यारे यारे लहाण थोर । याती भलती नरी नर ।
करावा विचार नलगे । चिंता कवणाची ।।
जगाला आध्यात्माच्या शि
कवणीतुन परम आनंदाचा व परोपकाराचा मार्ग पंढरीच्या वारीच्या माध्यमातुन प्रत्येक वर्षी दिला जात आहे. जात पात धर्म पंथ यांच्या बंधणाला झुगारून वारकरी वाळवंटात एकत्रीत पणे, आनंदाने आषाढी,कार्तीकी वारी मध्ये सहभागी होतात.एकमेकांच्या सुख-दु:खाला पांडुरंगाच्या चरणी आर्पण करून सर्वच या भक्तीच्या सोहळ्यामधे समर्पक भावाने सहभागी होतात. भेदभाव विरहीत,मानवतेच्या परमेश्वराची पुजा करण्याचा भाव अंतकरणात धारण करतात.
एकमेका साह्यकरू। अवघे धरू सुपंथ ॥
या संत तुकारामाच्या अंभगाला सार्थ ठरत गेल्या अनेक वर्षापासुन भक्तीची परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृ तीक वैभवाची साक्ष देत आहे.वारीचे सर्वअंगाने दर्शन करताना,सामाजिक परिवर्तनाची नांदी,व सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करून समतेची,व विश्वबंधुत्वची शिकवण देत जगासमोर आदर्श निर्माण करत आहे.याच वारीचे क्षेत्र पंढरपुरअसुन देव विठोबा प्रेमाची साक्ष देत भक्तीचे दर्शन घडवत आहे.त्याचेच वर्णन संत करतात.
नाचत जावु त्याच्या गावा रे। खेळीया सुख देईल विसावारे॥
संताच्या प्रेमाचा व सर्व सामाण्याच्या श्रध्देचा मुर्तीमंत गाभा भिवरेच्यातिरावरती उभा आहे.त्याच्या दर्शनाने संसराच्या अनंत अडचणींचा सामणाकरण्याचे बळ व कष्टातुन विश्रांतीचा अनुभव प्राप्त होतो. भोळया-भाबड्या भक्तांना आधारवड व श्रध्देने प्रेम वाटणारा विठोबा काही ही मागत नाही. संत बहीनाबाई खुप सुंदर शब्दात मांडतात
श्रीमंताचा बालाजी सोण्या चांदीने मडवीला ।
माझा गं पांडुरंग पाना-फुलात राजी झाला ॥
असा देव जो भक्ताकडे काहीच मागत नाही फक्त भाव युक्त अंतकरणानं आकळला जातो संत महात्मे याच देवाला आपल्या प्रेमाचे स्थान मानतातात.या सर्व भक्तीच्या साधनेत मानवतेच्या सर्वागीन विकासाची व नैतिक, सामाजीक उत्क्रांतीची बिजे संत आपल्या वाग्ड:मयात आदिकालापासुन सांगत आले आहेत.12 व्या शतकात सामाजिक विषमतेची दरी व कर्मकांड आणी आणी अंधश्रध्देच्या विरोधात आवाज उठवुन समाजीक बंड उभारण्याचे साहस वारकरी सांप्रदायातील सर्व संताणी केलेले दिसुन येते.लोकशिक्षणाचे व जागराचे काम निस्वार्थ पणे करून मानतेची शिकवन संतानी कीर्तन,भजन,भारूड,प्रवचन यांच्या माध्यमातुन केली.अनिष्ठ रूडी पंरपरा व चाली-रितीवर परखड शब्दात विरोध करण्याचे धाडस करणे हि जोखीम पत्कारली.
सामाज हिताचे व लोकाध्दाराचे काम करताना त्या काळातील प्रस्थापिताचे साम्राज्य मोडित काढण्यासाठी पंढरीचे वाळवंट हे विज्ञापिठ झाले होते.तर वारी ज्ञान अविश्काराचा सोहळा .बनली होती त्या भक्तीच्या व ज्ञानदानाच्या यज्ञात प्रत्येक वारकरी धारकरी बनत होता .व प्रबोधनाची चळवळ पुढे चालवत होता.त्यात एकाच वारीच्या साधनेत सर्व विकारांना तिलांजली देत भक्तीचा काला करून प्रत्येक जन त्यात तृप्त होत असें.यात पुरूष स्त्री, जातभेद, लिंगभेद, यांना थाराच नव्हता,एकमेकांच्या हातात हात घालुन.मुखी हरिनामाचा गजर करत भक्तीचे रसपान एकाच पंगतीस बसुन केले जात होते.
समर्थाचे पंक्ती भोजने । तळील्या वळील्या एकची पक्वोने।
तीच पंरपरा कायम करत वारकरी आजही पंढरीच्या वारीत सहभागी होतात.
वाळवंटात किर्तनातुन संर्व जाति धमाचे संत एकत्र ऐत आसत यात संत ज्ञानेश्वर ,संत नामदेव ,संत चोखा मेळा, संत जनाबाईं संत मुक्ताबांई, संत गोरा कुभार,संत राका -बंका,यासंत मालीकेची मांदी जमत आसे.तीच पंरपरा आजही सुरू ठेवत. आषाढी आणी कार्तीकी या मुख्य वारीसाठी लाखो वारकरी महाराष्ट्राच्या काण्या कापर्यातुन श्रध्देने मिळेंल त्या साधनाने ,पायी येत आहेत.या वारीतुन सांस्कृतीक चळवळ जोपासण्याचे व सामाजीक ऐक्य टिकुन ठेवण्याचा महान कार्य होत आहे.आज आधुनीक युगात डिजिटल जेाण्यातही वारीचे महत्व तेवढ्याच प्रमाणात पहायला मिळते.आर्थिक सामाजीक सांस्कृतीक,आणी प्रबोधनासाठी प्रभावी परिनामकारक ठरणारी वारी अनुभवुया
कार्तिकीचा सोहळा। चला जावु पाहु डोळा ॥
तो सोहळा डोळयाने पाहुया आणि भक्तीच्या कक्षा रुदावुन मानुसकीची,परोपकारची, नैतिकतेची,एकात्मतेची सद्बुध्दी दे.तसेच दुष्काळाने होरपळणार्या शेतकर्याला धिरान जगणचं बळ दे शेवठी
भेदसारे मावळुदे, वैर सार्या वासना ।
मानवाच्या ऐक्यतेची, पुर्ण होवो कल्पना ॥
फक्त आम्ही मुक्त मानु, बंधुतेच्या बंधना।
संत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना॥
ह.भ.प.प्रा.सुरेश महाराज जाधव
(संत साहित्य अभ्यासक)
श्री बंकटस्वामी मठ नेकनुर ता.जि.बीड
मो.9404204008
No comments:
Post a Comment