"कुंकवा विरहीत आयुष्य म्हंजे समाजाने पेट्वलेल्या सरणावर धूपत धूपत जळणे" धड पेट ही घेईना आणि विजुन ही जाईनां!
कुंकू तस सौंदर्य अलंकारांतील एक भाग मात्र कधी ते भाग्य- अभाग्य आणि सौभाग्य या समाजांच्याखुळ्या कल्पणा आणि समजूतीचे वर स्वर होवुन ते जीवन मरणाचे प्रतीक तर नाही ना? याचा विचार कारवांच लागेल --स्वतंत्र पूर्व काळात सती प्रथा बंद करण्या साठी चा संघर्ष आज विधवा प्रथा बंद करण्या साठी आवश्यक आहे --त्या वेळी एकदाच्या मरणाने दुःख संपत होते--मात्र आज कुंकवा विरहीत आयुष्य म्हंजे समाजाने पेट्वलेल्या सरणावर धूपत धूपत जळणे
धड पेट ही घेईना आणि वीजुन ही जाईनां अशीच काही स्थिती असते --यात दोष काय असतो "त्यांच्या" मरनाने मरून गेलेला जोडीदार मात्र "हिच्या" आयुष्यत समाजाच्या विखारी आणि विषारी बिजाची पेरणी करून जातो
हळदी कुंकवाचा सण म्हणजेच मकरसंक्रांती प्रेमाचे स्नेह मिलन आणि दुःख वेदनेवर फुंकर घालून आनंद गीत गात महिलांनी धरलेला फेर हाच या सणाचा मुख्य उद्देश -- मात्र या उत्सवात तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश ही दिला जातो पण खरंच आपण अस वागतो का ? आपल्याच घरांतील जिचा पती वारला "ती" -- मुलगी.आई .बहिण चुलती मामी आत्या मावशी या महिलांना आजच्या दिवशी सन्मान देतो का ? संक्रांतीची साडी घेतो का ? हळदी कुंकू जावूद्या पण तीळ गुळासाठी सन्मानाने बोलावणार आहोत का ! तर या शुभेच्छाला महत्व आहे - नाही तर संस्क्रुतीच्या नांवाने गळे काढून कित्येकांच्या भावविश्वाचे बळी घेणार आहोत! पती पत्नी च्या पवित्र नात्यांत दुर्दैवाने अकाली जोडीदार गमावलेल्या ती च्या बाबतीत थोड़ा विचार केला तर बर होईल.कारण "ती" सुद्धा समाजातील माणूस म्हणून जीवनाचा संघर्ष करणारी आहे --एका कार्यक्रमात गेलो आणि जे पाहिले त्याने चीड आली कुटल्या आधुनिक युगात जगतो की अश्मयुगात या प्रश्नाच उत्तर मिळालं नाही!
वाजंत्री वाजवत होती .तरुणाई नाचत होती--निमित्त होत लग्नाच्या हळदी समारंभाच सर्वजण आनंदात होते.नवरा मुलगा पाटावर येवूं बसतो --हळदी च ताट पुढं येत तसी नवऱ्या मुलांची बहीण ते ताट हातात घेवून हळद लावण्यासाठी समोर येते हळद सुरू असते.पण त्याचं वेळी मुलींची मोठी बहीण हळद लावण्या साठी ताट हातात घेते तेव्हा "ति"च्या हातुन ताट हिसकावून घेण्यासाठी स्पर्धा लागल्यागत धडपड सुरू होते .हळद लावतांना हातातील ताट विस्कवून घेण्यात आल् याच कारण तिचा पती काही दिवसा पूर्वी मयत झालेला होता.बहिणीच्या अंगाला हळद पण लावता येत नसल्याने स्वताच्या नशीबाला दोष देत डोळ्यातलं पाणी आवरन्यासाठी कोपऱ्यात जाऊं अश्रू ला वाट वेगळी करून देणारी दुर्दैवी बहीण पहिली आणि धस्स झाला --- डोकं सुन्न झाल
बऱ्याच शुभप्रसंगी (चांगल्या कामी)जस की लग्न मुंज आदी करून आनंदच्या प्रसंगी आपण (जिचा पती वारला) "ती" या बाबतीत काय विचार करतो --जरा लक्षात आणा! भावाचं लग्न होत असतांना हळद लावण्याचा मांन कलवरी म्हंणुन बहिणी चा आहे .मात्र कुंकू नसेल तर कित्येक बहिणीला रोखलं जात --काय वाटत असेल यांनी यात तिचा काय दोष --या पुढे ओवाळणी करणं ओटी भरणं आदी.महिलांच्या कार्यक्रमात या माऊली कडे तोऱ्यात मिरवणाऱ्या कुंकू वाली कडून वारंवार हिणवले जात एव्हडंच काय तर --कां काय होत जर का तीन भावाला हळद लावली ओन्टि भरली तर काय होणार आहे पण नाही आणखी बुरसटलेले विचार डोक्यातून गेलेच नाहीत. दुर्दैव आपण फक्त कुडा च्या घरातुन सिमेंट च्या बंगल्यात आलोत "भिंताड" सुधारली पण "छाताड"नाही याच वाईट वाटत
-दुःखी माणसाला आधार द्या त्याचे अश्रू पुसा हे सर्व ग्रंथ शास्त्र सांगत आणि आपण काय करतो त्यांच्या जखमेवर मीठ सिंपडतो. ईथेच थांबतो का तर नाही उलट तिच्या कमजोर पोकळी ची जाणीव सतत व्हावी या साठी वारंवार टाळलं जात.बोलूं तर कधी क्रतीने हेटाळल जात हे विचित्रच आहे एकीकडे समतेचे झेंडे मिरवून स्त्रीपुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरिकडे सुशिक्षीत लोकांनीच "सुवासिनी"सौभाग्यवती"या मोठं विषेशनांच्या नांवाने पुन्हा दुसरी दरी निर्माण करायची .यात पुरुषा पेक्षा महिला जास्त जबाबदार आहेत.कुटल खुळ डोक्यांत घेतील समजत नाही.मात्रा "ती" अव्हेर न्याची कोणतीच संधी सोडत नाहीत.
