Friday, 20 November 2015

समतेची शिकवण देणारी पंढरीची वारी


यारे यारे लहाण थोर ।  याती भलती नरी नर ।
करावा विचार  नलगे । चिंता कवणाची ।।

     जगाला आध्यात्माच्या शि
कवणीतुन परम आनंदाचा व परोपकाराचा मार्ग  पंढरीच्या वारीच्या माध्यमातुन प्रत्येक वर्षी दिला जात आहे. जात पात धर्म पंथ यांच्या बंधणाला झुगारून वारकरी वाळवंटात एकत्रीत पणे, आनंदाने आषाढी,कार्तीकी वारी मध्ये सहभागी होतात.एकमेकांच्या सुख-दु:खाला पांडुरंगाच्या चरणी आर्पण करून सर्वच या भक्तीच्या सोहळ्यामधे समर्पक भावाने सहभागी होतात. भेदभाव विरहीत,मानवतेच्या परमेश्‍वराची पुजा करण्याचा भाव अंतकरणात धारण करतात.
एकमेका साह्यकरू। अवघे धरू सुपंथ ॥
या संत तुकारामाच्या अंभगाला सार्थ ठरत गेल्या अनेक वर्षापासुन भक्तीची परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृ तीक वैभवाची साक्ष देत आहे.वारीचे सर्वअंगाने दर्शन करताना,सामाजिक परिवर्तनाची नांदी,व सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करून समतेची,व विश्‍वबंधुत्वची शिकवण देत जगासमोर आदर्श निर्माण करत आहे.याच वारीचे क्षेत्र पंढरपुरअसुन देव विठोबा प्रेमाची साक्ष देत भक्तीचे दर्शन घडवत आहे.त्याचेच वर्णन संत करतात.
नाचत जावु त्याच्या गावा रे। खेळीया सुख देईल विसावारे॥
संताच्या प्रेमाचा व सर्व सामाण्याच्या श्रध्देचा मुर्तीमंत गाभा भिवरेच्यातिरावरती उभा आहे.त्याच्या दर्शनाने संसराच्या अनंत अडचणींचा सामणाकरण्याचे बळ व कष्टातुन विश्रांतीचा अनुभव प्राप्त होतो. भोळया-भाबड्या भक्तांना आधारवड व श्रध्देने प्रेम वाटणारा विठोबा काही ही मागत नाही.  संत बहीनाबाई खुप सुंदर शब्दात मांडतात
               श्रीमंताचा बालाजी सोण्या चांदीने मडवीला ।
               माझा गं पांडुरंग पाना-फुलात राजी झाला ॥
असा देव जो भक्ताकडे काहीच मागत नाही फक्त भाव युक्त अंतकरणानं आकळला जातो संत महात्मे याच देवाला आपल्या प्रेमाचे स्थान मानतातात.या सर्व  भक्तीच्या साधनेत मानवतेच्या सर्वागीन विकासाची व नैतिक, सामाजीक उत्क्रांतीची  बिजे संत आपल्या वाग्ड:मयात आदिकालापासुन सांगत आले आहेत.12 व्या शतकात सामाजिक विषमतेची दरी व कर्मकांड आणी आणी अंधश्रध्देच्या  विरोधात आवाज उठवुन समाजीक बंड उभारण्याचे साहस वारकरी सांप्रदायातील सर्व संताणी केलेले दिसुन येते.लोकशिक्षणाचे व जागराचे काम निस्वार्थ पणे करून मानतेची शिकवन संतानी  कीर्तन,भजन,भारूड,प्रवचन यांच्या माध्यमातुन केली.अनिष्ठ रूडी पंरपरा व चाली-रितीवर परखड शब्दात विरोध करण्याचे धाडस करणे हि जोखीम पत्कारली.
सामाज हिताचे व लोकाध्दाराचे काम करताना त्या काळातील प्रस्थापिताचे साम्राज्य मोडित काढण्यासाठी पंढरीचे वाळवंट हे विज्ञापिठ झाले होते.तर वारी ज्ञान अविश्काराचा सोहळा .बनली होती त्या भक्तीच्या व ज्ञानदानाच्या यज्ञात प्रत्येक वारकरी धारकरी बनत होता .व प्रबोधनाची चळवळ पुढे चालवत होता.त्यात एकाच वारीच्या साधनेत सर्व विकारांना तिलांजली देत भक्तीचा काला करून प्रत्येक जन त्यात तृप्त होत असें.यात पुरूष स्त्री, जातभेद, लिंगभेद, यांना थाराच नव्हता,एकमेकांच्या हातात हात घालुन.मुखी हरिनामाचा गजर करत भक्तीचे रसपान  एकाच पंगतीस बसुन केले जात होते.
समर्थाचे पंक्ती भोजने । तळील्या वळील्या एकची पक्वोने।
तीच पंरपरा कायम करत वारकरी आजही पंढरीच्या वारीत सहभागी होतात.
वाळवंटात किर्तनातुन  संर्व जाति धमाचे संत एकत्र ऐत आसत यात संत ज्ञानेश्‍वर ,संत नामदेव ,संत चोखा मेळा, संत जनाबाईं संत मुक्ताबांई, संत गोरा कुभार,संत राका -बंका,यासंत मालीकेची मांदी जमत आसे.तीच पंरपरा आजही सुरू ठेवत. आषाढी आणी कार्तीकी या मुख्य वारीसाठी लाखो वारकरी महाराष्ट्राच्या काण्या कापर्‍यातुन श्रध्देने मिळेंल त्या साधनाने ,पायी येत आहेत.या वारीतुन सांस्कृतीक चळवळ जोपासण्याचे व सामाजीक ऐक्य टिकुन ठेवण्याचा महान कार्य होत आहे.आज आधुनीक युगात डिजिटल जेाण्यातही वारीचे महत्व तेवढ्याच प्रमाणात पहायला मिळते.आर्थिक सामाजीक सांस्कृतीक,आणी प्रबोधनासाठी प्रभावी परिनामकारक ठरणारी वारी अनुभवुया
                    कार्तिकीचा सोहळा। चला जावु पाहु डोळा ॥
तो सोहळा डोळयाने पाहुया आणि भक्तीच्या कक्षा रुदावुन मानुसकीची,परोपकारची, नैतिकतेची,एकात्मतेची सद्बुध्दी दे.तसेच दुष्काळाने होरपळणार्‍या शेतकर्‍याला धिरान जगणचं बळ दे शेवठी
भेदसारे मावळुदे, वैर सार्‍या वासना ।
मानवाच्या ऐक्यतेची, पुर्ण होवो कल्पना ॥
फक्त आम्ही मुक्त मानु, बंधुतेच्या बंधना।
संत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना॥
                                                             
