Tuesday, 31 July 2018

हाच तर गनिमी कावा , लक्षात ठेव भावा !

बलिदान नको !  योगदान द्या,  मग आरक्षण कोणासाठी ! 


सरणावर पेटणाऱ्या प्रेताला आरक्षणाची गरज मुळीच नसते , धगधगता अग्नी पेटवण्याच काम करतो , शिल्लक उरती ती फक्त राख , त्याच़  त्या राखेकडे पाहणारा अभागी "बाप" आणी स्वतः
पोट च्या गोळ्याला पेटताना पाहून आतल्या आता जळणारी "माय" टोकाच्या निर्णयाने  तुमची माती होते  राख झाली की सुटलात  "तुम्हीं" तुमच्या जीवावर घर दार सोडून आलेली "भाळ" आणी आभाळ फाटलेली तीच काय ,  ज्यांच्या आयुष्याची सुरुवात  केली त्या नव्या " फुलांना " आणी त्यांच्या स्वप्नांना बेचिराख करुन तुम्हीं निघून जाताय, मग हा लढा कोनासाठी , आरक्षण कोणासाठी ?  पोरक्या पोरांना पोटाशी धरणारा , पाठीराखा राहता नसेल , पोटाच्या पोरांचा आधार संपून बाप आणी माय  निराधार बनत असेल , तर आरक्षणाच संरक्षण नको आम्हांला ! 


अनेक पिड्या ज्यांना घडवायच्या आहेत , त्यांनी बिघडून कसं चालेल, अन्याया  विरुध्द बंड करुन पेटून उठूण  "शंड" पांढरंपेशी व्यवस्थेला "थंड" करायला मराठा लागतोच़, अशा लढय़ात पुरून उरण हें खऱ्या मावळ्यांच़ लक्षण आहे,  गनिमी कावा करतांना , जीव देन कधीच शिकवलं नाही, लोकशाही शासनास व्यवस्थेत निपक्षपाती राज्यघटनेवर आधारित, न्यायाच्या मार्गाने जान अपेक्षित आहे, साहजिकच़  गेल्या अनेक दशकांमध्ये न्यायिक मार्गाने जावून अन्याय वाट्याला येत असेल , चीड निर्मान होणं साहजिक आहे.जाणीव पूर्वक राजकारणासाठी संवेदनशील मुद्यावर सरकार म्हनून पालक असलेली यंत्रणा कुचकामी ठरत असेल तर , सय्यम सुटे समजू शकतो , मराठा आरक्षणा बाबतीत तेच झालं. आरक्षणाची मागणी ही अनेक दशकांची आहे, मात्र  2004 साली  पहिल्यांदा राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात मराठा आरक्षण देवू  (खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटक ) यांना नोकरीत व शिक्षणात आरक्षण देवू , असं गाजर दाखवलं, त्यांचा फायदा घेत सत्ता समीकरण जुळवली , प्रश्न तसाच आहे. तेव्हा पासून आज पर्यंत अनेक सरकार आली गेली, फक्त राजकारण करण्यात पुरतं , आरक्षण आठवलं , सत्तेवर गेल्यावर मागचे पाढे पंचावन सुरु झाले , 2014 साली भाजप सरकार सत्तेवर आले, आरक्षणासाठी विधेयक पारित करुन कायदा केला पण , हाय कोर्टात अडकलें, डोकं गहाण ठेवल्यागत पुन्हा चूक लक्षात आली ज्या समितीच्या आधारे आरक्षण  दिल्याचं "राण" पेटवल ती समिती सवैधानिक नाही, तो पर्यंत कोणालाच़ काही मालूम नव्हते ?

 फक्त लाळ घोटी धोरण राबवून "मामू" बनवण्याचं काम केल, पुन्हां असचं  कुटं पर्यंत चालणार , 58 आदर्श मोर्चा च्या अंती काही तरी निर्णय अपेक्षित होता पण तेव्हा पाने पुसण्याचे काम केल,  आजचे मरण उद्यावर ढकुण राज्य सरकार मोकळं झालं , आपण कसं फसवलं हें चर्चा करतांना , "पंत" संत पनांचा आव आणून वागू लागले, म्हणून दिल्या घेतल्या वचनांची आठवण करुन देण्यासाठी आणी कामचुकार सरकार ला जाब विचारण्यासाठी  ऑगस्ट क्रांती सुरु झालीय, यात महाराष्ट्राच़ खुप मोठं नुकसान झालं,आणखी होनार आहे, यात आर्थिक नुकसान मोजता येईल पण समाजिक शांतता भंग करणारे वादळ उठले याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे,  नाचता येईना अन् म्हणे आंगन वाकडे अशी गत झाली, जबाबदार पदावरील व्यक्ती कडून बेजबाबदार टेबलावर , दूध खूळ वक्तव्याच़ विखारी विष त्यांची गरळ टाकली , शहाणपणानी मिरवणारी माणसं येड्या गतवागू लागली की डोकं भडकत, हेच कारण झालं  भडका उडण्याचे , यात लाभार्थी बांडगुळ वळवळ करु लागले , आरक्षणाची खरी बाजू मांडण्यात सरकार अपयशी ठरले , "लांडगा आला "या गोष्टींची गत झाली.


