माफ कर "विठ्ठला" आज फराळ तर करणार!
आपुलीकीचा अविस्मरणीय पाहुणचार दिल्लीवारी एकअनुभव
सारे भारतीय माझे बांधव आहेत-
--
सकाळचे साडे सात वाजता सर्वजण निघण्यासाठी तयार झालो.तोच मेजर काका नी फराळाला बसा सर्व तयार आहे.असा आवाज दिला आम्ही तर भारावुन गेलो.येव्डया सकाळी कधी बनवलं. विचार करत डायनिंग टेबल वर बसलो तोच समोर चे फराळाचे पदार्थ पाहून आश्चर्यचा धक्का बसला. गाजर काकडी आणि मुळा स्नैकस भरलेली प्लेट आली. दुसऱ्या ताटात भेंडीची भाजी डाळ अन् गरम गरम गव्हाची रोटी उपवास आहे म्हणणार तोच आमच्या चेहऱ्यावर चे भाव पाहून किचन मधून काकू बाहेर आल्या हिंदी मध्ये उपास के दिन प्याज और लसूण नही खाते ? अस उद्गारल्या आम्ही शांत झालो.समोर ताट पाहिले अन् मनात म्हटलं माफ कर विठ्ठला आज फराळ तर करणार. --असेच काही किस्से अविस्मरणीय
घर शोधत रस्त्याने फिरताना इंदौर शहराच्या स्वच्छतेच्या प्रेमात पडायला वेळ लागल नाही.प्रत्येक चौकात सुंदर झाडे आणि शिस्तीत चालणारी वाहतूक रस्त्याच्या दुतर्फा ग्रीन बेल्ट विशेष त्यात झाडे होती.अन तीही हिरवीगार.यामुळे सुंदर शहर असल्याचा खास अनुभव आला.20 ते पंचवीस किलोमीटर च्या विस्तीर्ण भूभागात पसरलेल शहरात आम्ही जिथे जिथे फिरलो तिथे घाण नजरेस पडलीच नाही.शोधत शोधत घरी पोचलो.कोल्हे यांच्या घरी सुंदर जेवण टचुन खाल्ले. अन ढेकर देते वेळी नकळत मनातल्या मनात सुंदर जेवण बनवणाऱ्या ताई चे आभार मानले.सहज गप्पा निघाल्या इंदौर मध्ये आम्ही शिवजयंती मोठ्या थाटात करतो अख्ख इंदौर पाहतच राहत.अस म्हणताणा त्यांच शिवछत्रपतीवरील प्रेम पटकन डोळ्यात टिपले.आम्ही प्रत्येक महिन्याला सप्ताह करतो.खुप महाराज मंडळी येतात.आम्हला वारकरी संप्रदाय इथे मोठ्या वैभवात टिकून ठेवायचा.दिवसभर काम करायच कीर्तनात तेवडं सर्व विसरून सहभागी होतो यात आमचा स्वार्थ काहीच नाही.हे वाक्य एखाद्या महाराजा पेक्षा महत्वाच वाटल. पण शेवटी नाळ कीर्तनात जोडलेली आहे. 20-30वर्षा पूर्वी गाव सोडलेली ही मानस या अपरिचित प्रदेशात लहान मोठे उद्दोग करत. स्वतःच अस्तित्व निर्माण करून आहे
त गाव सोडून चांगला जम बसला म्हणत आसताना अर्धा इंदौर मध्ये महाराष्ट्रातील मानस आहेत.एक मेकांना मदत करत आम्ही गुण्यागोविंदाने राहतो.आता इथल्या महानगर पालिकेत काही नगरसेवक आहेत.एक आमदार आहे अस अभिमानांने सांगत होती.त्या वेळी आम्हाला गड काबीज केल्या गत आपुलकी आणि दुसऱ्या क्षणी आनंद वाटला.
त्यांचा निरोप घेवून पुढं निघालो.उज्जैन मध्ये महा कालेश्वर दर्शन घेतले. तिथेच कालभैरव मंदिरात गेलो देवाला दारू पाजताना पुजारी पाहिले मंदिराच्या समोर देशी विदेशी सर्व प्रसादालय होती.श्रध्देने लोक घेऊन यायचे मूर्ती समोर बसलेल्या पुजार्याच्या हातात. ती शिलबंद बाटली द्यायची .मग येटित बाटली चे झाकण फोडून समोर ठेवलेय छोट्या प्लेट मध्ये अर्धी ओतून देवाच्या समोर धरली हळू हळू हात कानोडा करत अर्धी बाटली मूर्ती च्या तोंडात ओतली.अर्धी प्रसाद म्हणून दिली हे सगळं आम्ही दुरून पाहत होतो. मला हे मुळीच आवडल नाही.आमच्यातील एक जण सांगत होता.दारू कुठे जाते याचा पत्ता लागत नाही. मनात वाटत इथे किती ब्रँड एकत्र होत आहेत.आत मध्ये कॉकटेल होत असेल.कस पचवत असेल.परत हे पुजारी सर्वजण गेल्यावर आतली दारू कशी काडत असतील कदचित त्याच मंदिरात देवाचा प्रसाद म्हणून कॉकटेलचा चेस तर होत नसेल. असा विचार करत मंदिरतून बाहेर पडताना सहज वाक्य सुचले.यहाँ प्रसाद के तौर पे शराब मिलता है! टोपण टोपण सर्वजण घ्या म्हणत सर्वजण गाडीत बसलो.
