्थाच्या पंक्ती भोजने । तळील्यावळी ल्या एकची पक्वान्ने ॥
या प्रमाणाची प्रचिती येत असे.ज्या वेळी स्पृश्य-अस्पृश्य तेच्या संकल्पना मानवी मूल्य आणी माणुसकीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करतं होती त्या वेळी पंढरपूर मध्ये  सर्वाना एकत्रित करुन वाळवंटात  "काला"  करण्यात आला.यात
 एक मेका घालू मुखे।  सुखे घालू हुंबरी॥
भानुदास गीती गाता । प्रसाद देत पंढरी नाथ।

या विचाराच्या परिपक्वतेणें  रूढ परंपरा वर वार केला.म्हनून वारी ही आज सर्व अंगाने महत्वाची आहे, वारकरी या शब्दाची महती इथून सुरु होते.

खट नट यावे शुद्ध होवूनही जावे । दवंडी पिठी भावे चोखा मेळ ॥

यारे यारे लहान थोर । याती भलती नारी नर ।

आदी करुन वेश्या ही।  ही आरोळी त्या वेळी ठोकणे हें काही कमी कमालीचे धाडस नव्हते .म्हनून तर समाजिक क्रांती चे वाळवंट हेच शक्ती स्थळ होते तर विठोबा हा शक्ती देवता होता.याला भेदाचा विटाळ आहे.म्हनून तर आज संपूर्ण देश भरतील वारकरी या वारीला वेडावला आहे. या वारी च्या माध्यमातून खूप मोठी जाणीवेची उत्क्रांती झाली. संसारात थकलेला जीव या भोळ्याभाबडय़ाचा देव । पांडूरंगाच्या चरणी लीन होतं.संकटांशी दोन हात करण्याच बळ घेवून जावू लागला.

देवा सांगू सुख दुःख । देव निवारिल भूक या !

हा विश्वास या विठाबाई च्या बाबतीत आहे. म्हनून तर लाखो लोक ऊन वारा पाऊस व्यवस्था अव्यवस्था या बाबतीत विचार न करताना पंढरीची वाट धरतात. या वाटेवर जो भेटलं तो त्यांच्या साठी माऊली असतो ! म्हणजेच प्रत्येक जन हा माऊली रूपात भेटतो. उंच नीच गरीब श्रीमंत हा भेद मुळातच नसतो.यात वैचारिक देवानं घेवाण या बरोबर भावनिक आधार देणारी माणसे अर्थातच" माऊली" यांच्या सोबत गप्पा मरताना मनावरील दुखाचे ओझे  हलके होते.कित्तेक सासुरवाशीण आणी कित्येक सून पीडित, पती पीडित येव्ह्डेच नाही तर पत्नी पीडित या दुःखाला  अश्रू वाटे मोकळे करुन देता. माऊली जाऊ द्या!  हें आधाराचे वाक्य शक्ती आणी बळ देणारं असते.या बरोबर संसाराचे  मिथ्यत्वं सांगणारे संताचे अभंग स्व त्वची जाणीव करुन देतात.यामुळे वारीतील काकडआरती अभंग नाटाचे अभंग आदी अभंग सहज कानांवर पडतात. त्यातून दुःख निवृतीचे  अमृत शिंपडलें जाते.ते असे


 संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ । विश्रांती नाही कोठेरात्र दिवस तळमळ ।
काम क्रोध शूनी पाठीलागले ओढाळ । कवनामी शरण जावू द्रुष्टि देई निर्मळ !

या सर्व अभंगाच्या माध्यमातून संसारी रंजल्या गंजलेल्या जिवांना  जागे करण्याचे काम केलें जाते म्हनून वारकरी तत्व ज्ञान हें उद्धार करणारे आहे.

आषाढी कार्तिकी एकादशी च्या निमिताने एकत्रित येणारा वारकरी चंद्र भागेच्या वाळवंटात पाऊली खेळतो । एक मेकाच्या हातात हात घेवून विठ्ठल विठ्ठल गजरात न्हाऊन निघतो .तो त्यांचा भक्ती भाव आणी श्रद्धा विश्वास महत्वाचा असतो.नित्य नियमाने  आयुष्याच्या जगण्याच्या बळ घेवून जाण्यासाठी वारकरी विठ्ठल चरनी लीन होतात. वर्षभर ती ऊर्जा जिवंत राहते. म्हनून तर सामान्य लोकांच्या प्रेमाचा आणी विश्वासाचाठेवा अर्थात विसावा हा विठोबा आहे.

याचं वारीतील प्रत्येक बदल हा टिपण्याजोगा आहे. प्रबोधनांची पंढरी विधायक वारी ही संदेश देताना.सर्व अंगांचा विचार यात दडलेला आहे.याचं कारण ही तसंच आहे. यावर्षी स्वच्छ वारी निर्मळ वारी हरित वारी व्यसन मुक्त वारी , प्रदूषण मुक्त वारी .जाती निर्मूलनांची वारी, अशा अनेक अंगणाने आज भरून पावत आहे. यातच आधुनिक वारकऱ्यांची संख्या वाढली सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जगातील प्रत्येक देशात वारकरी तयार जाहले आहेत  विश्वस्वधर्म सूर्य पावो ।  या ज्ञानोबा च्या संकल्पनेची अनुभूती येत आहे. राजकीय, समाजिक, आर्थिक , माणुसकीच्या मळ्याला नवं संजीवनी देणारी वारी अनुभवातून कळते.

ज्ञान विज्ञानाची कास धरायला लावणारा "विठ्ठल "हा अध्यात्माचा विसावा आहे. तर विठ्ठल भक्ती ची पताका अखंड फडकवत ठेवणारे  वारकरी या भक्तीमार्गातील नंदादीप , प्रकाश दीपस्तंभ , आहेत.म्हनून तर

पंढरीशी जारे आल्यानो संसारा।  दिनाचा सोयरा पांडुरंग ॥ 
वाट पाहे उभा भेटीची आवडी । क्रूपाळू तातडी उतावीळ ॥ 
मागील परिहार पुढे नाही शीन।झालीया दर्शन एक वेळा॥ 
तुका म्हणे नेदी आणीकांच्या हाती । बैसला तो चित्ती निवडेनां ॥ 

या अभंगाची अनुभूती घेण्यासाठी या माऊली -- हा सोहळा आनंद । तुका म्हणे नाही भेद ॥ 

आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा !


प्रा.सुरेश महाराज जाधव (संत साहित्य अभ्यासक )
श्री बंकटस्वामी महाराज मठ नेकनूर
मो -9404204008

Tuesday, 12 June 2018

अष्टपैलू गणू (गण्या )---!(सरपंच)

अष्टपैलू गणू (गण्या )---!(सरपंच)

पत्रकारिता शिकण्याचा श्री "गणेशा" स्व वसंतराव काळे महाविद्यालयातून सुरू करतं सकाळ सारख्या दैनिकात दमदार पत्रकारिता करणारा "गण्या"  आजचा पत्रकार गणेश  सावंत (सरपंच )
आमची ओळख कॉलेज मध्ये झाली तसा तो  गावाकडून आलेला आणि मी खेड्यातला लवकर घट्टी जमली . दोघांना शहर ही समस्या काय हे लवकर न उमलणरी  होती. कॉलेज मध्ये जास्त कोणी ओळखीचं नव्हतं.शोधायचं झालं तर गावाकडंच़ कोणी तरी म्हणून गणेश' प्रकाश' ची मैत्री झाली. पण त्यावेळी अनेक शहरातील मुलं मुली कॉलेज ला यायची त्यांच़  राहणीमान गाड़ी वैगेरे वैगेरे  सर्व काही पाहून आम्ही त्यांच्याशी तुलना करण्याच्या भानगडीत पडत नसतं. भांडण वैगेरे पासून दूर असतं.मुली काय पण मुला कडे पहायला पण भीती वाटायची पण त्यावेळी आम्हाला प्रा गणेश सर प्रा बापूसाहेब  सर
व्यंकटेश सर प्रा सानप सर याचं मार्गदर्शन लाभलं.पत्रकारिते चे पाट गिरवताना वक्तृत्व स्पर्धां मध्ये मात्र बाजी मारली.विषयाची मांडली पासून ते स्टेज करेज या सगळ्या गोष्टी कॉलेज मध्ये  या माझ्या दोस्ता चा कोणी हात धरू शकत नव्हतं .धरलातर  फक्त पायच  शिल्लक होते.सुरवातीला बुजरा स्वभाव पण गुरु च्या तालमीत असा पट्टया तयार झाला की  युवक मोह्त्सव असो की कोणती स्पर्धा त्यात नंबर एक च़ बक्षीस "गण्याच़" ठरलेल.आम्ही दोघांनी बऱ्याच वाद विवाद स्पर्धा केल्या.नंतर  अमोल आणि  गणेश स्पर्धेला जायचे त्या यात के एस के  मध्ये तर ठरलेल असायचं पत्रकारितेचे विद्यार्थि आले की बक्षीस घेवून जाणारच़  हा शिक्का होता.याच कालावधी "गणेश" ला विद्यापीठ स्तरावर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली.मग एन एस एस कँप असो की युथ फेस्टिवल .संस्कृतीक कार्यक्रम सगळ्या मध्ये अग्रेसर राहिला. त्याच वेळी माणूसकी ग्रुप च्या माध्यमातून जेल मध्ये(कारागृह ) अनेक कार्यक्रम घेतले.तसं जेल वर "गण्याच़" जास्तच़ प्रेम असल्यामुळं ते शक्य व्हायचं ! पण तो "कैद"झाला नाही .

 कॉलेज मध्ये तर बरेच वेगवेगळया  प्रकऱणाचा तसा तो साक्षीदार आहे..यात "मध्यस्थ" म्हणून भूमिका महत्वाची ठरली.कॉलेज करतं सकाळ मध्ये पत्रकरिता केली. याच पत्रकारितेचेच्या जोरावर गावांत लोकांची कामे करतं सत्ता मिळवली वयाच्या 21व्या वर्षी महाराष्ट्रात सर्वात कमी वयाचा सरपंच म्हणून ओळख निर्मान केली.मग सरपंच परिषद पासून ते  सर्व शासकीय आणि राजकीय व्यासपीठावर आवाजाचा दबदबा कायम होताच़ . पाच वर्षात काय कमावलं गमावलं या पेक्षा समाजकारनातून खुप मोठी हुशारी आणि जबाबदारीची समजदारी मिळवली.आजही गावातील  लोक त्याच नाव घेतात. एकाच इनिंग मध्ये बाय बाय करत.पुन्हा सामजिक क्षेत्रात सक्रिय झाला यात  क्रांती मोर्चा पासून ते  माणुसकी ग्रुप या सर्व पातळ्यावर दांडगा जनसंपर्क घेवून आज कार्यारंभ मध्ये पुन्हा  पत्रकारितेचा आरंभ करत बीड च्या पत्रकारिता मध्ये  मध्ये गणेश सावंत (सरपंच ) हे नाव कमावलं आहे.बऱ्याच वेळा एकमेकाच्या  बापाच्या नावांचा उधार करणारे आम्ही एकमेकाचे सल्ले घेतोच. आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या वक्तृत्व स्पर्धेतील  शेतकऱ्यांच्या वेदना जागवणारी कथा कायम लक्षात राहते.

सकाळी सकाळी --- वांगे तोंडताना पारुश्या  हातात गूसलेला काटा टच दिशी डोळ्यात पाणी आणतो.मात्र माझं कुटुंब जगवायच़ म्हणून अनेक सलत्या काट्या -हदयात दडपून वांगे बाजारात मांडणाऱ्या माझ्या बापाला जेव्हा गावाकडे जाताना पैसे कमी पडतात तेव्हा त्या सलनाऱ्या काटया पेक्षा जास्त वेदनांच त्यांच्या डोक्यात काहूर माजत कारण बाजार ची वाट पाहणारी मुलं आणि हातातली रिकामी पिशवी.-----! हे दुःख तुम्हांला काय समजणार !  हा सवाल  -हदयाचा ठाव घेणारा असायचा !

गणू आत्ता महापुरुष व्याख्यानातून सांगत आहेत.तर  लेखणीतून  सामान्यचे प्रश्न सोडवत आहेत.तसा माझ्या मित्रा चा पाटील वाडा तयार झाला.फक्त -----_ ची वाट पाहत आहे. त्या वाड्यात चतुर्भज होवून प्रवेश लवकरच होणार असल्याची खात्री लायक माहिती सूत्रांकडून समजली. असो.अशा माझ्या मित्राला.यशस्वी माजी सरपंचाला. हुश्शार राजकारन्याला. हरहुन्नरी पत्रकाराला. शब्दप्ररचुर वक्त्याला.पाटलीनीची वाट पाहणाऱ्या पाटलाला अर्थात गणेश सावंत यांना प्रगट दिनाच्या खुप खुप शुभेच्छा ! 

सुरेश जाधव (लक्ष्मणसूत)

Saturday, 19 May 2018

तीन अंकी नाटिकेचा शेवट -- कर्नाटकी जनतेवर च्या इच्छेविरुद्ध चे सरकार.


येडियुरप्पा च्या बाबतीत "पाल" चुकचूकली !

कर्नाटकतील नाटकी खेळी चे नाटक आता संपले आहे ! इथे कोन जिंकले कोन हरले या पेक्षा न्याय व्यवस्थेवरील विश्वास  लोकांमध्ये द्रढ झाला हे मात्र नक्की !