आरक्षणाच खरं वास्तव समाजा समोर येणं गरजेचं आहे , महाराष्ट्र सरकार  आरक्षण देण्या संबंधी काय करतं हें मुख्य मंत्र्यांसह ,"फाईल" चे विधान करणाऱया विधानसभा सदस्यानी खरं समजवून सांगावं , भावनिक गोडवे गायच़ थांबवा , असो  पण आत्ता  मागासवर्ग आयोगा कडे प्रकरण दिले, त्यांचा अहवाल येणं बाकी, इथं पर्यंत प्रकरण येवून ठेपल, राज्य मागास वर्ग आयोगा च्या अहवालानुसार किती टक्के आरक्षण द्यायचं हें ठरेल ? नंतर विशेष अधिवेशन बोलवून, त्यावर बहुमताने ठराव  घेवून केंद्राकडे प्रस्ताव पाठवणे , नंतर परिशिष्ट 9 अंतर्गत समावेश आदी कायदेशीर प्रक्रिया त्यामुळं आरक्षणाचा मार्ग आणी प्रक्रिया कीचकट आहे, वेळ लागणार त्यामुळं 
सय्यम ठेवावाच लागणार आहे.

कायदेशीर बाबांविषयी जाणून घाई आणी अतताई पणा करण हें आडमुठ धोरण होईल, कायम स्वरूपी आरक्षण हें सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होवूनच़ मिळणार आहे, कलम( 31ब )परिशिष्ट 9 मध्ये समावेश करण्या बाबतीत तज्ञ मंडळी आग्रही आहेत, मात्र या साठी राज्यसरकारच्या बहुमतांची गरज असतेच , संवैधानिक मार्गाने जाताना या गोष्टीं चा विचार होणं अपेक्षित आहे, मराठा आरक्षण समर पेटत ठेवून भाजप सरकार ला पायउतार करण्याच़ षंढयंत्र सुरु ठेवण्याचा कट आहे का ? असा प्रश्न निर्मान होतो , यंत्रणा मोंडखळीस आणून वा सरकार पाडून मराठ्यांच्या पदरात काय पडणारं? पुन्हा तापवलेल्या तव्यावर भाकरी भाजनारे आणी ताव मारणारे दुसरे काही कमी नाहीत ,म्हणून  हाती धूपटन आलं असं होवू नये.

नव सरकार जून धोरण राबवत नाही पुन्हां नव्यानं  संघर्ष आणी त्यांचं बलिदानाच्या पाठीवर उभी राहणारी क्रांती किती सरण पेटवनार , यासाठी विचार करावा लागेल, सरकार च्या मानगुटीवर बसलेल्या मराठा समजाची समजूत काढून चालणार नाही, हें सरकारला कळून चुकलं आहे, ठोस पणे ठोक निर्णय तर घ्यावाच लागणार आहेच़ , या शिवाय गत्यंतर नाही , पण या प्रकियेत वेळ लागणार आहेच ! म्हनून मराठा बांधवांना कळकळीची विनंती , पेटलेल्या मराठा आरक्षणावर पोळी भजनारा दुसरा वर्ग सक्रिय होतोय, यात हाफ चड्डी पासून ," नेहरू"  पायजम्या पर्यंत चे सगळेच , हातात "विळे" घेवून निघाले आहेत, यात कुणाचा हात "डावा" आहे तर कुणाचा "उजवा" यांना आरक्षणाच़ देन घेणं नाही, सरकारच़  "हें बेन" बदल पाहिजे हें पातळ यंत्री कट कारस्थान सुरु आहे, गोर गरिबी लोकांच्या मडय़ावर राजकारणाच़ लोणी खाणारी हरामखोर डोम कावळे टपून आहेत, यात निष्पाप आणी निरागस तरुण पोरांचा वापर केला जातोय, क्रुपया करुन तसा वापर होवू देवू नका, लढय़ाला यश आली तर लढणारे हात सोहळा भोगण्यासाठी शाबूत राहिले पाहिजेत , मावळा "कामी" येता कामा नये हें छत्रपती सूत्र लक्षात ठेवा, रागाच्या(दुःख) भरत घेतलेला निर्णय आणी आनंदात दिलेला शब्द महागात पडू शकतो, म्हणून डोकं जाग्यावर ठेवा,  विवेक बुद्धीने , विचार करा, जबबदारीची जाणीव ठेवून जन्म दिलेल्या जन्म दात्यांच्या स्वप्नांचे चीज करण्यासाठी तुमचं अस्तित्वात असन गरजेचं आहे, सरकार वर पाहिजे तेवढा दबाव आणी जरब बसवण्यात यश आलय, नाहीच जमलं तर ठोक पाऊल आहेच पण कुठल्याच  मराठ्यांच्या लेकीच़ कपाळ पांढरं पाहण्याची इच्छा नाही, एव्हढंच़ नाही तर माईचा आक्रोश आणी बापाचा फुटलेला कंठ त्यातून येणारा -ह्दय पिळवटून टाकनारा करुण आकांत , त्यातून वाहणारे अश्रूचे पाट असा अवखळ   "घाट"नकोच़ , रक्षा बंधनं साठी वाट पाहणाऱ्या  प्रत्येक बहीणचे संरक्षण करणारे तरुण  मनगट बळकट पणे पाठीशी राहिले पाहिजे, यासाठी आत्मत्याग , आत्मबलिदान , आत्महत्या , जीवनाचा त्याग नको, 


