जल्लोष करायचा का ? जुमला तर नाही!
सरणावर पेटलेल्या प्रेताला मुखाग्नी दिल्यानंतर आपली जबाबदारी संपते का ? बलिदान दिल्यानंतर शिल्लक राहतेती फक्त राख! ज्यांच्या अहुतीणे या संघर्ष ज्योती प्रज्वलित झाल्या तें विझून गेले आहेत.धूसर झालेल्या आठवणीच्या कोपऱ्यात समाजान त्यांना कधीच पुसून टाकल आहे. बलिदान, हौतात्म, शहीद, कामी येणं हे फक्त श्रध्दांजलीच्या कार्यक्रमा पुरतं असतं ? कोडग प्रेम आणि नाटकी अश्रू आणून संवेदनांचा आटलेला पाझर दुःखाचा पदर उकलू शकत नाही. आरक्षणाच्या संघर्षमय यज्ञकुंडात तत्कालीन सामाजिक आणि राजकीय लोकांनी आहुती म्हणून मारलेल्या लोकांना चक्क आम्ही विसरून गेलोय,
भिंतीवर लटकवलेल्या फोटॊ कडे बोटं दाखवत एका विशीतील तरुणाला विचारलं, हा फोटॊ कोणाचा आहे? तरुणांने आगोदर निरखून पाहिले, २मिनिटं डोक खाजवलें,मेंदूला ताण दिला, इतिहास शोधून पाहिला पण कोन ? या प्रश्नांच उत्तर मिळत नाही हे त्यांच्या चेहर्यावर दिसत होतं, रूबाबदार मिश्या, भारदार भाळ, बलदंड शरीर यष्टी, कोन आहे ? मि नाही ओळखलं, असं म्हणत जावूद्या आपल्याकाय करायचं,आगोदर आरक्षणाच बोलू.असं म्हणतं विषय टाळण्याचा प्रयत्न केला. माझं टाळक सरकल, ज्या माणसाच्या बलिदानावर महाराष्ट्र पेटला, ज्यांनी समाजासाठी आरक्षण दिले नाही सरकार ने फसवलं, उद्या समाजाला काय उत्तर देवू म्हणून आत्मबलिदान दिले, त्यांना कीती कस्पटासमान टाळीवारी टाळाटाळी करतोय.कै.अण्णासाहेब पाटील या युग पुरुषाला विसरणारा़ हा समाज आज फटाके वाजवून जल्लोष करतोय.याचं वाईट वाटत,42 लोकांची सहा महिन्यात साधी आठवण देखील झाली नाही.आणि करत देखील नाही कीती क्रतघ्नपणे ज्यांच्या मरनावर आणि सरणावर आरक्षणाची पोळी भाजनार त्यांच्या बाबतीत वागत आहोत.
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटला, आरक्षणाच्या वणव्याने एक नाही दोन नाही तब्बल 42जणाचे बलिदान घेतलें, या पैकी बीड मधील बरेच जन आहेत, कुणी रेल्वेरूळ जवळ केलातर खिशात चिठ्ठी लिहून गळफास घेतला, विष पिवून आरक्षणाचा विषय मार्गी लावा म्हणत स्वतःचा विषय संपवून घेतला,तेव्हा कुठे सरकार ने विधेयक पारित केले, आनंद उत्सव करतांना दुसऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही, त्यां कुटुंबांच्या दारात फटाके वाजवता, घरातील रडनारा आवाजात तुमच्या कानावर आलंच नाही का? काकासाहेब, राहुल बाळासाहेब, स्वाती, यांची आई,तिची काय आवस्था असेल, वडील कोणत्या कोपऱ्यात तोंड घालून रडत असतील, अर्धांगिनी च्या मनातील काय विचार असतील, मिळालंय! पण पहायला तु कुठे? लोक आनंदने फटाके वाजवत आहेत.पण आमचं दुःख कुणाला सांगायचं! कल्पना करून दुःख जाणीव होतं नाही, पण संवेदना जाग्या ठेवून दुःख हलकं करू शकतो.
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटला, आरक्षणाच्या वणव्याने एक नाही दोन नाही तब्बल 42जणाचे बलिदान घेतलें, या पैकी बीड मधील बरेच जन आहेत, कुणी रेल्वेरूळ जवळ केलातर खिशात चिठ्ठी लिहून गळफास घेतला, विष पिवून आरक्षणाचा विषय मार्गी लावा म्हणत स्वतःचा विषय संपवून घेतला,तेव्हा कुठे सरकार ने विधेयक पारित केले, आनंद उत्सव करतांना दुसऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही, त्यां कुटुंबांच्या दारात फटाके वाजवता, घरातील रडनारा आवाजात तुमच्या कानावर आलंच नाही का? काकासाहेब, राहुल बाळासाहेब, स्वाती, यांची आई,तिची काय आवस्था असेल, वडील कोणत्या कोपऱ्यात तोंड घालून रडत असतील, अर्धांगिनी च्या मनातील काय विचार असतील, मिळालंय! पण पहायला तु कुठे? लोक आनंदने फटाके वाजवत आहेत.पण आमचं दुःख कुणाला सांगायचं! कल्पना करून दुःख जाणीव होतं नाही, पण संवेदना जाग्या ठेवून दुःख हलकं करू शकतो.