कॉंग्रेस सरकारच्या विरोधात जनमताचा कौल भाजप ला 104 अशा सर्वादिक जागा निवडून दिल्या.तर कॉंग्रेस ला 78 वर विजय कौल मिळाला.या दोन्ही पक्षाच ठीकपण जेडीएस  ला 37जागा निवडून दिल्या म्हणजे जनमताची तिसरी पसंदी होती. सत्ता स्थापनेत भाजप कडून अतिरेकी सत्तेची महत्वाकांक्षा दिसली यात लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुड्वत राजभवनाच्या पटावर राजकीय पाठ गिरवले. यात अति घाई आणि संकटात नेई या म्हणी प्रमाणे जे घडायचं ते घडलं.यात फक्त कानडी जनतेला अपेक्षित मतदानाच्या कौला विरुध्द राजकीय समीकरने जुळली.(मनाविरुद्ध आणि मता विरुध्द नको असलेले सरकार आणि पक्ष यांच्या हातात सत्ता सूत्र येणे यांचा अर्थ शेवटी कानडी जनतेवर राजकीय बलात्कार म्हणावा लागेल) ज्यालाची तुलना गोवा नी मणिपूर मेघालय त्रिपुरा या बाबतीत जे घडले तेच इथे ही घडले.यात दोष भाजप केंद्रात सत्तेवर आहे म्हणून सर्वजण या बाबतीत बोलणं साहजिक आहे शेवटी सत्ताधारी विरोधी कौल आहेच.पण यात पाच वर्ष कॉंग्रेसची सत्ता असतांना कानडी जनतेने का ? नाकारलं याच उत्तर हे कॉंग्रेस चे अपयश नाकारून चालणार नाही. यात कर्नाटक च्या प्रचाराच्या रणधुमाळी पंतप्रधान पदासाठी मीच म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चडल्या तावातावाने रणांगण गाजवले पण पुन्हा पाच वर्षाची कारकीर्द आडवी आली आणि 78 जागांवर समाधान मानव लागलं यात कुमार स्वामीच्या जेडीएस ला तर कर्नाटकातील फक्त 18%लोकांनी स्वीकारलं होतं. तरी सुध्दा शेवटी - नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे. या म्हणी प्रमाणे  कॉँग्रेस ने  37 जागा असूनही जेडीएसला मुख्यमंत्री पद घ्या म्हणतं आघाडीसाठी हात पुढं केला.नंतर जे घडायचं ते घडलं या तीन अंकी नाटिकेचा आज समारोप झाला.यात कुणाची गेली आणि कुणी मिळवली यावर चर्चा नकोच.

या कर्नाटकी निवडणुकीने मात्र विजयी घोडं दौंड करणाऱ्या भाजपला 104 जागांवर अडकून ठेवलं तर कॉंग्रेस ची पुन्हा नाचक्की केली. जेडीएस ला सपशेल नाकारले.पण या नाट्य खेळीत कुमार स्वामी चे नशीब फळफळले आणि मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडली ! मात्र राजकीय व्यभिचार आणि राज शिष्टाचार नैतिक मूल्य या मोठ्या मोठ्या शब्दाचा खेळ रंगला शेवटी महत्वाचं आहे ! या कॉंग्रेस- जेडीएस च्या नव्या सरकार ला शुभेच्छा फक्त -संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे

कानडी ने केला मराठा भ्रतार । एकाशी उत्तर येक नये ॥ 

अशी गत होवू नये ही अपेक्षा !

सुरेश जाधव -9404204008

Sunday, 6 May 2018

घामाचे सवंग लचके तोडायचे थांबवा ! महाश्रमाचे "महाइव्हेंट" !



श्रमांच्या घामावर स्वतःची राजकीय पोळी भाजायची थांबवा ! 

राबणाऱ्या हातांना विश्रांतीचा स्पर्श नाही.हर्ष तो कसला इथे सवंग महाश्रमाला अर्थ नाही.

आग ओखनार्या सूर्याला मस्तकावर घेवून दिवस रात्र मेहनत करणाऱ्या हातांनाकधी आम्ही विश्रांती देणारा का ? आज हाय टेक च्या आणि डिजिटल च्या नावाखाली तुमची मंत्रालय हाय फाय आणि वायफाय झाली. लिफ्ट आणि शिफ्ट वर तुमची नोकरशाही ची बडदास्त सुरू आहे.एसी मध्ये बसून लिहायला कोमल हाताला कष्ट होत होते  म्हणून कॉम्पुटराईझ करून टाकलं.तरी सही चे कष्ट त्यात किती रेषा ओढ्याच्या म्हणून त्या ए सी तल्या आणि "तिशीतल्याची" लईच काळजी.डिजिटल सिग्नेचर केली झंज्टच नकोयाची सोय केली .पण आमच्या साठीतल्या बापाच्या हातातील कुदळ फावडं टिकाव आणि माईच्या हातातली पाटी यांना दिसत नाय.म्हणे श्रम दान करा!  महाश्रमदानातून जल चळवळ ! तूमच्या डोक्यातली वळवळ अगोदर थांबवा. उन्हा तान्हात बाया पोरांना घेवून चर खोदण्यासाठी जीवाची हाल अपेष्टा ! करून घेणाऱ्या सोबत सेल्फी पुरत आणि फोटोसेशन चा महाइव्हेंट कशासाठी ? राबणाऱ्याच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आसुरी आनंद घेवू नका.

लाही लाही होणाऱ्याच्या हातातले टिकाव नक्की घ्या पण कमीत कमी 4 तास तर महाश्रमात घाम गाळा.मग घामाचे थेंब झटकता ना चे फोटो नक्की खेचा पण तेव्हा कपाळावर चा घाम नाही तर  पाठी पोटावर पाट वहायला लागतील.यांची जान ठेवा तसं होन दूर फक्त चार टिकाव हाणून पावन झाल्यानं शिवार पणेदार होतो का ?  मग आम्हाला लोक सहभागाचे गीन्यान शिकवा. धुरळा उडवत गाडी नी यायच अन गोवर्धन उचलल्या गत फुकटचा रुबाब दाखवत निघून जायचं काय पोरं खेळ लावला का ? पुन्हा नाव लावयला मोकळे श्रेय घेण्याचातर भस्म्या जडला आहे.   