गेलेला जीव परत येत नसतो, "बाप"म्हणून असणारी व्यक्ती कोन हें दाखवण्यासाठी, कुंकवाचे संरक्षक कवच जगलें पाहिजे ,  धीर देणाऱ्या कुंकवाची जागा कोणीच घेवू शकत नाही,  मूल म्हणून जन्मदात्यास दुसरा कोनी आधार होवू शकत नाही, म्हणून कुटुंबांसमोर अंधार उभा करुन निघून जान बरं नव्हं,  कारण व्यक्तीच़ स्थान दुसरं कोनी घेवू शकत नाही, आर्थिक मदत नाही तर भावनिक आधार महत्वाचा असतो, प्रेमळ व्यक्ती च्या सरणावर बांधलेला ताज महल नेहमी मनात "सलत"असतो.म्हनून "सात"बलिदान देणारे मावळे गेल्याच शल्य बोचत राहिल, समाज म्हनून तुमच्या बलिदानाचा इतिहास आम्ही कधी विसरू शकणार नाही, पण कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी तुम्हीं जगणं अपेक्षित होतं.

आरक्षणाच्या जोरावर उद्याच्या पिड्याच़ भविष्य अवलंबून आहे , तुम्हाला चटके सहन करावे लागले, घामाचे रक्त गाळून आणी डोळ्यांची दुर्बीण करुन अभ्यास केला पण उचित यश मिळाल नाही , परिस्थितीच्या जोखडातू शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न भंग पावले , कारण होतं  शिक्षणाच़ शुल्क , बापाच्या रडवलेल्या चेहऱ्यावरील गर्भ गळीत झालेली कैक स्वप्नांची रांग डोळ्यातून वाहून जातांना पाहिली , माझा मुलगा डॉक्टर व्हावा कोणत्या  बापाला वाटणार नाही पण, समोर चा फीसचा डोंगर डोक्यानं धडका देवून फुटणार नाही हें कळून चूकल होतं तर अधांतरी शिक्षण सोडव लागणारी बरीच बांधव आहेत, पण धीर खचून न जाता सय्यमाने शिखर सर करता येते, छत्रपती च्या लढय़ा वर्ष च्या वर्ष चालत होत्या, म्हणून मावळे न गमावता गनिमी घायाळ करुन घालवला पाहिजे ! हाच तर गनिमी कावा , लक्षात ठेव भावा ! 


सुरेश जाधव (महाराष्ट्र1)
मो-9404204008

Tuesday, 24 July 2018

बिना शेंडीचा "चाणक्य" ! बोला की "साहेब" ?

  • .


मराठा आरक्षण,  "जाणता" राजाची अस्पष्ट भूमिका !

राजकारणातील "चाणक्य" शेंडी (नसलेला) यांच मराठा आरक्षण संदर्भातलें निवेदन (पत्र ) वाचलं ! सरकार च्या भूमीकेवर संशय घेत ! अतिशय सावध पवित्रा घेतलाय ? शांत संयमाचे आवाहन केलें! त्यांत जेवढी मराठा आरक्षणाची काळजी त्या पेक्षा obc आरक्षणाला धक्का लागू देवू नका ? असा इशारा करुन पुन्हा निसटून जात असलेली "वोट" बँक सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला ? वा साहेब छान अभिमानाने आमच्या छातीत "गोळा"उठला साहेब ! इथं मराठ्यांची पोर मरायला लागली ! स्वतःच जीवन संपवत आहेत, तीथे तुम्हाला obc ची काळजी, एस.सी, एस.टी,  ओ बी सी ला धक्का लावता कामा नये ? तुम्हीं जाणते आहात नां तर मराठा आरक्षणाच खरं काय ते स्पष्ट सांगा ? राज्य सरकार च्या अखत्यारित आहे.असे उच्य न्यायलय सांगत .जे मुस्लिम आरक्षण टिकलं तसं मराठा आरक्षणाच काय झालं ते तर  खरं सांगा ? आरक्षण देता येते का ? नाही?  नसेल तर अडचण काय ? द्यायचं तर कसं ? याबाबत आपली भूमिका स्पष्ट महाराष्ट्राला सांगायाचं सोडून , आपलं कळलाव धोरण सुरुच आहे.