आज आणखी एक गोष्ट महत्वाची आहे,मडय़ाला साक्षी ठेवून सरकार कडून प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांच काय ? 10लाख रुपयाचा चेक कुठे ? शासकीय नोकरीतरी दिसते ? घर तरी ? साधं शौचालयाच अनुदान तरी स्मारकाच काय घेवून बसले, पंचनाम्या नंतर कुठला अधिकारी फिरकला का ? या प्रश्नांची उत्तरे कशी मिळतात तें पहा.कोरडय़ा आश्वासनांने पोट भरत नाही. हजारो लोकांच्या समोर,दुःखवट्याच्या घरात बुडालेल्या लोकां दिलेलं कुठले आश्वासन पाळलं याचं उत्तर मिळेल का ? अधिकारी ओघात बोलत गेले मंजूर मंजूर पण प्रत्यक्षात काहीच मिळालं नसल्याचं धक्कादायक वास्तव या बाबतीत आवज उठवणार कीं आपला काय संबंध आरक्षण तर मिळालं चला आनंदाच्या तोऱयात फटाके फोडू कुठल्या माणुसकीचे प्रदर्शन करतोय,
आज सर्वच जण हा हर्षआनंद घेतं श्रेयवादाच्या गदर्भ शर्यती मधे दौडू लागले.पेढे भरवण्या पासून तें बँडबाजा बारात काढत घोषणा देत गुलाल उधळणारे कमी नव्हते.नक्की आनंद उत्सव साजरा व्हायलाच हवा, स्वतंत्र्याच्या ७०नंतर मराठा समाजा बाबतीत ऐतिहासिक निर्णय घेतं,१६%आरक्षण आम्हीच देवू शकतो म्हणतं साफ नियत सही विकास चे पाढे गिरवले, यात अधिवेशनात विरोधी पक्षातील लोकांनी पण चर्चा न करता मूक संमती दर्शवली, चर्चा न होता विधेयक दोन्ही सभागृहात पारित झालं. मुख्यमंत्री महोदयांनी फतें झालीच्या आविर्भावात पेढे भरवले, अभिनंदन प्रस्ताव घेण्यापर्यंत मजल गेली. जे घडलं तें नाटकांच्या पडद्यावरील चित्रा प्रमाणे अगदी ठरवून केल्यासारखे, संवेदशील पणे फसवण्याचे कसब आल्याने साखऱ्याचे पोतें तोंडावर बांधून पटवून दिले, पण जास्त साखर पण डैबिटीज ला आमंत्रण देते हे विसरले वाटत.आज ही अभ्यासक आणि मराठा समाजातील तज्ञ लोकांनी हे आरक्षण टिकणार नाही असा सूर आळवत आहेत, मात्र मुख्यमंञी यांच्या सांगण्यानुसार मराठा समाजाच्या मागणीला प्रतिसाद आम्ही दिला आहे, मागच्या सरकार ने दिलेल्या आरक्षणाला कोर्टानं उपस्थित केलेल्या मुद्दे विचारतं घेवून आम्ही विधेयक तयार केले जसं कीं सामजिक आणि आर्थिक मागास, आहात का ? तर मागासवर्ग समिती कडून, शिफारस केली एक्स्ट्राऑडनरी सीचवेशन तयार करुन आम्ही आरक्षण देत आहोत या मुळे ओबीसीला धक्का नाही स्वतंत्र प्रवर्ग तयार केला असं स्पष्टीकरण मुख्यमंञी महोदय देत आहेत.मात्र अद्याप आरक्षणाची कसोटी शिल्लक आहेच न्यायालय आणि आक्षेप आणि रक्षण महत्वाचे ठरणार आहे. वकिलांची फौज काही न्यायालयात फायरिंग करण्यासाठी नाही, तीथे कायद्याची कसोटी महत्वाची आहे. मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल खुला केला जात नाही,तो न्यायालयात द्यावा लागेल. ५०%ची मर्यादा, स्वतंत्र प्रवर्ग आणि बरंच काही यांमुळे आणखी खरचं आरक्षण टिकेल का ? हा देखील जुमला आहे का ? असं वाटणं साहजिक असावं.सामाजिक जबबादारी म्हणून हौतात्म्य गेलेल्यांच्या कुटुंबांसाठी काही तरी सकारात्मक निर्णय होणं गरजेचं आहे.
लक्ष्मणसूत(सुरेश जाधव) 9404204008