लईचश्रम परिहार करायचं ज्ञान पाजळायची हौस आहे ना तर मग  सगळ्या क्लास 1अधिकाऱ्यानी हातात कुदळ फावडं घेवून चैत्रातच्या भर उन्हात एक दिवसच काम करावं .ताका पुरतं रामायण आणी फोटो पुरत श्रमदान कुठं तरी थांबवा.तुम्हाला पाटी उचलण्यासाठी आणि टिकाव धरण्याचासाठी संवैधानिक पदावर नाय पाठवलं.माय बाप शेतकऱ्यांच्या हातातले कायमच टिकाव कसं जाईल याचा निर्णय घेण्या साठी पाठवलं आहे. लई पुढारलेल्या गप्पा मारतानार्या 
पुढाऱ्यांना लांजा सोडल्यासारखं कशाचं भांडवल करावं आणि मार्केटिंग करावं याला जणांच्या नाही तर मनांच्या मर्यादा तरी ठेवा म्हणावं.  गेल्या 70 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळात डोक्यावरचा हंडा आणि कमरेवरची घागर या बाबतीत विचार केला असता तर ही वेळ आली नसती.तीन वर्षात जलसंधारणाच्या बाबतीत काय केलं याच गणित कागदोपत्री नकोय? किती शेतातला उन्हाळा संपलय पीक आणि पाणी आहे.किती गावाची खरी तहान भागली हे प्रत्यक्ष फेर फटका मारून पहा मग अमक्या शिवार आणि तमक्या योजना चे खरे वास्तव कळेल.बसण्या पासून उठण्यापर्यंत सर्व कामे करणारे मशीन तयार आहेत. यंत्र युगात जगतोय हे सगळं असतांना "महाइव्हेंट" कशा साठी परत या गोरगरीबांच्या रक्त गोठून तयार झालेल्या घामावर स्वतःची राजकीय पोळी भाजायची का ?  घरात वातानुकूलित; गाडीत ए सी; बाथरूम मध्ये एसी; आहे.म्हणून तुमच्या बुडाला गरम लागत नाही.पन बारा महिने आणि चोवीस तास राबणाऱ्या हातांना परत या महाइव्हेंट च्या नावाखाली  राबायला लावून  गाजर दाखवू नका.बीड जिल्ह्यासाठी सरकार म्हणून काय जबाबदरी पार पाडली हे अगोदर सांगा किती प्रकल्प पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे पूर्ण केलं .अधूर्या आणि अपुऱ्या प्रकल्पाचं वीस वीस वर्षाचे घोंगडे आडल कुटं? सिंचन विहिरी आणि शेततळी या बाबतीत आग्रह सोडून अंमलबजावणी कधी ?  सिंचन घोटाळ्याच्या नावान तेल लावून बोंबलत होता त्याच काय झालं ? या प्रश्नाची उत्तर द्यायचं सोडून  फोटो सेशन चा "महाइव्हेंट" ची चांगली मार्केटिंग चालू आहे.तुमचं अपयश झाकून ठेवण्यासाठी चा  केविलवाणा  प्रयत्न करू नका. सुंदर अप्सरा लग्नाला सजवायची अन स्वयंवर सांगून गाढवाच्या लग्नाची गोष्ट करायची.ही गत तुकडा टाकून पोट भरत नसत.तसे बक्षिसाचे अमिष दाखवून कायम राबणाऱ्या लोकांचं रक्त आटवू नका?  वर्षातून एक दिवस ठरवा सगळे अधिकारी आणि पांढरपेशी बगळे शेतात आणून फक्त येक दिवससक्तीने  काम करायला लावा.मग महाइव्हेंट मध्ये पाच मिनीटं केलेली फोटोग्राफि'  दिवस भर करा. म्हणावं ! पन घामाचे सवंग लचके तोडायचे थांबवा. कोटीच्या घोषणेचे मुरलेलं पाणी आणि पाणी योजनेच लीकेज काढलं तरी.बिना घामाचा शिवार पा पाणेदार  होईल.

सामजिक जबाबदारी ची जान ठेवत पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून लोकजनचळवळ उभी राहिली.हे कौतुक आहे मात्र आपलीच पाट आपण किती दिवस थोपटून घ्यायची. कर्तव्य करण्यात आणि जबाबदरी पार पाडण्यात सरकार कमी पडतंय का ? बीड जिल्ह्यातील अनेक मूलभूत प्रश्न सोडवणे बाकी आहे?  त्यात पाणी या गंभीर प्रश्नावर फक्त तोंडाला पाने पुसून भागणार नाही. घामानं माखलेली बनेल अन खडीच्या साली पोटाची भूकेसाठी चे हाताला पडलेले  घट्टे आणखी भूजले नाहित ! प्रत्येक हात राबत होता.तेव्हा पासून आज पर्यंत केलं.बदल काय झाला तर झोपडीतले प्रश्न सोडवण्यासाठी बांधण्यात आलेली विटा माती ची ऑफिस  आज आर सी सी झाली.ऑफिसमधे बसणारी जनसेवक जनतेकडून सेवा करून घेण्यात मग्न झाली. कधी गरिबांच्या रोटी चा विचार झालाच नाही.त्या राबणाऱ्या हातांच्या जागी मशीन आलेच नाही.म्हणूनच की काय पून्हा दोन पायांची माणसे मशीन प्रमाणे राबवून घ्यायचा माणस ठेवून तर हे होत नाही ना ? 

वाटलं होत अधिकाऱ्याच्या आणि नेत्यांच्या हातातील कुदळ आत्ता शांत बसणार नाय  ! फावडयाच (खोर)अन पाटी (घमेंल )चे ही शीन फिटणार शेवटी हात लागला नव्हं का ? महाश्रम दाण च्या पटावर सगळंच कसं "झाक" असतं. डपड वाजत असतं रुबाब झाडणारांची संख्या कमी नसते. असो पन खरं काम करणारी माणसं बाजूला राहतात.त्यांचं कष्ट आणि श्रम हे लक्षात घेतले जातच नाही हे दुर्दैव .शासन म्हणून जबाबदरी पार पूर्ण केली तर ही वेळ येणार नाही .शेवटी  गोर गरीबाच्या महाश्रमाचा  फक्त सेल्फी पुरता "महाइव्हेंट" होवु नये.तसेच महाश्रमाचे महा शोषण थांबवावे ही अपेक्षा .


सुरेश जाधव "लक्ष्मनसूत ! 

Tuesday, 20 March 2018

माफ कर "विठ्ठला" आज फराळ तर करणार! दिल्लीवारी एकअनुभव भाग 2

माफ कर  "विठ्ठला" आज फराळ तर करणार!  

आपुलीकीचा अविस्मरणीय पाहुणचार दिल्लीवारी एकअनुभव 


सारे भारतीय माझे बांधव आहेत-
--
सकाळचे साडे सात वाजता सर्वजण निघण्यासाठी तयार झालो.तोच मेजर काका नी फराळाला बसा सर्व तयार आहे.असा आवाज दिला आम्ही तर भारावुन गेलो.येव्डया सकाळी कधी बनवलं. विचार करत डायनिंग टेबल वर बसलो तोच समोर चे फराळाचे पदार्थ पाहून आश्चर्यचा धक्का बसला. गाजर काकडी आणि मुळा स्नैकस भरलेली प्लेट आली. दुसऱ्या ताटात भेंडीची भाजी डाळ अन् गरम गरम गव्हाची रोटी उपवास आहे म्हणणार तोच आमच्या चेहऱ्यावर चे भाव पाहून किचन मधून काकू बाहेर आल्या हिंदी मध्ये उपास के दिन  प्याज और लसूण नही खाते ? अस उद्गारल्या आम्ही शांत झालो.समोर ताट पाहिले अन् मनात म्हटलं माफ कर विठ्ठला आज फराळ तर करणार. --असेच काही किस्से अविस्मरणीय 

प्रवास करतांनाचे काही प्रसंग कदचित कधीच विसरता येत नसतात. मानस ओळखीची नसली तरी  आपुली आणि प्रेम मिळाले की कायम स्वरूपी -हदयात घर करून राहतात.असाच अचानक दिल्ली जाण्याचा प्रसंग आला.नियोजन कुटलेच  नव्हते फक्त आमच्या दोघांवर निर्भेळ प्रेम करणारे हरिदास (भाऊ) जोगदंड यांच्या अति आग्रहामुळे शेवटीटाळता  आले नाही.बीड वरून निघालो प्रवास करत औरंगाबाद वरून धुळे - इंदौर प्रवास सुरू झाला.सहज गप्पा  सुरू आसताना .इंदौर शहरातून बाय पास ने चाललो होतो. जोगदंड भाऊ नी सहज विषय काढत इथे आपल्या कडचे अंकुश भवर आहेत.त्यांना फोन केला तर लगेच घरी या तसे जावू देणार नाही.आग्रह मोडता येन शक्य नव्हत.बाय पास ने 10 किमी पुढे गेलेलो परत गाडी फिरवली.शहरात प्रवेश केला.