                                                                           ह.भ.प.प्रा.सुरेश महाराज जाधव
       (संत साहित्य अभ्यासक)
श्री बंकटस्वामी मठ नेकनुर ता.जि.बीड
                                                             मो.9404204008
                 

Friday, 14 August 2015

भारताच्या भविष्याचा वेध घेणारे मोदिंचे परिपूर्ण भाषण. सुरूवात नव्या भारतीय युगाची

भारतीय स्वातंत्र दिनाच्या हर्दिक शुभेच्छा.......|

इथे विकासाच राजकारण नाही ,तर राजकारण्याचा विकास महत्वाचा आहे शेवटी कसाही असो भारत माझा महान आहे

गेली 68 वर्षा पासून  आम्ही सामाजिक विषमतेची दरी पोसत आहोत.सरकार कोणतेही असो जनतेची प्रश्न मात्र सुटत नाहीत.सुधारणेच्या गप्पा मारल्या जातात.विकासच्या योजना कागदोपत्री र्राबावल्या जातात आणि सामन्याच्या ह्रदयात  निराशेच्या जखमा केल्या जातात लोकशाहीत विकासासाठी राजकारण कधीच होत नाही का ? पण राजकारणासाठी विकास दाखवला जातो आणि  जाहिरातीतून तो अनुभवला जातो.याची खंत वाटते.
स्वातंत्र्याची नवी पहाट
होवू दे देशाची भर भराट
उठू दे हृदयात देश प्रेमाची लाट
दारिद्याच्या अंधारात दिसू दे  महासत्तेची वाट

Friday, 7 August 2015

डॉ.नरेंद्र दाभोळकर खुन तपास प्रकरणी अनिंसचे डॉ.हमिद दाभोळकर यांच्याशी आमचे
प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी सविस्तर साधलेल्या संवादात सरकारच्या भुमिके विषयी प्रखर प्रतिक्रीया पहा
१) अनिंस राष्ट्रपतीना १ लक्ष पत्र पाठवणार असुन न्याय कधी मिळणार हा प्रश्न विचारला जाणार आहे
२) दोन वर्ष होवुनही तपास काहीच नाही
३) तपासात सरकारची अनस्था
४) सीबीआय तपासात सरकारी मदत नसल्याचा आरोप
५) जात पंचायतीसाठी स्वतंत्र कायदा व्हावा.
६) वरिष्ठ नेते गप्प का
फक्त बीड लाईव्हवर www.beedlive.comडॉ.नरेंद्र दाभोळकर खुन तपास प्रकरणी अनिंसचे डॉ.हमिद दाभोळकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी साधलेल संवादात

विश्व धर्माची साक्ष देणारी पंढरीची वारी आषाढी एकादशी



धरण उशाला, कोरड घशाला.