तुमच्याच वरदहस्ताने आमच्याच समाजातील मूठभर चिमूट भर "जातभाई" अर्थात समाज बांधव "सम्राट" झाले.कुणी "सहकार सम्राट" कुणी "साखरसम्राट" कुणी "शिक्षणसम्राट " महर्षी ची काही कमी नव्हती. त्यांत तुम्हीं बागायतदार भागाचे पाण्यानं पुष्कळ दान दिलेल्या शिवार चे !  तुम्हीं आपलपोटी धोरणांचा पाऊस पाडत ! फक्त येका भागाचा विकास केला. तो तुमचा डोळ्या समोरचा सुजलाम सुफलाम पश्चिम महाराष्ट्र याबद्दल आपलं कौतुकच शेवटी "अगोदर पोटोबा नंतर विठोबा " हें ही आम्हांला कळतय .पण नंतर आमचा अर्थात जाती चा विचार होईल पण नाही. पक्ष पातीपनांचं ग्रहण लागल्यागत आपणास या बांधवांचे प्रश्न दिसलेच नाहीत. ओसाड माळरानावर करपून जाणारे शेतकरी दिसलेच नाहीत.आपल्याच संस्थेच्या दारात अँडमिशन साठी ताटकळत उभा राहिलेंला बंडीतील शेतकरी बाप दिसला नाही ! का तर सत्तेचे आवरण आपल्या डोळ्यांवर होते. त्यांत स्कॉलर विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही संस्थांनिकाची बिना भांडवली कंपनी असते. यात वोट बँक पण भरते आणी नोट बँक पण दुहेरी फायदा होतो म्हटल्यावर कोनांचं काय ?  यात उसाचा पैसा असलें आपल्या भागतील सधन कुटुंब एपतीने पैका भरत होती.त्या स्पर्धेत आम्ही कधीच गळून पडलो होतो. आमचे प्रश्न मांडनाऱ्या "गड्या" आपल्या समोर पाय घड्या घालत होत्या त्यात त्यांचं भलं झाल.' अपना काम बनता--मे गई जनता' या धोरणांने सर्व काही सुरु होतं . मात्र या धोरणां मूळ मराठा समाजाचं कधी न भरून निघणारे नुकसान झाले याला जबाबदार कोन ? साहेब उत्तर द्या


वा ! मानलं बुवा साहेब ! आपली भूमिका अजब आणी आपले निर्णय गजबज , महाराष्ट्राचे 3 वेळा मुख्यमंत्री होते आपण ? 2 वेळा केंद्रीय मंत्री सुध्दा होते ? दिल्लीतील वजनदार नेते , विरोधकांना आपली करंगळी सुध्दा सापडत नाही ?  आपल्याच देखत मंडल आयोग लागू झाला ?  नामांतर आंदोलन तर आपणच खेळलात ?  पुतळे वाद तर किती भूतलावर केलें ? किती किती लोक रस्त्यावर उतरली. यात आरक्षणा बाबतीत कित्येक समित्या आणी आयोग आले त्यांत आपलं म्हणणं कधी स्पष्ट मांडलं त्यांच्या साठी काय केलं ? आज विचारायचं नव्हतं पण प्रश्न उपस्थिती होतो.आपल्या माणसांनी आपल्याच लोकांना कसं नागवलं! गरजे पुरतं वागवलं ! वाऱ्यावर सोडून भिकेला लावलं ! याचं उत्तर शोधायचं होतं , साहेब आपण ठरवलं तर पंतप्रधान बदलू शकता , राज्याची सत्ता तर आपल्या बाये हात का" खेल" पण अजून मला समजलं नाय मराठा आरक्षण म्हटलं की आपण त्यांची "टिंगल"तरी करता किंवा "बगल" तरी देता अशी भूमिका ?

