Friday, 8 April 2016



मरन मरु देईना अन् समाज जगु देईना!


आत्महत्येच्या दारातील ठोंबरे कुटुंब--------
खरचं एड् स बाधिताना समाज स्विकारतोयं?
अशिच अवस्था.वाट्याला आलेल दुख:भोगनार नरसिंह ठोंबरे च कुटुंब दुर्दैवान एड्स च्या विळख्यात सापडलं. मरनयातना भोगनार्या या कुटुंबातील सर्वच या दुर्धर आजाराने बाधित आहेत.काम होत नाहीं करता येत नाहीं  जरी करायचा प्रयत्न केला तर गावात कोनिन देत नाहीं.मग खायच काय? हा प्रश्न या कुटुंबासमोर आहे.
केज तालुक्यात  उंदरी गावातील एच आय व्ही बाधित ठोंबरे कुटुंबाला गावनेच बहिष्कृत केलय. चार वर्षापुर्वी गावातील नातेवाईक अन समाज कंटकानी हाकलुन देत.गावाबाहेर वाळीत टाकलय. गावापासुन २ किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला आपले बस्तान मा़डले.त्याना गावातील कोन्ही बोलत देखील नाहीं, दुख:तांना आधार तर सोडाच पणपण त्रास द्यायला कमि करत नाहींत.खरंच एच आय व्हि बाबत समाजात जनजागृती झालिय?
समाज व्यवस्थेचा भाग म्हणुन या लोकांना धिर आधार  दिला तर आयुष्य उरलेल आयुष्य सुखाने जगतिल पण हा समाज स्विकारायला तयार नाहींउलट पुंकर घालायची सोडुन जखमेवर मिठ चोळायचे काम करत आहेत.गावातील लोक किराना माल व रेशण सोडाच साध पाणी सुध्दा देत नाहीं.भाजी मिळाली नाहीं म्हनुण उंबराच्या दोडीची भाजी केली सांगताना नरसिंह च्या डोळ डबडबले
खरच दुख:काय असत याच भयान वास्तवमला त्याच्या डोळ्यात जानवलं
या व्यवस्थेशि लडताना नरसिंह ने थेट मुख्यमंत्री महोदया पर्यन्त पत्रव्यवहार केला पोलिसात कंप्लेट केली न्यायालयाात खेटे मारले  पण कोन्हिच मदत केली नाहीं याव्यवस्थेवरचा विश्वास उडाल्याच त्यान सागितल त्यात अपंग असलेल्या नरसिंह च्या पत्निनेतर दुख: चा पाडाच वाचुन दाखवला
किराना आनायला गेल तर दुकानदार संपले आमच्याकडे नाहीं असे सांगतात.दळन दळुन देत नाहींत कि बोलत देखिल नाहीं.जगाव कस बर्याच वेळा माझ्या मालकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल तुम्हि गेला तर आमच कस म्हणुन समजुत काडल्याची नरसिंहची पत्नी लतिका ठोंबरे हिने सागीतले खरच किती दुख:कोनत्या थरा पर्यन्त जातोय समाज त्याच वनव्यात होरपळनारा नरसिंह चा मुलगा शुभंम
शाळेत वर्गात बसु दिल नाहीं बर्याच वेळा शिक्षण घेताना अडचनि आल्या.जवळ च्यांनीच त्रास दिला.आत्ता तर तुमच्या मयताला पण ऐनार नाहींत तसेच कोल्हे कुत्र्याची धन व्हा असे भाविकतील नातेवाईक म्हनत आहेत .काय विश्वास वाटेल समाजा बदल हाडामासाची मानस मानुसकि विसरलीका?हा प्रश्न पडतो खरच खेड्यात ले संस्कार संपले काय असच वाटात दुख:जानुन घेवुन कमी करन जमेल का? कागदोपत्री सरकार फक्त एड्स बाबतीत जनजागृतीचा दावा करत आहे। पण समाजात आज असा कित्येक कुटुंबांना समाजाने बहिष्कृत केलय.वाट्याला आलेल दुख। भोगताना समाज  काटे टाकतोय हे खरच भयानक सत्य आहे .
अशा कुटुंबातील लोकांना फक्त उपचार  देवुन सरकारची जबाबदारी संपत नाहीं. रोजी रोटिच काय? ते सोडवन गरजेच आहे
भिक मागीतलीतरी कोन्ही देत नाहीं मरन यातना भोगनारे हे कुटुंब जर मदत मिळाली तरच यांची चुल पेटेल व जगेल, नसता आत्महत्येच्या दारातील ठोंबरे कुटुंब माळरानावरच संपुन जाईल
आणि ज्या समाजाला एड्स बाबतीत जनजागृतीचे दाखले दिले तेकिती फोल आहेत.याला जबाबदार कोन? शासन कि समाज. अन् यांच थोडक आयुष्य सुखान जगवण्यासाठी धिर आधार गरजेचा आहे
माळरानावर राहुन पोटाची भुक गिळताईल पण बोलायला कुन्ही नसेल तर मरन स्वीकार नं हाच पर्याय या कुटुंबा समोर समाजान निर्माण केलाययाच्याकडे सकारात्मक दृष्टिकोणातुन पाहने गरजेचे आहे कारण समाजातिल घटक आहे मानुस आहे पण ---कोन्ही हा प्रश्न सुटत नाहीं.
सुरेश जाधव
महाराष्ट्र १ जिल्हा प्रतिनिधि बीड-9404204008

No comments:

Post a Comment