दुष्काळ गाव झाला निर्मनुष्य. माणसं गेली कुठे ! दुष्काळात 80%स्थलांतर ---!
बीड- दिवसभर ...अन्न अनी पाण्यासाठी भटकंती करणारे जीव दिवस मावळतीला गेला कीं घरटी शोधता..पण या गावातील...घरटीच रिकामी आहेत..80% लोकांनी गाव सोडला....बंद घरा समोरच्या चुली.. पेटलेल्य नाहीत...कीं दारावर लाईट बत्ती...बंद आहे.... कारणहि तसंच आहे... बीड जिल्हय़ातील बेदरवाडी या दुष्काळाच्या अंधारातल्या गावात मदतीचा प्रकाश कधी येणार यांची प्रतीक्षा ! पाहूयात...! स्पेशल रिपोर्ट....!
बालाघाटच्या डोंगर रांगेतील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी या हजार लोकवस्ती च्या गावात... आज घडीला फक्त म्हातारी माणसंच आहेत...बाकी माणसं गेली तरी कुठे--हे शोधण्यासाठी न्यूज़ 18 लोकमत ची टीम रात्री आठ वाजता गावांत गेली तेव्हा धक्कादायक वास्तव गावकऱ्यांनी सांगितलं ... पोटाची खळगी भरण्यासाठी देशोधडीला..गेलेली कुटुंब यात बेलापूर ला गेलेत...आम्ही इथं चटणी मीठ खातोय पाण्यासाठी काठी टेकवत जाव लागत...वय झालं पण काय करावं... दुष्काळान माणसांत माणूस ठेवलं नाही... पाण्याची काही तरी सोय करा....अस म्हणणाऱ्या या वयोवृद्ध आज्जी बाई....! बेदरवाडी गावाच्या वयोवृद्ध महिलांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत..
पाणी पाणी पाणी..पाण्यासाठी अनवाणी
अशीच काही परिस्थती...या लोकांची झाली.. दुष्काळ आणी पाणी टंचाई या समस्या तर पाठच सोडायला तयार नाही .यातच डोगरी भागातील गावाकार्याची तर खूपच मोठी पंचाईत झाली आहे.पाणी नाही, चारा नाही,पिक जळून गेली....जनावरं जागवायची कशी? कुटुंबाला जगवण्यासाठी ऊसतोडणीला स्थलांतर... गावांतील मजुरांना हाताला काम नाही---बाजार हट भागवावा कसा ? म्हणून लोकांनी गाव सोडला आज या ठिकानी फक्त वयोवृद्ध पहायला मिळतील...
गावात पाणी योजना कोरडय़ा आहेत...गेल्या दोन महिन्या पासून तीव्र दुष्काळ जाहीर पण उपाय योजनांना नाहीत... बोर अधिग्रहण नाही कि टँकर नाही... आम्ही मागणी केली पण अधिकारी फिरकले नाहीत ---असं उपसरपंच ज्ञानदेव काशिद सांगत आहेत...हाताला काम नाही टँकर ...ने पाणी नाही पाण्यासाठी च्या योजना ...कोरडय़ा
दुष्काळा मूळ पिके गेली l...चूल मूल संसाराचा गाडा चालवता कसा म्हणून या लोकांनी गाव सोडला.. आज गावांतील वयोवृद्ध लोकांच्या आरोग्यच्या समस्या देखील खुप मोठय़ाआहेत पण करणार काय....! गावापासून 15-20 किमी अंतरावर शासकीय रुग्णालयात त्या ठिकाणी जाण्यासाठी गाडी रिक्षा करुन जाव लागत..घरातील घर कर्ता नसले तर खूप अडचणी होतात..हाता पाया पडून कोणाला तरी सांगायचं...गोळ्या वर भागवायचे हेच गावा गावात सुरु आहे..
या गावांत चौथी पर्यंत शाळा पण काही मुलें आई वडिलां सोबत ऊसतोडणीला तर काही आज्जी आजोबा सोबत राहणाऱ्या शाळेतील मुलांचा जास्तीत जास्त वेळ पाणी आणण्यात जातो असं कीर्ती काटकर सांगते...
बंद घर , कोरडे रांजण,जळालेली तुळशी वृंदावन अंगणातील पाला पाचोळा गाव निर्मनुष्य होतं असल्याच दाखवतं आहे... गावाकडे चला---! या बापुजीच्या ओळीची आठवण तरी सरकार ला येनार ? दुष्काळाच्या अंधारात होरपळणाऱ्या गावाला मदत मिळणार का ? पाहूयात...
लक्ष्मणसूत सुरेश जाधव -9404204008
(न्यूज़18 लोकमत बीड प्रतिनिधी)
माझ्या गावची वस्तुस्थिती जगासमोर आणलीत
ReplyDeleteधन्यवाद सर वास्तव जगासमोर मांडल्याबद्दल
ReplyDeleteभयंकर व भयानक वास्तव, यांच्या जीवावर राजकारण करणारे बहिणभाऊ कुठे आहेत ?
ReplyDelete