घर शोधत रस्त्याने फिरताना इंदौर शहराच्या स्वच्छतेच्या प्रेमात पडायला वेळ लागल नाही.प्रत्येक चौकात सुंदर झाडे आणि शिस्तीत चालणारी वाहतूक रस्त्याच्या दुतर्फा ग्रीन बेल्ट विशेष त्यात झाडे होती.अन तीही हिरवीगार.यामुळे सुंदर शहर असल्याचा खास अनुभव आला.20 ते पंचवीस किलोमीटर च्या विस्तीर्ण भूभागात पसरलेल शहरात आम्ही जिथे जिथे फिरलो तिथे घाण नजरेस पडलीच नाही.शोधत शोधत घरी पोचलो.कोल्हे यांच्या घरी सुंदर जेवण टचुन खाल्ले. अन ढेकर देते वेळी नकळत मनातल्या मनात सुंदर जेवण बनवणाऱ्या ताई चे आभार मानले.सहज गप्पा निघाल्या इंदौर मध्ये आम्ही शिवजयंती मोठ्या थाटात करतो अख्ख इंदौर पाहतच राहत.अस म्हणताणा त्यांच शिवछत्रपतीवरील प्रेम पटकन डोळ्यात टिपले.आम्ही  प्रत्येक महिन्याला सप्ताह करतो.खुप महाराज मंडळी येतात.आम्हला वारकरी संप्रदाय इथे मोठ्या वैभवात टिकून ठेवायचा.दिवसभर काम करायच कीर्तनात तेवडं सर्व विसरून सहभागी होतो यात आमचा स्वार्थ काहीच नाही.हे वाक्य एखाद्या महाराजा पेक्षा महत्वाच वाटल. पण शेवटी नाळ कीर्तनात जोडलेली आहे. 20-30वर्षा पूर्वी गाव सोडलेली ही मानस या अपरिचित प्रदेशात लहान मोठे उद्दोग करत. स्वतःच अस्तित्व निर्माण करून आहे

त गाव सोडून चांगला जम बसला म्हणत आसताना अर्धा इंदौर मध्ये महाराष्ट्रातील मानस आहेत.एक मेकांना मदत करत आम्ही गुण्यागोविंदाने राहतो.आता इथल्या महानगर पालिकेत काही नगरसेवक आहेत.एक आमदार आहे अस अभिमानांने सांगत होती.त्या वेळी आम्हाला गड काबीज केल्या गत आपुलकी आणि दुसऱ्या क्षणी आनंद वाटला.

त्यांचा निरोप घेवून पुढं निघालो.उज्जैन मध्ये महा कालेश्वर दर्शन घेतले. तिथेच कालभैरव मंदिरात गेलो देवाला दारू पाजताना पुजारी पाहिले मंदिराच्या समोर देशी विदेशी सर्व प्रसादालय होती.श्रध्देने लोक घेऊन यायचे मूर्ती समोर बसलेल्या पुजार्याच्या हातात. ती शिलबंद बाटली द्यायची .मग येटित बाटली चे झाकण फोडून समोर ठेवलेय छोट्या प्लेट मध्ये अर्धी ओतून देवाच्या समोर धरली हळू हळू हात कानोडा करत अर्धी बाटली मूर्ती च्या तोंडात ओतली.अर्धी प्रसाद म्हणून दिली हे सगळं आम्ही दुरून पाहत होतो. मला हे मुळीच आवडल नाही.आमच्यातील एक जण सांगत होता.दारू कुठे जाते याचा पत्ता लागत नाही. मनात वाटत इथे किती ब्रँड एकत्र होत आहेत.आत मध्ये कॉकटेल होत असेल.कस पचवत असेल.परत हे पुजारी सर्वजण गेल्यावर आतली दारू कशी काडत असतील कदचित त्याच मंदिरात देवाचा प्रसाद  म्हणून कॉकटेलचा चेस तर होत नसेल. असा विचार करत मंदिरतून  बाहेर पडताना सहज वाक्य सुचले.यहाँ  प्रसाद के  तौर पे शराब मिलता है! टोपण टोपण सर्वजण घ्या म्हणत सर्वजण गाडीत बसलो.

मध्य प्रदेश मधील रस्त्याने थेट शिवपुरी मार्गे आग्रा  सर करायचे डोक्यात होते.जवळजवळ 600किमी चा प्रवास होता.रात्री थांबायचे कोठे विचार सुरू होता. लगेच जोगदंड भाऊ च्या डिक्शनरी मधील माजी सैनिकाचे नाव समोर आले.अशोक शीकदल याना फोन  केला. किती वेळ झाला तरी घरी या.वाट पाहतोय अस फोन वरून सांगितले.प्रवास करत पहाटे 2वाजता  पोचलो यात गुगल मैप असल्यामुळे अपार्टमेंट च्या समोर गेट वर गाडी उभा केली.सेकुरिटि ने विचार पुस केली.2 वाजता कॉल केला की लगेच तो माजी  सैनिक गेट वर हाजर.गाडी बंगल्यासमोर पार्क केली लागलीच सर्वजण उतरलो.घरात गेलो पाणी घेतल.आराम करायला सांगितले.सकाळी जेवण केल्याशिवाय जायच नाही."भाऊसाहेब "अस सांगितलं आम्ही उपवास आहे.काही करू नका ! बोलणार तेवडयात आम्हाला पण एकादशी असते उपवासाचे करू म्हणत तुम्ही आराम करा सांगून काकू निघून गेल्या  प्रवासामुळे पटकन  आम्ही सर्वजण झोपलो पण हे मेजर आणि त्यंच्या पत्नी तीन वाजल्या पासून तयारीला लागले झोपेत त्यांची कुजबुज आणि धडपड येकु येत होती.