प्रवास असो की सामाजिक प्रसंग यात कुंकू नसलं की टपून बसलेला डोम कावळे आणि त्यांच्या विषारी भेदक नजरा चुकवण्यासाठी करावी लागणारी धडपड ही "ती" ला रोजचीच असते येव्हडेच काय तर त्रास देणारे आणि चोच मारणारे कावळे यांच्या पासून संरक्षण व्हावं म्हणून छोटी टिकली लावते अस एका माऊली ने सांगितलं --
जन्म आणि मर्त्यू कोणाला चुकलाय का ? मग जिवंत माणसाकडे आपण एव्हड्या हिंन भावनेने का पाहतो ! की त्यांच्या माणूस पणावरच आपलां संशय आहे --सुखाने जगण्यासाठी माणसाने समाज निर्माण केला यात समाजातील कुटुंब संस्था ही प्रमुख समजली जाते --पुरुष आणि स्त्री ही संसार रुपी रथाची दोन चाके असतात --मात्र कधी कधी या सुंदर रथाला नियतीची द्रष्ट लागते आणि एक चाक निखळून पडते --मात्र जबाबदारी चा रथ एका चाकांवर सुरू असतो यात पुरुष असेल तर "नवं"चाक म्हंजेच दुसरं लग्न करायला लगेच तयार होतो मात्र स्त्री ला याची संमती दिली जाते का ? तर याचं उत्तरं नाही असंच येतं काही ठिकाणी मिळतंही असेल परवानगी पण क्वचित -बरं मग या संसाररथाच्या जबाबदाऱ्या पेलताना काय वाढून ठेवलं जात याची कल्पना केली तरी अंगावर काटे उभे राहतात -- लग्नात शुभेच्छा आणि भेट वस्तू घेवून आलेले नातेवाईक अशा दुःखद प्रसंगी श्राध्द झालं की मोकळे होतात आणि सुरू होतो तो नसंपणाऱ्या आयुष्याच्या प्रवासाचा टप्पा ज्यात "ती" एकलीच असते
हाडा मांसाची आणि रक्तानात्याची माणसे ज्यांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छाने "ती" चा सुरू झालेला सुवासिनीचा सुमधुर प्रवास मात्र पती च्या अकाली जाण्याने खडतर होवुं जातो --पती निधनाने "ती"च आयुष्यंच हिसकावून घेण्याचा समाज प्रयत्न करतो अस करणारे काही दूर चे नसतात मात्र खुळचट रुढी आणि परम्परा यांचे पालन करण्यांत आसुरी आनंद मिळतो का यांना--दुःख सागरात बुडालेल्या त्या असाह्य माऊली ला आधार देण्यायाऐवजी कुंकू पुसण्याची आणि मंगळसूत्र तोडण्याची घाई का असते --तसही चालतं बोलत आधार देणार माणूस निघून गेल्यावर निर्जीव रंगात आणि धातू मधें काय असतं --त्यांची आसक्ती थोडी असते? जीव लावलेलं माणूस निघून गेल्यावर कशात जीव अडेकेलं का पण किती --निष्ठूरपणे सर्वा समक्ष कुंकू पुसणारी आणि मंगळसूत्र तोडून दुःख सागरात डकलुन देणार्यानी तिच्या वेदांनाचा विचार केला कां? जखमेवर मीठ चोळनारी ही कुटंली घाणेरडी मानसिकता थांबलं पाहीजे कुटं तरी हे कुंकवाशिवाय चा संघर्ष काय असतो तो नाही कळणार --?
ऐन तारुण्यात वादळी आयुष्याची सुरुवात करून स्वप्नांच्या पाऊलवाटा शोधणाऱ्याला मनाला असा अचानक धक्का बसतो आणि आयुष्याची सुंदर रांगोळी विस्कटू जीवनाची घडी बिघडून जाते -- यात समाजाने कूट तरी "ती"ला सावरलं पाहिजे.आधार देवून सन्मानाने वागवलं पाहिजे .जगण्यासाठी चा संघर्ष तर प्रतेक जण करतो मात्र अशा प्रसंगी धीर आणि आधार महत्वाचा असतो.
एकीकडे शहिदांच्या बाबतीत विचार करतो पण वीर पत्नीला सन्मानाने जगू देतो का ? यांच आत्म परीक्षण व्हाव -- या संक्रांति दिवशी विधवाना सन्मानाने वागणूक देवून त्यांच्या बाबतीत विचार करायला लागलो तर खरी संक्रांत गोड होईल--
काल काकड हिरा गावात अशीच वेगळी संक्रांत पहिली आनंद वाटला -- मनीषा जायभाये आणि प्रतिभा हावळे या दोन शिक्षिका विधवा प्रथेविरोधात चळवळ उभी करत आहेत.काल रात्री ही संक्रांत 85 विधवा महिलाना तिळगूळ आणि साडी वाटप करून संपन्न झाली---अशादायक चित्र समोर उभा राहील चळवळ व्हावी.
सुरेश जाधव
9404204008