Move to Inbox
 
More
 
52 of 234
 

kagad pate sachan fil

 धरण उशाला, कोरड घशाला. 
६२ लाखांची राष्ट्रिय पेयजल योजना पिंपळगाव  घाट फकत कागदावरच
 ता जि बीड 
गेल्या  अनेक  वर्षापासून  दुष्काळी परिस्थितित  होरपळणा-या  बीड जिलयातील पाणीपुरवठा योजनामधे सावळा घोधल पहायला मिळत आहे पानी समस्येवर पान्यसारखा पैसा ख़र्च करूनही गावे मात्र तहनलेलीच आहेत.शासनाच्या अनेक पानी पुरवठ्यच्या योजना फ़क्त कागदावरच आहेत सिंचन विहिरी असोकी  नल योजना  फकत कागदावरच आणि पाचविला पूंजलेला दुष्काळ मात्र  पाट सोडत नाही याची कारणे काय? तर भरष्ट अधिकारी  आणि कर्मचारी गुतेदार संगनमताने   परस्पर त्या  योजना लूटत आहेत   गेल्या ३  वर्षा पूर्वी राष्ट्रिय पेयजल योजना पिंपळगावत गावत राबवूनही गावत जानेवारी महिनीतच पान्यसाठी वनवन फिरावे  लगत आहे  
 बीड जिल्यातील १५०० लोकसंख्येचे  गाव  गावत पानी योजनेसाठी ६२ लाख  रुपये मंजूर झाले  त्या पैकी १९ लाख ६२ हजार पहिला हप्ता  सरपंच ग्रामसेवक  यानि उचललाही पण काम काहीच केले नाही.विहीर २८०० मीटर लांब असलेल्या  संगमेश्वर प्रकल्पाच्या  जवळ खोदयाची होती पण खोदलीच नाही गेल्या  २०११ -१२ मधील या योजनेचे  १९ लाख कुठे ख़र्च केले हे  गावकरीना विचारले असता  कोनालाच माहित नाही चक बाकि ग्राम पंचायत सदस्य्नाही माहित नाही .हा अपहर असल्याचे  कार्यकारी अभियंता याना आढळून आले तरीही करवाई मात्र काहीच केलि नाही 
पिंपळगाव कर यानि सर्व ठिकाणी तक्रारी दिल्या  उपोषणही केले पण प्रश्न  मार्गी लागलाच नाही शेवटी जुनि पानी पुरवठ समिति बर्खास्त करुण  बनवून पुढील पैसे थांबवले पण १९ लाखांचे काय हा प्रश्न  मात्र सुटलाच नाही गावच्या पान्यसाठी आलेले  पैसे ऎसे कुणी  परस्पर लुटायचे यासाठी सर्व गावकरी एकवटली आहेत 
पण या   प्रश्न कड़े   अभियन्ते  व ग्रामसेवक  दुर्लक्ष करत आहेत यात वेळोवेला पाठपुरावा करूनही काहीचा होत नसल्यने त्यानी साम सी सम्पर्क साधला आहे .या गावकरीच्या पर्श्नाकडे जिल्हा परिषद पानी पुरवठा  विभागाने लक्ष देने  गरजेचे आहे यात दोषींवर करवाई ची मागणी ग्रामस्त करत आहेत . गावजवळच ३ की मी अंतरावर  संगमेश्वर प्रकल्प असूनही  गावत मात्र पानी नाही म्हणुन  धरण उशाला  आणि कोरड घशाला अशीच अवस्था  पिम्पलगांवकरांची  झाली आहे .यात राष्ट्रिय  पेयजल योजन 
साठी पैसे खर्च करूनही फेब्रुवारी महिनीतच टैंकर  चालू करावे लागणार असलयचे गर्मसेवक यानि सांगितले आहे योजना आशा प्रकारे राबवलीमुळे कायमस्वरूपी दुष्काळ बिड करांचा पीछा सोडत नाही 
सुरेश जाधव

Suresh Jadhav <sureshsj99@gmail.com>

AttachmentsJan 11