कै.अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी आयुष्यभर लावून धरली शेवटी अपयश यांमुळे खचून गेले.तेव्हा पासून अर्थातच 1990 पासून या मागणी संदर्भात मराठा समाज आग्रही आहे.त्यांचं कारण समाजिक आणी आर्थिक पीछे हाट ! पण आपल्या राजकारणाचा तो धडाडीचा काळ होता.आपल्याला तेव्हा पासून  2014 पर्यंत या प्रश्नाकडे लक्ष्य द्यावं असं कधी मनातून वाटलच नाही. पुन्हा निवडनुक तोंडावर आली की त्या अगोदर आपल्या चेल्यांकडून  बऱ्याच आरक्षण यात्रा चे महानाटय़ प्रयोग पण केलें. शेवटी चौदाला धोका लक्षात आला की ?  तुम्हीं अस्सल राजकारणी ! 2014 मध्ये 16% आरक्षणाचा फुसका बार सोडला ? येवढच नाही तर घटनां बाह्य आरक्षनाचे आमिष दावखवले.ज्याचं घोंगड न्यायालयात अडकले आहे? का हो साहेब आमच्या गोर गरिबाचे लेकरू शिकून द्यायचं नव्हतं का ? नोकरी तर दूर फक्त चाकरी करावी ?


1999 च्या दरम्यान आपलं अस्तित्व टिकवण्याची वेळ आली त्यावेळी आपल्या नव्या पक्षाला याचं लोकांनी आपला पक्ष "जानता राजा " ची निर्णय म्हनून पूजू लागले भजू लागले ? स्वतंत्र चूल मांडल्या नंतर पुन्हा एकदा समाजाच्या अशा पल्लवीत झाल्या काहीं तरी निर्णय होईल. आपण सत्तेवर आलात थेट पंधरा वर्ष आपण भागीदारी ने सत्तास्थान "रगडुन" काडलें ! कर्जमाफि आदी निर्णय प्रति "बळीराजा"ची उपमा देण्यासाठी आणी कार्यकर्त्यानां घोषणा देण्यासाठी  फायद्याचे ठरले कारण कर्ज माफित पण पक्षपाती पणा झाला." पश्चिम "बाजू सरस ठरली.असो शेवटि आपण राजकरण "पट्टु ", लाभाशिवाय वेळ आणी अर्थ ,व्यर्थ खर्ची करु नये.  या नुसार आपण आज तागायत काम केलेंली संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे.

खंत येवढीच आहे पहाडासारखे तुमचे व्यक्तीत्वं आणी कर्तुत्व पण मराठा समाजासाठी वांझोटी का ठरले वो ?, शिवस्मारक , मराठा आरक्षण , गड किल्ले संवर्धन , अभ्यास क्रमातील छत्रपतीचा खरा इतिहास, "छत्रपती शाहू स्कॉलरशिप " अण्णासाहेब पाटील महामंडळ भरीव आर्थिक मदत, मराठा समजातील मुलांचे उच्य शिक्षणातील प्रमाण वाढवणे.मराठा समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत ,
मराठा वसतिगृह संदर्भात ठोस पाऊल ?  या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत का ? साहेब आपल्या पक्षाकडे? कागदोपत्री उत्तराचा भूतकाळ सांगुन भविष्यात बदल्याचे आमिष दाखवू नका ? आज दिशाहीन झालेल्या तरुणांना आरक्षणाचे म्रूगजळ आज गोड वाटू लागले.कारण "पाटील" असलेला समाज भिकाला लागलाय?  तशी तुमच्या चिमूटभर बगल बच्चाचीचलती आहे.कारण ते आज  "सम्राट" वरून "माफिया" झाले आहेत हें वेगळं सांगायला नको ? पण मराठा समाजाचं वास्तव विचित्र आहे.गावातील मुलं किती टक्के शिक्षित आहेत , त्यांत ऊच्च शिक्षणानं पुढारलेली किती आहेत ? क्लास 1किती ? एम बी बी एस ? एम डि ?  या बाबतीत "पश्चिम"भाग वगळता आकडे वारी काडा बरं जरा एकदा मग लक्षात येईल.याही पेक्षा आपण शेतकरी आत्महत्ये बाबतीत खुप सजग आहात म्हणे ? मग तोही आकडा घ्या एकटय़ा मराठवाडा आणी विदर्भात 42 आत्महत्या मराठा समाजच्या आहेत.मग तरी तुम्हांला जातीचं देन घेणं नाही .तुम्हाला काळजी obc,  sc, st, च्या मताची कारण भाजप सरकार चा डोळा त्यांच्यावर गोळा झालाय. शेवटी मराठे कुटं जातील ते तर आपलें आहेत."सत ना गत " पण लोकांच्या लक्षात येतय.58 मोर्चा मध्ये कुणाचं किती पाठबळ आणी संख्या बळ होतं.पण या मोर्चा नी येक झाक झालं, श्रेय वादच संपुष्टात आणला, बेगडी पुळका दाखवणारी माणसं बाजूला केली, तर "पुडी" सोडणाराची काडी लावायला मागे पुढे पाहत नाहीत.आत्ता जन मतांचा उद्रेक झाला आहे, "नवरा मेला तरी चालेल पण सवत राडव झाली पाहिजे "ही शेंडी ची  राजनिती तुमची असली तरी लोक आत्ता जाणून आहेत.