सकाळी सहा वाजता आम्ही उठलो सात जण आंघोळ करून तयार होई पर्यंत काकूनी गरम चहा आणून दिला.सकाळचे साडे सात वाजता सर्वजण निघण्यासाठी तयार झालो.तोच मेजर काका नी फराळाला बसा सर्व तयार आहे.असा आवाज दिला आम्ही तर भारावुन गेलो.येव्डया सकाळी कधी बनवलं. विचार करत डायनिंग टेबल वर बसलो तोच समोर चे फराळाचे पदार्थ पाहून आश्चर्यचा धक्का बसला. गाजर काकडी आणि मुळा स्नैकस भरलेली प्लेट आली. दुसऱ्या ताटात भेंडीची भाजी डाळ अन् गरम गरम गव्हाची रोटी उपवास आहे म्हणणार तोच आमच्या चेहऱ्यावर चे भाव पाहून किचन मधून काकू बाहेर आल्या हिंदी मध्ये उपास के दिन  प्याज और लसूण नही खाते ? अस उद्गारल्या आम्ही शांत झालो.समोर ताट पाहिले अन् मनात म्हटलं माफ कर "विठ्ठला" आज फराळ तर करणार. सकाळी तीन वाजल्यापासून आग्रहाने स्वयंपाक करणारी माऊली आणि तिला मदत करण्यासाठी धावपळ करणारे मेजर भेंडी चिरून देण्यापर्यंत कष्ट आणि त्यामागच प्रेम.सकाळी 7.30वाजता प्रेमाने  सात जणांसाठी स्वयंपाक करून आग्रहाने वाढणारे शीकदल  दांपत्य आणि पुढे एकादशी ठरवले चला यांचे मन मोडायच नाही.

म्हणून पोटभर जेवण केल.स्वीट म्हणून काकूनी त्यांच्या माहेर अर्थात कोलकाता येथून आणलेला स्पेशल पेढा दिला.तो खाण्याचा सर्वात जास्त आनंद संतोष जोगदंड यांना मिळाला.शेवटी जेवण झाल्यावर आम्ही निघण्याच्या बेताने बाहेर आलो तर ते कुटुंब भारावून गेल डबडबल्या डोळ्यानी त्यांनी निरोप दिला."भाऊसाहेब" थोडा और लीजीए हा त्यांनी उच्चारलेला शब्द आज ही कांनात घुमतोय. सकाळी तीन वाजता स्मित हास्य चेहर्यावर  घेवून स्वागत करतांनाचा भाव आणी तीच स्माईल निरोप देतांना.भेटून आनंद वाटला या माणसाला तस पाहिलेतर आम्ही मित्राचे मित्र म्हणजे पाहुणे नाही तर रावले होतो मात्र त्यांनी केलेला पाहुणचार चिर स्मरणात राहील.किती प्रेमळ मानस तेही ना नात्यातले ना गोत्यात आणणारे खुप काही शिकवून गेले.शेवटी नाना महाराज यांच त्यावेळी बोललेल वाक्य आठवले भाग्यवान आहोत देशभक्ताच्या घरी एकादशीचा  फराळ मिळाला.मी त्यांना हिंदीत हे वाक्य सांगितले हसत मुख त्यानी आनंदने हमे भी तो वारकरी महराज के सेवा का अवसर मिला! हम धन्य हो गये. बोलत बोलत निरोप घेतला.सहज विचार मानत आला भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत याचा अनुभव आला -- या दांपत्य बाबतीत मूळ  पश्चिम बंगाल चे रहवाशी. राहतात  आग्ऱ्यात आणि महाराष्ट्रीयन  लोकांशी आपुलकी चे नाते हा अनोखा योगा योग अविस्मरणीय ठरला.

असो शेवटी आपुलकी आणि माणुसकी या मुळेच सर्व ठिकाणी प्रेम मिळत 
--
सुरेश जाधव 

Wednesday, 14 March 2018

दिल्लीवारी एक सुंदर अनुभव. हवा हवाई प्रवास प्रेरणादाई सफर !

हवा ! हवाई प्रवास प्रेरणादाई सफर !


दिल्लीवारी एक सुंदर अनुभव

विमानात बसणे हा तसा माझा पहिलाच  अनुभव तेवढी हाय फाय लाईफ स्टाईल फक्त  येकुन होतो. कसे असेल विमान या  बाबतीत आम्ही लहान असताना अनभिज्ञ होतो पुन्हा चित्रपटात पाहिल्यावर दुरून डोंगर साजरे तशी ओळख झाली.लहान असताना गावात  कागदाची विमान बनवणे आणि  हवेत उडवणे.तर  जहाज बनवणे तेही कागदाचे पुन्हा वड्या ला जावून पाण्यात सोडणे ईतकेच शहाणे आम्ही! कधी काळी शाळेत आणि चित्रपट पडद्यावर च्या हवाई सफरीचा अनुभव घेण्याचे खुप दिवसा पासून चे ईप्सित होते. 

गावातून शहराकडे आलो तरी याचं कुतूहल होतच.तिकीट कसे असेल?  किती पैसे लागतील? विमानात चहा किती रुपया ला असेल? जेवण घ्यायच की  नको?  सीटबेल्ट कसा बांधायचा?   आणि पदार्थ खाताना काय कशासोबत खायचे? त्यात शाकाहारी मांसाहारी ची भानगड ? मग नकोच का ? काय  सोबत घेवू?  आणि काय नको? गर्ल होस्टेस कशी असते? इथ पासून ते कदचित पोहचायला तर उशीर होणार नाही ना? विमानातून खाली पाहिल्यावर कसे दिसेल? या अनंत प्रश्नानी गोंधळ घातला होता. या सर्व  प्रश्नाचे उत्तर मिळण्याची वेळ जवळ येवून ठेपली..

तस अचानक दिल्ली ची वारी घडली याच कारण ही  वेगळच-- पंढरी च्या वाळवंटातील टाळ थेट दिल्ली मध्ये वाजणार होते.म्हणजे विराट ज्ञानेश्वरी पारायन सोहळा रामलीला मैदान दिल्ली या ठिकाणी प्रकाश महराज बोधले यांच्या कुशल नियोजनाने भव्य सप्ताह सुरू होता  त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे  भाग्य लाभले धन्यवाद जोगदंड (भाऊ )
---जाताना प्रवास "बाय कार"आणि परत लवकर बीड ला यायचे म्हणून  मी आणि  नाना महाराज यांनी अनेक अडचणीचा सामना करत अखेर दिल्ली गाठली.सप्ताहात सहभाग घेतला कीर्तन येकेले.दिवसभरात दिल्ली दर्शन केल यात बऱ्याच नवनवीन गोष्टी पहिल्या भारतीय लोकशाही चे पवित्र मंदिर पाहिले.त्याच वेळा मी ज्या जिल्ह्यातून येतो तो बीड आणि त्या चे प्रश्न दिल्लीत मांडणारे  दिल्लीत मधील 25लाख लोकांचे प्रतिनिधी आठवले.आम्ही या विषयावर बरीच चांगली वाईट चर्चा केली--संबंधित प्रतिनिधी अर्थात --"लोकसेवक " यांच्याशी संपर्क केला.काही काम मुळीच नव्हत मात्र 1400किमी प्रवास करून आल्यावर आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधी ची सहज भेट ही महत्वाचीच असते पण शेवटी नाहीच झाली --यात काही चांगले वाईट अनुभव गाठीशी बांधून विषय सोडून दिला.

