ठशाची" चेष्टा,कर्ज माफ़ी चे गाजर किती हाडभाड़ घेणार,
----
बाळा माझे ठसे उमटत नाहीत रे ,सात दिसा पासून चकरा मारते "माय"---ते आधार कार्ड मागत हाईत,मह्य नवर्याच्या नावावर 40 हजार कर्ज हाय,-- "त्याचे" ठसे उमटले "माय" पण भांडी घासुन अन् पाण्यात काम करून माझे हात उंगळलें की काय?म्हहे उमटू नाय राहिले, तू तरी सांग बावीस तारखी पत्तूर उमटतिल का?
साठीपार करून सत्तरीच्या उमबरठ्यर असेलेल वयोवृद्ध म्हाताऱ्य आज्जी चा हा प्रश्न येकुण धस्स झाल, काठीचा "आधार" घेवुन निराधार जीवन व्यतीत करणाऱ्याला "आधार" च्या रांगेत उभाकरून छळ चालू केलाय,अख्ही हयात कष्ट उपसुण-- हातचे कातडे निर्जीव चामडे झाले ,कित्तेक वेदने चे फोड़ संवेदना हरवल्या गत याच तळहातावर जिरुन गेले, चटणी मिटाचा मलम लावून,भाग्यरेषा न शोधता आयुष्य रेषा ओलांडणाऱ्या या लोकांना आज रांगेत उभा पाहिले आणि वाईट वाटल,
प्रत्येक बँके समोर च वास्तव खूप भयंकर आहे,यात" सेतु सुविधा केंद्र आणि आपल सरकार" यासर्व ठिकाणी कर्ज माफ़ी साठी रांगेत उभी नाहीतर आडवी झालेली मानस फक्त आशेने उभीआहेत ,यात नेट प्रॉब्लेम, लाईट अडचण,त्यात सर्वर जाम,आणि नंतर आधार मधील बोट यासगळ्याअडचणीचा सामना करत गावापासून बीड पर्यतचे 15 कीमी अंतर कापून आठ दिवस चक्रा मारणार्या याआज्जी आजोबाचे काय चुकलं वो-- बीड तहसीलच्या समोर आधार दूरूति केंद्राच्या रांगेत झाडाखाली बसलेले कुटुंब--- तोंडावर सुर्कुत्य पड्लेल्या आणि थोडा काळजी वजा खिन्न चेहरा,हातात कागद हिरव लुगडे आणि डोक्यावर पदर घेवुन नंबर येण्याच्या प्रतिक्षेत बसलेल्या आजी आणि ताटकळत उभा राहून वैतागून आडवा झालेला त्या म्हातारी चा म्हातारा , मळकट फडक्यत बांधून आणलेली भाकरी,अन् येण्या जाण्याचा होशोब करणारी आणखी काही अनपढ़ मानस, येकर दोन एकर चे मालक पण पूर्ति पंचायत करून टाकली ,आठदिवस चक्रा मारून आधार ने अडवले, शेवटी ठश्याच्या दुरुस्ती न झाल्याने हे कुटुंब पुरते वैतागून गेलय --
गावातिल प्रत्येकजण सुशिक्षित आहे या अवीर्भावाने कर्ज माफ़ी चा फॉम दीड मिनिटात भरन्याचा दावा मुख्यमंत्री साहेब करत आहेत,एसी च्या खोलीत, बदामचा शिरा तुंप टाकून गँसवर करून खावू घालनाऱ्या तुमच्या मँडमच्या बोटाचे ठसे बघून तुघलकी निर्णय घेतायराव,बाँधावरच कष्ट करून हातावर कूट रेषा राहतात का? जरा ईचार करा दमडी भर कर्जा साठीचामड़ी ची अट कशाला लावता,तिकडे गोर्या कातड्याच्या लोकांसनी विनाअट न मांगता कोट्यावधी देताराव,हा कातड्याचा दोष की सड़क्या मेंदूचा सांगा तरी, साहेब वाटत होत आमच जगण भी आपल्याला मान्य हाय पण ते सपशेल खोट ठरले! शेवटी तुम्ही तुमच्या बेभरवंशाच्या जातीवर आले,
आणि शेतकरी बोगस आहे , त्याच कष्ट नाटक आहे म्हणू लागले,बाप म्हातारा झाला म्हणून त्याच्या कामाच माप काढुण आईच्या कष्टाचा लिलाव करण थांबवा ! जरा लाई लावून वाईन पीनारे कधी पाहिलेत का? डोक जागावर ठेवुन सर्वा समक्ष कर्ज माफ़ी चा विठ्ठलाला दिलेला शब्द पाळा!
काय पोरखेळ लावलाय,अशा किती रांगा लावून आमची वाट लावताय हा भाबडा प्रश्न शेतकरी विचारतोय, त्यात तुमचे मंत्री10 लाख बोगस शेतकरी असल्याचा जावई शोध लावून जखमेवर मीठ चोळण्यचा प्रयत्न करत आहेत,मग साधा प्रश् पडतो सर्व हिशोब ठोकताळे आणि याद्या तुमच्या हातात आहेत, आधार बँक आणि पॅनकार्ड सगळा डेटा तुमाच्या घशातआहे मग रिकाम आमच्या लोकाची धावपळ का करताय लाज वाटू द्या जरा? शेतकर्या च्या घामाची कदर ,कष्टाचा आदर नसेल तर ही गाजर कर्ज माफ़ी देवून पाने कशाला पुसता त्या लोकांना तुम्ही रांगेत उभा करत,सनासुदिचे दिवस यातच आजारी,किती हाडभाड़ घेणार
हे वास्तव आहे कर्ज माफ़ी च्या गाजराच, आधार लिंक केल्यावर परत पुन्हा बोटाचे ठसे उमटत नाहीत तर आधार च्या डेटा सुरक्षित ठेवण्यची जबाबदारी कुणाची , एक दोन बाबतीत ठीक आहे पण गावातील 100- कुठे 200 लोकांची बोट उमटत नसतीलतर विचार करावा लागेल. तुमच्या अपयशाचे खापर सामान्य गौरगरीब शेतकरी अडाणी,वयोवृद्ध, लोकांवर नका लादू--- ज्याला बोट नाहीत त्याला ही संविधानाने जगण्याचा आधिकार दिलाय तो हिरावून घेतय का? तसा बोटाचा इतिहास आणि अंगटयाचा पराक्रम "हाताने" पहिलाय. तस बोट धरून चालायला शिकवणारे आणखी आहेत, लोकांना बोट धरून वाट लावायला वेळ लागणार!
शेतकरीपुत्र- सुरेश जाधव महाराष्ट्र1 प्रतिनिधी बीड
मो-9404204008