तुम्हाला अट्रोसिटीची काळजी ती असायलाच पाहिजे, कारण तुम्हीं "पुरोगामी " अट्रोसिटीचा कायदा बदलू देणार नाही, obc आरक्षनाला धक्का लागू देणार नाय ? एस सी एस टी  वरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत ? अशी तुमची भूमिका ? नाय  तुम्हीं काळजी करायलाच पाहिजे? पण यात महाराष्ट्रातील मराठा समाज कुठंय ! कुणबी बांधव ते पण मराठा आहेत , त्या obc मधील जागेची वाटणी करा ना साहेब तुमची जात कुठंय ?  हो आत्ता आठवलं तुम्हीं पुरोगामी नव्हं का ?  काय बुरखा पांगरलाय राव झक्कास ! "घरचे नागवले येशी पाशी , दाशीचे डोहाळे पुसी"अशी गत झाली ?

भाजप वाल्यांना तर  obc सह इतर मागसवर्गीय यांच्या वर डल्ला मारायची नामी संधी आलीती ते सोडणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहेच महाराष्टातील 60% मराठा समाज हा कॉँग्रेस राष्ट्रवादी मध्ये 20% शिवसेना 20%भाजप आणीउरला सुरला 10%इकडे तिकडे , मग ओबीसी ची  "वोट बँक" 52%आरक्षण लाभान्वित घटक म्हणजेच मी लाभार्थी यांना नाराज करुन कसे चालेल .भले मराठा झाला तरी चाललेलं म्हनून नोकरभरी थांबवायची नको? असा घाट सुरु आहे. यात मराठा आणी इतरवाद लावून पोळी भाजण्याचे षडयंत्र सुरु आहे.सरकार आणी विरोधक यांच्यात त्राता,  वाली, तारक असं प्रामाणिक कोणीच नाही हा गैर विश्वास या तरुणांत बळावत चालला आहे.तो लोकशाहीस घातक आहे, अशी परिस्थिती ओढवून घेण्यात इथली राजकीय इच्छा शक्ती कारणीभूत आहे. संवेदनशील मुद्याच्या गरमी वर स्वार्थी राजकारणाची पोळी कशी भाजली जाईल यांचा विचार करणाऱ्या औलादी सत्तेवर आल्या त्यामुळं वाटोळं झालं .

आता कोणाचं किती योगदान बिगदान आहें ते घाला चुलीत आदी आरक्षण द्या या हट्टाला पेटलेल्या तरुणांनाची समजूत कशी काढणार ?  का पुन्हा यांच्यात लढाई लावायची दंगली घडवायच्या रक्तपात करायला लावून, दंगली वर रक्त रंजीत सत्ता मिळवायची हें ठरवा, यात आत्ता जातीच्या नावावर स्वार्थी पोळी भाजनाऱ्याच्या बुडा पर्यंत ऊब जाणार हें निश्चित आहें? जाती वादला खत पाणी द्यायच थांबवा ! मराठा तरुणां मधील तीव्र असंतोष आत्ताचा नाही याला बरीच दशक जबाबदार आहेत, यात कोणते पक्ष होते आणी कोणते पिल्लू यांचा वाट किती ? हें सर्वांना ठावूक आहे,

यात भिती येवढीच आहे ज्यांच्या साठी चे आरक्षण समर सुरु तोच यात खचून आत्महत्या करतोय.दुर्दैव याबाबतीत गेंडय़ाच्या कातडी च्या गाजरानां काहीच देन घेणं नाही उलट तोंडातून विखारी विष ओखूण आगीत पेट्रोल टाकीत आहेत, पण लक्षात ठेवा हा आता पर्यंत मूक असलेला मोर्चा आत्ता  ठोक मोर्चा  झाला यात पांढरपेशी विरुध्द ची खदखद संतापातून बाहेर येते, यांचा रोख ठोक महाप्रसाद घेण्याचं अहो पुण्य एकास लाभले , त्यांची "खैर" झाली तर दुसरे "भांबारुन" गेले म्हंजे कानाऊन गेलं !