मध्य प्रदेश मधील रस्त्याने थेट शिवपुरी मार्गे आग्रा सर करायचे डोक्यात होते.जवळजवळ 600किमी चा प्रवास होता.रात्री थांबायचे कोठे विचार सुरू होता. लगेच जोगदंड भाऊ च्या डिक्शनरी मधील माजी सैनिकाचे नाव समोर आले.अशोक शीकदल याना फोन केला. किती वेळ झाला तरी घरी या.वाट पाहतोय अस फोन वरून सांगितले.प्रवास करत पहाटे 2वाजता पोचलो यात गुगल मैप असल्यामुळे अपार्टमेंट च्या समोर गेट वर गाडी उभा केली.सेकुरिटि ने विचार पुस केली.2 वाजता कॉल केला की लगेच तो माजी सैनिक गेट वर हाजर.गाडी बंगल्यासमोर पार्क केली लागलीच सर्वजण उतरलो.घरात गेलो पाणी घेतल.आराम करायला सांगितले.सकाळी जेवण केल्याशिवाय जायच नाही."भाऊसाहेब "अस सांगितलं आम्ही उपवास आहे.काही करू नका ! बोलणार तेवडयात आम्हाला पण एकादशी असते उपवासाचे करू म्हणत तुम्ही आराम करा सांगून काकू निघून गेल्या प्रवासामुळे पटकन आम्ही सर्वजण झोपलो पण हे मेजर आणि त्यंच्या पत्नी तीन वाजल्या पासून तयारीला लागले झोपेत त्यांची कुजबुज आणि धडपड येकु येत होती.
सकाळी सहा वाजता आम्ही उठलो सात जण आंघोळ करून तयार होई पर्यंत काकूनी गरम चहा आणून दिला.सकाळचे साडे सात वाजता सर्वजण निघण्यासाठी तयार झालो.तोच मेजर काका नी फराळाला बसा सर्व तयार आहे.असा आवाज दिला आम्ही तर भारावुन गेलो.येव्डया सकाळी कधी बनवलं. विचार करत डायनिंग टेबल वर बसलो तोच समोर चे फराळाचे पदार्थ पाहून आश्चर्यचा धक्का बसला. गाजर काकडी आणि मुळा स्नैकस भरलेली प्लेट आली. दुसऱ्या ताटात भेंडीची भाजी डाळ अन् गरम गरम गव्हाची रोटी उपवास आहे म्हणणार तोच आमच्या चेहऱ्यावर चे भाव पाहून किचन मधून काकू बाहेर आल्या हिंदी मध्ये उपास के दिन प्याज और लसूण नही खाते ? अस उद्गारल्या आम्ही शांत झालो.समोर ताट पाहिले अन् मनात म्हटलं माफ कर "विठ्ठला" आज फराळ तर करणार. सकाळी तीन वाजल्यापासून आग्रहाने स्वयंपाक करणारी माऊली आणि तिला मदत करण्यासाठी धावपळ करणारे मेजर भेंडी चिरून देण्यापर्यंत कष्ट आणि त्यामागच प्रेम.सकाळी 7.30वाजता प्रेमाने सात जणांसाठी स्वयंपाक करून आग्रहाने वाढणारे शीकदल दांपत्य आणि पुढे एकादशी ठरवले चला यांचे मन मोडायच नाही.
म्हणून पोटभर जेवण केल.स्वीट म्हणून काकूनी त्यांच्या माहेर अर्थात कोलकाता येथून आणलेला स्पेशल पेढा दिला.तो खाण्याचा सर्वात जास्त आनंद संतोष जोगदंड यांना मिळाला.शेवटी जेवण झाल्यावर आम्ही निघण्याच्या बेताने बाहेर आलो तर ते कुटुंब भारावून गेल डबडबल्या डोळ्यानी त्यांनी निरोप दिला."भाऊसाहेब" थोडा और लीजीए हा त्यांनी उच्चारलेला शब्द आज ही कांनात घुमतोय. सकाळी तीन वाजता स्मित हास्य चेहर्यावर घेवून स्वागत करतांनाचा भाव आणी तीच स्माईल निरोप देतांना.भेटून आनंद वाटला या माणसाला तस पाहिलेतर आम्ही मित्राचे मित्र म्हणजे पाहुणे नाही तर रावले होतो मात्र त्यांनी केलेला पाहुणचार चिर स्मरणात राहील.किती प्रेमळ मानस तेही ना नात्यातले ना गोत्यात आणणारे खुप काही शिकवून गेले.शेवटी नाना महाराज यांच त्यावेळी बोललेल वाक्य आठवले भाग्यवान आहोत देशभक्ताच्या घरी एकादशीचा फराळ मिळाला.मी त्यांना हिंदीत हे वाक्य सांगितले हसत मुख त्यानी आनंदने हमे भी तो वारकरी महराज के सेवा का अवसर मिला! हम धन्य हो गये. बोलत बोलत निरोप घेतला.सहज विचार मानत आला भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत याचा अनुभव आला -- या दांपत्य बाबतीत मूळ पश्चिम बंगाल चे रहवाशी. राहतात आग्ऱ्यात आणि महाराष्ट्रीयन लोकांशी आपुलकी चे नाते हा अनोखा योगा योग अविस्मरणीय ठरला.
असो शेवटी आपुलकी आणि माणुसकी या मुळेच सर्व ठिकाणी प्रेम मिळत
--
सुरेश जाधव