सर्वात आठवणारी कायम लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे आदरनिय शरद पवार साहेब यांची भेट त्याच बरोबर खा सुप्रिया ताई सुळे सोबत चर्चा यातच आय टी च्या विद्यार्थी यांच्या सोबत पवार साहेब यांच्य मनमोकळ्या गप्पा ऐकण्याचा  योग आला   -- परत दिल्लीतील वारकऱ्यांना भेटायला येणार हा दिलेला शब्द --यात फोटो काढताणाचा बाणेदारपणा आजच्या दिवसाचा वेगळा अनुभव होता नंतर  काढलेले फोटो घेण्यासाठी करावी लागलेली धावपळ आणि तिथे मिळालेली वागणूक यामुळे वरच व्हीव्ही आयपी आणि शिष्ट पण ही अनुभवले असो.

यासर्व घटना क्रमात  जनपथ--राष्ट्रपती भवन --संसदभवन --इंडिया गेट --अमर ज्योत --गांधी संग्रहालय --लाल किल्ला --चांदणी चौक मार्केट --राजघाट -- पाहिले अप्रतिम आणि सौंदर्य तसेच भव्य तेचा दिव्य अनुभव देणारे ठरले. गर्मी आणि ऐसी या दोन्ही वातावरणात शरीराची होणारी पंचाईत सहन करत .. दिवस ढळतला--दिवस मावळा होता.पाय थकले होते.पण  शेवटी नाना महराज यांनी महाराष्ट्र सदन नावांची वास्तू कोणती ती पाहण्याकरता आग्रह धरला.मग आम्ही जायच ठरवल अशा ठिकणि  जिने बऱ्याच जणांचा" वास्तू" करून टाकला. मोबाईल मध्ये लोकेशन टाकून पोचलो.तर भव्य इमारत इमारतीत गेट वर कोमल आवजात नमस्कार शब्द ऐकला.आत प्रवेश करून  रिसेप्शन मधे रूम विचारल्या तर 6 हजार आणि  मंत्र्याची  किँवा आमदार खासदार यांची शिफारस अट ऐकल्यावर धक्काच बसला.आपल्या बजट मध्ये बसत नाही .म्हणून सहज फेर फटका मारला तर  फाईव्ह स्टार हॉटेल ला लाजवेल असे फर्निचर आणि शाही बडदास्त पाहून थक्क झालो.नक्की अस असल पाहीजे शेवटी महाराष्ट्र साम्रद आहे.पण  मूठभर  लोकानाच त्याचा फायदा गरिबाकडून कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेली वास्तू पुन्हा पैसे उकळन्यासाठी सज्ज हे विक्षिप्त वास्तव पहिले. चहा पिऊन थोड फोटो सेशन करत जय महाराष्ट्र ठोकला.

आत्ता रात्रीचे आठ वाजले होते परत गाड़ी सप्ताह मंडपात आली होती कीर्तन सुरू होते मस्त कीर्तन रंगात आले होते.तोच यमक करणाऱ्या केंद्रीय नेत्याचे आगमन झाले.त्याचे स्वागत वैगेरे वैगेरे झाले.परत त्यांना टाळ "आठवले" आणि वारकरी टोपी घालण्यावर चारोळी झाली.एकमेकाना टोप्या घातल्या नेते प्रेम दाखवून निघून गेले.--कीर्तन डिस्टर्ब होत पुन्हा सुरू झाले. 10 वाजता ज्ञानेश्वर माऊली ने कीर्तन संपले. आता विमान प्रवास त्यांच चक्र डोक्यात फिरत होत.कसे बसे  काही घास पोटात ढकलून हात धुवून रेडी.त्यात एअरपोर्ट वर  फोटो  काढायचे म्हणून मोबाईल चार्जिंगला लावला.कधी  12वाजतील आणि कधी  पोचेल अस झाल होत.11.30ला एअरपोर्ट कडे निघालो.गाडी सोडायला आली होती.मैप लावला पण भरवश्याच्या  म्हशी ने टोणगा दिला.मैप मध्ये रस्ता चुकला अक्षरश 1तास फिरत राहिलो रस्ते मोठे ट्राफिक त्यात महिती नाही.आणि  वेळ चुकते की काय याची चिंता पण सोडवायला आलेल्या संतोषराव आणि अशोक घोडके दाजी(भाऊ चे जावई) यांच्या मुळे एकदाचे टर्मिनल 3च्या गेटवर  पोचलो.ड्रॉप करायला आलेल्याचा निरोप घेतला .

पहिल्यांदा अंतर राष्ट्रीय विमान भव्य विमानतळावर जरा सा गोंधळलेल्य अवस्थेत आम्ही दोघो अंदाजे गेट वर तिकीट दाखवून आत प्रवेश केला.इंग्रजीच थोड बहुत ज्ञान कामी आला ! plz म्हणून गोऱ्या मुलीला तिकीट दाखवल.तिनी बोर्डिंग साठी चेकिंग पोस्ट ला जाण्याची सूचना केली. लाईन मध्ये  उभा राहिलो पण शांत नव्हतो कारण महिती काहीच नव्हत  पुन्हा काऊंटर वर जावून  विचारत अतिक्रमण केल .एकदा चा बोर्डिंग पास मिळाला. आत्ता शांत पणे वेटिंग रूम कडे जाता ना मॉल पेक्षा जास्त घमघमाट आणि रात्री चे  1 वाजले आसताना सकाळची घाई आणि लगबग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. फोटो काढायचे का ? नको म्हणत हळूच सेल्फी घेतली.जिकडे पहावे तिकडे नवे द्र्श्य होत नवा अनुभवखूप काही शिकवून जातो. बरेच फोटो  टिपले.1तास वेटिंग केल्यानंतर 2वाजता विमानाच्या दरवाजा जवळ वेलकम करणाऱ्या सुंदरी चा कोमल आवाज कानावर पडला.मग सीट वर जावून बसलो.शेजारी कोण ? हा आणखी कुतूहलाचा प्रश्न ? पण मुंबईचा अंजान मित्र भेटला.बेल्ट अंदाजे लावला.परत माहिती असल्यासारखे अज्ञान झाकत नकळत शेजार्याला फॉलो करत.सर्व क्रिया केल्या.

एकदाच  2.25 मी विमान टेक ऑफ झाल.ताऱ्यांच्या सानिध्यात भारत भूमीचे लुकलुक नारे सुंदर दर्शन घडले. बऱ्याच दिवसाचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होताच! हेड फोन कांनात घालून लिव्हल वेळ कसा गेला समजल नाही. मधल्या सर्व सुविधाचा लाभ घेत.सकाळी 5 वाजता मुंबईत  लैन्ड झालो  -- पुन्हां काही वेळाने परत टेकअप झालो थेट औरंगाबाद सकाळी 6.20 एअर पोर्ट मधून दोघे बाहेर  पडलो. तो निर्धार करत पुन्हा प्रवास करायचा ! व्ही आय पी म्हणून ! संपूर्ण प्रवास प्रेरणादाई झाला
 