शेवटी आरक्षण हें काही कपाटात ठेवलेली फाईल किंवा धनाची पेटी नाही , ते घटनेमध्ये आणी न्यायालयाच्या चौकटी बसवले पाहिजे  हें ही आम्हांला कळत , जसं आहे तसं कायद्याच्या कसोटीत बसवायचं काम सरकारच आहे.यात वेळेच गाजर नको ? ठोस निर्णय हवा आहें,  म्हनून ठोक मोर्चा सुरु आहे यांची तीव्र जाणीव सरकारनं घ्यावी अन्यथा , पेटले ल्या प्रत्येक सरणावर क्रांतीची मशाल पेटायची वाट पाहता ? मायबाप सरकार काय ते या तरुणांना समजवून सांगा फक्त गाजर नको" शेवटि  

सरणावरती जळतात आज अमुची प्रेते, उठतिल त्या ज्वाळा मधुनी भावी क्रांतीचे नेते,
लोह दंड हें पाया मधले खळाखळातुटणार , आई! खळाखळातुटणार गर्जा जय जय कार क्रांती चा गर्जा जय जयकार !  


 सुरेश जाधव
मो -9404204008,

Sunday, 22 July 2018

समतेचे क्रांतीस्थळ ,भक्तीचे वाळवंट - पंढरीची वारी


आषाढी एकादशी

आता विश्वतमके देवे !या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानांच्या मागणी मधील सर्व समावेशक तत्व हें वारकरी संप्रदायांच्या व्याप्ती आणी मर्यादा या बाबतीत बोलकं आहे .वारकरी विचार धारेने आजवर जी आदर्श घालून दिली.त्यामुळे समाजिक मूल्यांची बीजारोपण 12व्या शतकां पासून आजवर या मातीत तशीच जिवंत आहेत . भेद भाव तोडोणि घेतला प्रेमाचा गरळा। शुद्ध नाम श्री हरिचे लागला निज मुखी टाळा । हरी स्मरणाचेणी बळे अंकित केलें कळीकाळा । एका जनार्धनी अखंड सुख सोहळा ॥ 

या अभंगाच्या द्वारा भेदाच्या भिंतीनां मूठ माती देत अभेदाची अभेद्य विचार धारा तयार केली. त्या सर्व संत मंडळीनी  समाजिक क्रांती चे हबूक याचं पंढरी च्या वाळवंटात ठोकले होते. कर्मकांड आणी धर्ममार्तंडा विरोधात प्रबोधनाची चळवळ या वेळी सक्रिय झाली यांचे सूत्रधार-ज्ञानोबा यांच्या खांद्याला खांदा देवून चोखा मेळा होतेतर संत कबीर मोमीन हें मुसलमान होते.सेना नाव्ही -होते अशा अनेक संत मंडळीनां एकत्रित करून गोरोबा आणी संत नामदेव यांनी कीर्तन सुरु केलें यावेळी मुक्ताई जनाई गोनांई या कीर्तनात सहभागी असतं .ही समाजिक समानतेची गुडी याचं कीर्तनात उभी राहिली.

समर्थाच्या पंक्ती भोजने । तळील्यावळी ल्या एकची पक्वान्ने ॥
या प्रमाणाची प्रचिती येत असे.ज्या वेळी स्पृश्य-अस्पृश्य तेच्या संकल्पना मानवी मूल्य आणी माणुसकीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करतं होती त्या वेळी पंढरपूर मध्ये  सर्वाना एकत्रित करुन वाळवंटात  "काला"  करण्यात आला.यात
 एक मेका घालू मुखे।  सुखे घालू हुंबरी॥
भानुदास गीती गाता । प्रसाद देत पंढरी नाथ।

या विचाराच्या परिपक्वतेणें  रूढ परंपरा वर वार केला.म्हनून वारी ही आज सर्व अंगाने महत्वाची आहे, वारकरी या शब्दाची महती इथून सुरु होते.

खट नट यावे शुद्ध होवूनही जावे । दवंडी पिठी भावे चोखा मेळ ॥

यारे यारे लहान थोर । याती भलती नारी नर ।

आदी करुन वेश्या ही।  ही आरोळी त्या वेळी ठोकणे हें काही कमी कमालीचे धाडस नव्हते .म्हनून तर समाजिक क्रांती चे वाळवंट हेच शक्ती स्थळ होते तर विठोबा हा शक्ती देवता होता.याला भेदाचा विटाळ आहे.म्हनून तर आज संपूर्ण देश भरतील वारकरी या वारीला वेडावला आहे. या वारी च्या माध्यमातून खूप मोठी जाणीवेची उत्क्रांती झाली. संसारात थकलेला जीव या भोळ्याभाबडय़ाचा देव । पांडूरंगाच्या चरणी लीन होतं.संकटांशी दोन हात करण्याच बळ घेवून जावू लागला.

देवा सांगू सुख दुःख । देव निवारिल भूक या !