धन्यवाद
सुरेश

Tuesday, 13 February 2018

नाक कापल तरी ------ शिल्लक आहेच ! कारण गलिच्छ राजकारण चिंगारी पेटलीय वणवा पेटेल

नाक कापल तरी ------ शिल्लक आहेच ! कारण गलिच्छ राजकारण

चिंगारी पेटलीय वणवा पेटेल

(वळखण ) मातीतल्या माणसाचा मातीत जाई पर्यंत चा संघर्ष माणुसकी च्या नात्याने समजून घेता येईल का ? अस्मानी सोबत सुलतानी जीवावर उठते तेव्हा वाली कोण हा प्रश्न आजही अधांतरी च आहे. आत्महत्यावर  राजकारण करणारे  सर्वच जण  एका माळेचे मनी आहेत.राजकीय पोळी भाजण्यासाठी सरनाची  होळी  कमी  पडते की काय? याचा विचार  करतात लोकांच्या सेवेची हमी देणारे हमखास धोका देतात याच  उत्तर  70 वर्षाच्या स्वातंत्र्यात मिळाल नाही. जगण्याचा संघर्ष थांबला नाही तिथे आश्वासन देण्यात आणि स्वप्न दाखवण्यात डिजिटल पणा आलाय.खर तर चटणी मीठ  पाण्या सोबत ओली झालेली हक्काची भाकर मिळण्याचे स्वतंत्र जरी देवू शकलात तरी महापुरुषाचे लोकशाही चे स्वप्न पूर्ण होइल.अन्यथा इथली संवेदना विरहात स्वार्थी लबाड मंडळी लोकशाही चे कधी न सरनारे  ग्रहणच म्हणाव लागेल

---- लोकांच्या अन्नात माती कालवणाऱ्या लोकां नि जणांची नाही तर मनाची तरि बाळगा! विकास होईल ही भोळी अशा घेवून जगणारा मतदार तरी कुठे राहिला आहे ,आणि अजेन्डा घेवून वागणारा उमेदवार तरि कुठं राहिला ,कारण !सत्ता आणि पद हे जर लोकशाही चे भ्रष्टाचार पोसनारे कुरन असेल तर ,सामान्य मतदार त्याचा हक्क बजावत नाही तर ,या कुरणाला कुंपण लावत आहेत ,समिकरण ठरलय ,राजकारणात भांडवल गुंतवताना किती पट परत येईल याच गणित मांडलेल असत ,किती उल्लू बनवता राव ,एका रस्त्याला 10 नावं ,गावातल्या पाण्यात पाप ,आणि लोकांच्या अन्नात माती कालवणाऱ्या लोकां नि जणांची नाही तर मनाची तरि बाळगायला पहिजे . ज्याच्या बूढ़ा खाली सायकल नव्हती तो आज जनतेच्य छतडावर  एसी च्य गाड्या घेवून फिरवतो.हे कस शक्य होत ,गोर् गरीब लोकांच्या मुलाच्या खाऊ मध्ये डोकावनारे ,खाऊ राजकारनात आल्याने कुठली लोकशाही सम्रध होणार हा खरा प्रश्न आहे  बहिणी बाळी च्या कुंकवाला दारूचे व्यसन लावून समाज भूषण म्हणून मिरवणाऱ्या षंड आणि स्वःतला गुंड म्हणवून घेणार्या लोकांनी समाजाची इज्जत वेशिला टांगली आहे !

आर ! बस करा या तमास गिराचा कलुशित गैर व्यवहार ,नीति आणि मती गुंग झाल्या नंतर राजनीति च्या नादी लागलेल्या माकडा गत अवस्था आज यांची झालीय , लोकांची ----पुसण्या पर्यंत पुंड पुंड करणार्या आवलादी ची कमी आज  राजकारणात  नाही .

    त्यांच ही एक परती खर लोक घड़ी चा विचार करतेत तिथं पीढ़ी चं त्यांना काय देन घेण !पण आयुष्य बर्बाद करून मताचा घोळ आणखी कळून घेवु शकले नाहित तर भोगा आपल्या कर्मची फळ ! सुविधाच्या नावान असुविधा निर्माण करून समाजाला उध्वस्त करणारी लोक संधी साधु टपुन आहेत !
       लोक प्रतिनिधी म्हणून छक्के पंजे करण्या पेक्षा हे काय करतात . गाव आणि स्वःताची मानस ज्यालोकाना फक्त नावं वापरण्यासाठी लागतात त्या ठीकाणी राक्षसी वर्त्ती बळावलेली असतें ! कधी कधी नाक कापल तरी भोक शिल्लक आहे अस म्हणणारे काहि कमी नाहित ,आन ,भाका घेवून आणि पदरात घ्या म्हणणारे आणि  ,लोकमातेच्या पदराला भोक पाडून मातेचा पदर फाडनारे आज ही औसा पुणवेला उगवत असतात.अरे हलकटा नो कुठंल्या तोंडाने मत मागता !लाज वाटू द्या .स्वतःच्या स्वार्थ ची झोली भरण्यासाठी बंगल्यावर बंगले बंधून ,भूत पैदा करण्यासाठी आणि पोसण्य साठी  हे जर करत असाल तर याद राखा , तर छी थूक आहे तुमच्या जिन्याची ,दाडा आणि झेंडा कोणता यापेक्षा कोणत्या लोकांच्या समस्या सोडवूं शकतो याच चित्र माँडा म्हणावं ,काय लागत ओ सामान्य लोकांना ,कोणत्या?गरजा आहेत त्यांच्या जरा समजून घ्या !नुसते जाहिर नामे आणि प्रचार सभा घेवून लाखो रुपयाच्या उधळण करून मिळवलेला विजय आणि त्यानंतर निर्माण झालले प्रश्न हे वर्षानूः वर्ष तसेच आहेत !उन्माद आणि माजोरी पणा आता सोडून द्या ,तुम्हि मेंबर नंतर आहत आधी गावात माणूस आहत याच भान विसरून कस चालेल!बर् लोकशाही मध्ये पद आणि अधिकार काय कुणाच्या बापाची जहागिरी थोडीच आहे ! जे जमत नाही तें पुन्हा करण्याचा प्रयत्न का करता ! आत्ता तू नाही तर तुझा बाप दुसरा अस म्हणून धडा शिकवणे गरजेचं आहे!

शेवटी माझ पोरगं कुटं शिकल ,पहिजे पोरगीने काय केल पाहिजे घर कस असल पहिजे !दार कुटं  हे जस ठरवता ना .मग! विवेक जागा असेल तर माझा समाज कसा आहे ,कदाचित तो मझ्या आयुष्याशी तितकासा महत्वाचे नसेलही पण परिणाम करणारा तर नक्की आहे ! या कडे मी डोळस पणे लक्ष दिल पहिजे !पाच वर्षा साठी आपल प्रतिनिधीत्व आपन मत देवून बहाल करणार आहोत !फक्त नंतर लाज वाटू देवू नका आत्ता वेळ आहे , पुन्हा ------:----- म्हणण्याची वेळ येवू नये !

 इतिहास बदलायला मशाल गरजेची असते आज बेरोजगार आणि बेकार  युवक एकत्र  होवून  संघर्ष  करत आहेत.इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेत ला प्रश्न  विचारत  आहेत  याला दुर्लक्ष करून चालणार नाही शेवटी. चिंनगारी  छोटी असली तरी  वणवा पेटवायला कारणीभूत  असेते !


सुरेश जाधव