हा विश्वास या विठाबाई च्या बाबतीत आहे. म्हनून तर लाखो लोक ऊन वारा पाऊस व्यवस्था अव्यवस्था या बाबतीत विचार न करताना पंढरीची वाट धरतात. या वाटेवर जो भेटलं तो त्यांच्या साठी माऊली असतो ! म्हणजेच प्रत्येक जन हा माऊली रूपात भेटतो. उंच नीच गरीब श्रीमंत हा भेद मुळातच नसतो.यात वैचारिक देवानं घेवाण या बरोबर भावनिक आधार देणारी माणसे अर्थातच" माऊली" यांच्या सोबत गप्पा मरताना मनावरील दुखाचे ओझे  हलके होते.कित्तेक सासुरवाशीण आणी कित्येक सून पीडित, पती पीडित येव्ह्डेच नाही तर पत्नी पीडित या दुःखाला  अश्रू वाटे मोकळे करुन देता. माऊली जाऊ द्या!  हें आधाराचे वाक्य शक्ती आणी बळ देणारं असते.या बरोबर संसाराचे  मिथ्यत्वं सांगणारे संताचे अभंग स्व त्वची जाणीव करुन देतात.यामुळे वारीतील काकडआरती अभंग नाटाचे अभंग आदी अभंग सहज कानांवर पडतात. त्यातून दुःख निवृतीचे  अमृत शिंपडलें जाते.ते असे


 संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ । विश्रांती नाही कोठेरात्र दिवस तळमळ ।
काम क्रोध शूनी पाठीलागले ओढाळ । कवनामी शरण जावू द्रुष्टि देई निर्मळ !

या सर्व अभंगाच्या माध्यमातून संसारी रंजल्या गंजलेल्या जिवांना  जागे करण्याचे काम केलें जाते म्हनून वारकरी तत्व ज्ञान हें उद्धार करणारे आहे.

आषाढी कार्तिकी एकादशी च्या निमिताने एकत्रित येणारा वारकरी चंद्र भागेच्या वाळवंटात पाऊली खेळतो । एक मेकाच्या हातात हात घेवून विठ्ठल विठ्ठल गजरात न्हाऊन निघतो .तो त्यांचा भक्ती भाव आणी श्रद्धा विश्वास महत्वाचा असतो.नित्य नियमाने  आयुष्याच्या जगण्याच्या बळ घेवून जाण्यासाठी वारकरी विठ्ठल चरनी लीन होतात. वर्षभर ती ऊर्जा जिवंत राहते. म्हनून तर सामान्य लोकांच्या प्रेमाचा आणी विश्वासाचाठेवा अर्थात विसावा हा विठोबा आहे.

याचं वारीतील प्रत्येक बदल हा टिपण्याजोगा आहे. प्रबोधनांची पंढरी विधायक वारी ही संदेश देताना.सर्व अंगांचा विचार यात दडलेला आहे.याचं कारण ही तसंच आहे. यावर्षी स्वच्छ वारी निर्मळ वारी हरित वारी व्यसन मुक्त वारी , प्रदूषण मुक्त वारी .जाती निर्मूलनांची वारी, अशा अनेक अंगणाने आज भरून पावत आहे. यातच आधुनिक वारकऱ्यांची संख्या वाढली सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जगातील प्रत्येक देशात वारकरी तयार जाहले आहेत  विश्वस्वधर्म सूर्य पावो ।  या ज्ञानोबा च्या संकल्पनेची अनुभूती येत आहे. राजकीय, समाजिक, आर्थिक , माणुसकीच्या मळ्याला नवं संजीवनी देणारी वारी अनुभवातून कळते.

ज्ञान विज्ञानाची कास धरायला लावणारा "विठ्ठल "हा अध्यात्माचा विसावा आहे. तर विठ्ठल भक्ती ची पताका अखंड फडकवत ठेवणारे  वारकरी या भक्तीमार्गातील नंदादीप , प्रकाश दीपस्तंभ , आहेत.म्हनून तर

पंढरीशी जारे आल्यानो संसारा।  दिनाचा सोयरा पांडुरंग ॥ 
वाट पाहे उभा भेटीची आवडी । क्रूपाळू तातडी उतावीळ ॥ 
मागील परिहार पुढे नाही शीन।झालीया दर्शन एक वेळा॥ 
तुका म्हणे नेदी आणीकांच्या हाती । बैसला तो चित्ती निवडेनां ॥ 

या अभंगाची अनुभूती घेण्यासाठी या माऊली -- हा सोहळा आनंद । तुका म्हणे नाही भेद ॥ 

आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा !


प्रा.सुरेश महाराज जाधव (संत साहित्य अभ्यासक )
श्री बंकटस्वामी महाराज मठ नेकनूर
मो -9404204008